IPO News Updates : गेल्या काही महिन्यांत अनेक आयपीओ आले. यातील काही आयपीओंनी (IPO Update) आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर रिर्टन्स दिले तर काही आयपीओंनी मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. दरम्यान, आता सौरउर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या असीएमई सोलार होल्डिंग्स या कंपनीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा होता आहे. येत्या 6 नोव्हेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे कंपनीने या आयपीओसाठी किंमत पट्टा किती ठरवला आहे, तुम्हाला कधीपर्यंत गुंतवणूक करता येईल? तसेच या कंपनीची वित्तीय स्थिती काय आह? हे जाणून घेऊ या.... 


एकूण 2900 कोटी रुपयांचा आयपीओ


ACME Solar Holdings या कंपनीचा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी येत्या 6 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत या आयपीओत तुम्हाला पैसे गुंतवता येतील. हा आयपीओ एकूण 2900 कोटी रुपयांचा आहे. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी एकूण 8.29 फ्रेश शेअर्स तर 1.75 कोटी ओएफएस शेअर्स विकणार आहे. येत्या 11 नोव्हेंबर रोजी शेअर्सचे अलॉटमेंट केले जाईल. तर बीएसई आणि एनएसईवर ही कंपनी येत्या 13 नोव्हेंबर रोजी सूचिबद्ध होणार आहे.


एका लॉटसाठी किती रुपये मोजावे लागणार?  


ACME Solar Holdings कंपनीने आयपीओसाठी 275 रुपये ते 289 रुपये प्रति शेअर असा किंमत पट्टा ठरवून दिला आहे. या आयपीओमध्ये 51 शेअर्सचा एक लॉट असेल. म्हणजेच तुम्हाला आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर एका लॉटसाठी तुमच्याकडे कमीत कमी 14,739 रुपये असणे गरजेचे आहे. 


कंपनीची वित्तीय स्थिती काय आहे?


ACME Solar Holdings या कंपनीने जूनच्या तिमाहीत 340.01 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. कर दिल्यानंतर या कंपनीचा एकूण नफा 1.39 कोटी रुपये राहिला. तर गेल्या वित्त वर्षाचा हिशोब करायचा झाल्यास कंपनीचा महसूल 1466.27 कोटी रुपये राहिला होता. या काळात कंपनीला 697.78 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


अमिताभ ते माधुरी, दिग्गजांची कोट्यवधीची गुंतवणूक, स्विगीच्या आयपीओमध्ये असं नेमकं काय आहे?


तीन वर्षांत 300 टक्क्यांनी पैसे वाढले, आता मिळाल्या 3496 कोटींच्या ऑर्डर्स, 'या' कंपनीने अनेकांना केलं मालामाल!


स्विगी ते निवा बुपा! या आठवड्यात खुले होणार एकूण 5 आयपीओ, पैसे ठेवा तयार