Tomato Price : टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) चांगलीच वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत (Delhi) 24 तासांत टोमॅटोच्या किरकोळ किंमतीत 20 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 किलो टोमॅटोची खरेदी करण्यासाठी दिल्लीत 100 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात टोमॅटोच्या मागणीत वाढ आणि पुरवठ्याचा अभाव यामुळे दरात वाढ झाली आहे.


दिल्लीत टोमॅटोचे भाव 100 रुपये किलोवर


नवरात्रीचा तिसरा दिवस सुरू असून देशाची राजधानी दिल्लीत टोमॅटोचे भाव 100 रुपये किलोवर पोहोचले आहेत. विशेष बाब म्हणजे दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किंमतीत 24 तासांत 20 रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात टोमॅटोच्या मागणीत वाढ आणि पुरवठ्याचा अभाव यामुळे दरात वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात टोमॅटोच्या दरात 27 रुपयांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीपासून सरकारी आकडेवारीनुसार टोमॅटोच्या किमतीत किती वाढ झाली आहे.


24 तासांत टोमॅटोचे भाव किलोमागे 20 रुपयांनी वाढले


नवरात्री उत्सवात देशाची राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या दराने 100 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे.  तर एक दिवसापूर्वी टोमॅटोचे किरकोळ भाव 80 रुपये किलो होते. म्हणजेच 24 तासांत टोमॅटोचे भाव किलोमागे 20 रुपयांनी वाढले आहेत. किरकोळ विक्रेते पप्पू सांगतात की येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर 120 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतात. टोमॅटो विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबरला त्याला बाजारातून 70 रुपये किलोने टोमॅटो मिळाला. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाव 80 रुपयांपेक्षा जास्त होते. तर शनिवारी सकाळी तो बाजारात पोहोचला तेव्हा टोमॅटोचा भाव 80 रुपये किलो होता. त्यामुळे किरकोळ विक्रीसाठी 100 रुपये किलोने विकावे लागत आहे. 


टोमॅटोचे भाव वाढण्याचे मुख्य कारण काय?


तज्ज्ञांच्या मते टोमॅटोचे भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सणासुदीची मागणी. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, उत्पादनात कमतरता आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. त्याचवेळी मान्सूनला उशीर झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनावरही परिणाम झाला. त्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय पुरवठ्यातही अडचणी आल्या. त्यामुळेच टोमॅटोचे भाव वाढत आहेत.


काय सांगतात सरकारी आकडे?


सरकारी आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या एका महिन्यात टोमॅटोच्या किमतीत 27 रुपयांनी वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 4 सप्टेंबर रोजी टोमॅटोचा भाव 43 रुपये प्रति किलो होता, तो वाढून 70 रुपये किलो झाला आहे. म्हणजेच टोमॅटोच्या दरात 27 रुपयांनी वाढ झाली आहे. जर आपण फक्त ऑक्टोबरबद्दल बोललो तर 30 सप्टेंबरला टोमॅटोचा भाव 63 रुपये प्रति किलो होता, त्यात 4 ऑक्टोबरपर्यंत 7 रुपयांनी वाढ झाली आहे.


महत्वाच्या बातम्या:


टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, पण तरीही टोमॅटो 100 रुपयांवर, दर आणखी वाढण्याची शक्यता