Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पानंतर पुन्हा एकदा सिमेंट क्षेत्राच्या स्टॉकची मागणी वाढली आहे. अर्थसंकल्पात पायाभूत क्षेत्रावर सरकारने लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे आणि त्याचबरोबर यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने भांडवली खर्चात वाढ करण्याची घोषणा केली असून पुढील आर्थिक वर्षासाठी ती वाढवून 7.5 लाख कोटी करण्यात आली आहे. परिणामी लार्ज कॅपेक्स आऊटले विशेषतः पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी बूस्टर ठरू शकतो. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची ऑर्डर बुक अधिक होऊ शकते. सध्या अधिक मागणी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढीचा फायदा सिमेंट कंपन्यांना मिळणार आहे. सिमेंट क्षेत्रावर विश्वास व्यक्त करताना, ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी म्हटले आहे की, 'काही सिमेंटचे स्टॉक चांगले प्रदर्शन करू शकतात.'

सेक्टरवर सकारात्मक परिणाम

ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसार सिमेंट क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. सिमेंटच्या मागणीत आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. पायाभूत क्षेत्रावर सरकारचा फोकस वाढत असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसून आल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातून सिमेंटची मागणी जोर धरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 4QFY19-22 मध्ये सिमेंटची मागणी 3 टक्के CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने असेही म्हटले आहे की, मार्च 2022 मध्ये क्लिंकर क्षमतेचा वापर 95 टक्के होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सिमेंटच्या किमतींना आणखी आधार मिळू शकतो.

दरम्यान जानेवारी 2022 मध्ये उद्योगांचे प्रमाण वार्षिक 3-4 टक्क्यांनी घसरले आहे. जानेवारी 2022 मध्ये मासिक आधारावर विक्रीचे प्रमाण 4 ते 5 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे. 4QFY22 मध्ये इंडस्ट्री व्हॅल्यूम वार्षिक आधारावर 5 टक्क्यांनी घसरेल अशी ब्रोकरेजची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी जास्त आधारभूत किमतीमुळे हे शक्य झाले आहे. FY22E बद्दल बोलायचे झाल्यास, वार्षिक आधारावर 9 टक्के वाढ दिसू शकते. तर आर्थिक वर्ष 21 मध्ये ती 3 टक्क्यांनी घसरली होती.

सिमेंटचे भाव वाढले

डिसेंबर 2021 मध्ये सिमेंटच्या किंमती घसरल्या होत्या. मात्र, त्यानंतर कंपन्यांनी दरात वाढ केली आहे. जानेवारी 2021 मध्ये दरमहा सरासरी 3 टक्के आणि वार्षिक आधारावर 5 टक्के दरवाढ झाली आहे. किमतीत सर्वाधिक वाढ पूर्व भागात दिसून आली आहे. त्याच वेळी, इतर क्षेत्रांमध्येही किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे क्षेत्राला फायदा होईल. उद्योगाने फेब्रुवारीमध्ये उत्तर आणि पश्चिम भागात प्रति बॅग 10-20 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. तर पूर्व आणि दक्षिण भागात 20-25 रुपये प्रति बॅगने भाव वाढतील.

(Disclaimer: स्टॉक गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. हे एबीपी माझाचे वैयक्तिक मत नाही.त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत घ्या.)


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha