मुंबई: जागतिक शेअर मार्केटमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव खाली आल्यानंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची घसरण पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या शेअर निर्देशांक 49,950.75 अंकांवर घसरला होता. नंतर त्यात काही सुधारणा होऊन तो पुन्हा 50,112.10 वर पोहचला. निफ्टीही 270.40 अंकांनी घसरल्याने ती 14,826.95 अंकावर पोहोचली.


सेन्सेक्सच्या कंपनीमध्ये इंडसइंड बॅंकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तीन टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. त्याचसोबत आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, एम अॅन्ड एम, एसबीआय, एचडीएफसी बॅंक, रिलायंस इंडस्ट्रीज आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीतही घसरण पहायला मिळाली.


गेल्या सत्रात सेन्सेक्स 257.62 अंक म्हणजे 0.51 टक्क्यांनी वाढून तो 51,039.31 अंकांवर पोहोचला. निफ्टी 115.35 अंकांनी म्हणजेच 0.77 टक्क्यांनी वाढून 15,097.35 अंकावर पोहचली होती. परकीय पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदीचा सपाटा लावलाय. त्यानी गुरुवारी 188.08 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.


Stock Market News: शेअर मार्केटचा नवा विक्रम, निर्देशांक पहिल्यांदाच 52 हजारांच्या पार


आशियायी बाजारात चीनच्या शांघाय कंपोजिट, हॉंगकॉंगचे हॅससेंग, दक्षिण कोरियाचे कोस्पी आणि जपानचे निक्की या बाजारातही घसरण पहायला मिळाली. याच दरम्यान जागतीक तेल बेंचमार्क ब्रेन्ट क्रूडचा 0.62 टक्क्यांच्या घसरणीसोबत65.70 डॉलर्स प्रति बॅरेलवर व्यवहार सुरु होता.


केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर मुंबई शेअर मार्केटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्यांदाच शेअर बाजार एक हजार अंकाने कोसळला आहे.


काही तांत्रिक बिघाडामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज (एनएसई) वरची ट्रेडिंग बुधवारी काही काळासाठी थांबली होती. एनएसईच्या इंन्डेक्स फीडच्या अपडेशनमध्ये काही अडचणी येत होत्या. सगळ्या विभागाचे काम सकाळी 11 वाजून 40 मिनीटांनी बंद करण्यात आलं होतं.


NSE | तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज काही वेळ ठप्प