Share Market: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 657.39 अंकांनी वाढला तर निफ्टीही 197 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 1.14 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,465.97 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.14 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,463.80 वर पोहोचला आहे.
आज 1711 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1539 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 105 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑईल अॅन्ड गॅस आणि सार्वजनिक बंका वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑटो, मेटल, बँक या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची वाढ झाली. तर BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.6 ते 1.2 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बुधवारी शेअर बाजारात Coal India, Maruti Suzuki, Hindalco, IndusInd Bank आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून ONGC, Sun Pharma, BPCL, ITC आणि SBI Life Insurance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Coal India- 5.41 टक्के
- Maruti Suzuki- 4.07 टक्के
- IndusInd Bank- 3.14 टक्के
- Bajaj Auto- 3.03 टक्के
- Hindalco- 2.94 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- ONGC- 1.80 टक्के
- Sun Pharma- 0.86 टक्के
- SBI Life Insurance- 0.48 टक्के
- BPCL- 0.48 टक्के
- ITC- 0.48 टक्के
शेअर बाजार सुरू होताच म्हणजे प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला. नंतर बाजारातील व्यवहार सुरू होताच किंचीत घसरण झाली. मात्र, बाजार पुन्हा 330 अंकांनी वधारत 58,100 अंकावर पोहचला होता. त्यानंतर सेन्सेक्स 539 अंकांनी वधारला होता. निफ्टीदेखील वधारला होता. निफ्टी 17,380 अंकांवर ट्रेड करत होता.
जागतिक बाजारपेठांमधील तेजीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर दिसून आला. आशियाई बाजारपेठा देखील तेजी दिसून आली. सिंगापूरमधील इंडेक्स SGX Nifty देखील वधारला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha