Amazon: जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अॅमेझॉनने आपली फूड डिलिव्हरी आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद केल्यानंतर कंपनीने आता भारतातील वितरण सेवा (Amazon Distribution Services) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला आपल्या मूळ व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे असल्याने हा निर्णय घेतला आहे. यातच कंपनी आपल्या उर्वरित सेवा बंद करत आहे. अॅमेझॉनचे हे पाऊल मंदीशी जोडून तज्ज्ञ पाहत आहेत. आगामी काळात जागतिक मंदीचा संपूर्ण जगावर वाईट परिणाम होऊ शकतो. मंदीच्या परिस्थिती कंपनी आपला मुख्य व्यवसाय चांगल्या प्रकारे हाताळू शकते, म्हणून ती उर्वरित व्यवसाय बंद करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Amazon ची वितरण सुविधा प्रामुख्याने बेंगळुरू, हुबळी आणि म्हैसूर सारख्या शहरांमध्ये होती. कंपनीच्या या सेवेत 50 कर्मचारी काम करत होते. कंपनी तिच्या वितरण सुविधेद्वारे किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तूंचा पुरवठा करत होती. अॅमेझॉन वितरण सेवा बंद करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अॅमेझॉनला मंदीची भीती
गेल्या काही वर्षांत जगभरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मंदीची भीती कंपन्यांना सतावत आहे. अॅमेझॉननेही आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यासह कंपनीने अलीकडेच आपलं फूड डिलिव्हरी आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉनने भारतातील FMCG क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली होती, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. कंपनीवर रिलायन्स इंडस्ट्रीज, वॉलमार्ट, फ्लिपकार्ट आणि टाटा ग्रुपसारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. अॅमेझॉनला FMCG क्षेत्रात फारसा नफा मिळाला नाही, त्यामुळे कंपनीने भारतात हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनी 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते
अलीकडेच अॅमेझॉन आपला खर्च कमी करण्यासाठी सुमारे 10,000 कामगारांना कमी करण्याची तयारी करत आहे. यासोबतच कंपनीने नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. कोरोना महामारीच्या काळात कंपनीने मुलांच्या शिक्षणासाठी Amazon Academy सुरू केली होती. मात्र आता तेही बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: