मुंबई : राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांचे आभार मानले.  अदिती तटकरे यांनी यावेळी म्हटलं की यापूर्वी महिला व बालविकास विभागातून काम करता आलं. पुन्हा पदभार स्विकारत असताना अधिकाधिक  सकारात्मक काम करण्याचे प्रयत्न असतील असं म्हटलं. याशिवाय अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देखील दिली. डिसेंबर महिना पूर्ण होण्यापूर्वी या महिन्याचे 1500 रुपये सर्व महिलांच्या खात्यावर पाठवण्याचे प्रयत्न असतील, असं त्यांनी म्हटलं.  


अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेत डीबीटीची प्रक्रिया सुरु केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मूळ लाभार्थ्यांना मिळेलच. मात्र ज्यांचं आधार सीडिंग झालंय त्यांना देखील पैसे मिळतील. योजना जाहीर झाल्यानंतर जुलै ऑगस्ट मध्ये ज्यांचे पात्र अर्ज असतील त्यांना मिळणार आहेत.  दुसरीकडे महिलांनी ज्या महिन्यापासून रजिस्ट्रेशन असतील त्यांना मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.


2100 रुपयांबाबतचा निर्णय अर्थसंकल्पात


अदिती तटकरे पुढं म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हाच 2100 रुपयासंदर्भात सांगितलं होतं.  नव्या अर्थसंकल्पात त्याबाबात निर्णय घेण्यात येईल, असं अदिती तटकरे म्हणाल्या.  आता जे 1500 रुपये दिले आहेत ते डिसेंबरपर्यंत कसे पोहोचतील यासंदर्भात प्रयत्न करतोय, असं अदिती तटकरे म्हणाल्या, 


अर्जांची फेरतपासणी जर तक्रार आली तरच होईल. डीबीटी करत असताना तक्रार आल्या होत्या की 19 बॅंक अकाऊंट एकाच व्यक्तीला जातायत. लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणी संदर्भात अजून निर्णय घेतला गेलेला नाही. योजना राबवत असताना अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट होते ते गाठलं आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत नव्या नोंदणीलंदर्भात ठरवलेली तारीख होती. तारीख वाढवून द्यायची की नाही हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवलं जाईल, असंही तटकरे यांनी म्हटलं.


आम्ही महायुती सरकार आहोत. आधी खाते वाटप करण्याला वेळ झाला. पालकमंत्री बाबत आज किंवा उद्या निर्णय होईल. पालकमंत्री संदर्भातला निर्णय तिन्ही नेते निर्णय घेतील, असंही अदिती तटकरे यांनी सांगितलं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ, असं म्हटलं आहे. महिला व बालविकास खात्याचा  पदभार स्वीकारला आहे, पालकमंत्र्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असंही त्यांनी म्हटलं. 


कल्याण मधील 13 वर्षांच्या मुलीच्या हत्ये संदर्भात मी प्राथमिक माहिती घेतली आहे. त्या प्रकरणात कायदेशीर बाबी सुरु झालेल्या आहेत. आमची भूमिका हीच की कडक शासन झालं पाहिजे, फाशी झाली पाहिजे. आरोपीला गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे, असंही अदिती तटकरे म्हणाल्या. 



 इतर बातम्या :



Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची 'ही' कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?