Alcohol Export News : भारतीय मद्य उत्पादनांना (Alcohol production) जगात मोठी मागणी आहे. या क्षेत्रात विकासाची संधी आहे. अपेडा (APEDA) अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाने पुढील काही वर्षांमध्ये 1 अब्ज डॉलर्स निर्यात महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक (मद्य) आणि नॉन-अल्कोहोलिक (मद्य विरहित) पेयांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा एक भाग म्हणून अपेडाने परदेशातील प्रमुख देशांमध्ये भारतीय मद्य उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. मद्य निर्यातीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे.


भारतात राजस्थानमध्ये बनवण्यात आलेली गोदावन सिंगल माल्ट व्हिस्की, युनायटेड किंगडममध्ये आर्टिझन सिंगल माल्ट व्हिस्की म्हणून, प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय मद्य निर्यातीमधील हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि डायजिओ पीएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेब्रा क्रू, अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, डियाजिओ इंडिया च्या एमडी आणि सीईओ हिना नागराजन, आणि इतर वरिष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत, गोदावनच्या पहिल्या तुकडीला युनायटेड किंग्डममधील निर्यातीसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.


शेतकऱ्यांना 'या' उपक्रमाचा लाभ मिळणार


गोदावन सिंगल माल्ट व्हिस्कीने मार्च 2024 मध्ये लंडनमधील इंटरनॅशनल फूड अँड ड्रिंक्स इव्हेंट (IFE) मध्ये अपेडा अंतर्गत सहभाग नोंदवला होता, गोदावनची जाहिरात केली होती. गोदावनचा यूकेमधील प्रवेश आणि यूकेला निर्यात होण्यामध्ये या सहभागाने मोलाची भूमिका बजावली आहे. अलवर भागातील शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळेल. गोदावनच्या उत्पादनासाठी वापरलेली ‘सिक्स-रो’ प्रकारची बार्ली, स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आली असून, उद्योगांना पुरवठा साखळीशी जोडल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत आहे. अल्कोहोलयुक्त पेयेची विक्री, वितरण आणि उत्पादनासाठी सरकारने जारी केलेले परवाने आवश्यक आहेत. हे परवाने नियामक साधन म्हणून काम करतात आणि सरकारला महसूल मिळवून देतात.


भारतीय अल्कोहोल उद्योग सरकारच्या महसूल प्रवाहात लक्षणीय योगदान देतो. हा महसूल तीन-पक्षीय दृष्टिकोनातून निर्माण केला जातो .



  • मूल्यवर्धित कर (VAT):  उत्पादन आणि वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर वस्तू आणि सेवांमध्ये जोडलेल्या मूल्यावर आकारला जाणारा कर .

  • उत्पादन शुल्क: अल्कोहोलयुक्त पेयांसह विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि वापरावर लावला जाणारा कर .

  • परवाने: अल्कोहोलयुक्त पेये तयार करणे, विक्री करणे आणि वितरीत करण्याच्या परवानग्यांसाठी शुल्क आकारले जाते.


महत्वाच्या बातम्या:


आता घरपोच मिळणार दारु? 'या' 6 राज्यांमध्ये प्रोजेक्टवर काम सुरु, मद्य उद्योगासाठी निर्णय ठरणार गेमचेंजर