ABP Network Ideas Of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या समिटचं यंदा दुसरे वर्ष आहे.  24 आणि 25 फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये (Mumbai) ही समिट होणार आहे. यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) ही आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे. आगामी निवडणुकाआधी पार पडणाऱ्या या समिटकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यंदाची थीम 'नया इंडिया : लूकिंग इनवर्ड, रिचिंग आउट' (Naya India : Looking Inward, Reaching Out) ही आहे. यामध्ये उद्योजक (Business Icons), संस्कृती दूत (Cultural Ambassadors) आणि राजकारण्यांसोबत (Politicians) संवाद साधला जाणार आहे. इन्फोसिसचे संस्थापक आणि चेअरमन एन. आर. नारायण मूर्ती आपले विचार मांडणार आहेत. 


 नवीन कॉर्पोरेट कल्चरवर बोलणार नारायण मूर्ती -
 
एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या परिसंवादामध्ये इन्फोसिसचे संस्थापक आणि चेअरमन एन. आर. नारायण मूर्ती वक्ते म्हणून येणार आहेत. ते नवीन कॉर्परेट कल्चरवर आपलं मत व्यक्त करणार आहेत. 2022 मध्ये झालेल्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी भविष्यात आयटीचा फायदा कसा होऊ शकतो, यावर आपलं मत व्यक्त केले होते. यावेळी ते "नवीन कॉर्पोरेट संस्कृती: द लीडर्स गाइड" (A New Corporate Culture: The Leader’s Guide) या विषयावर आपलं मत मांडणार आहेत. 
 
नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये इन्फोसिस (Infosys) या आयटी कंपनीची स्थापना केली होती. इन्फोसिसने अल्पावधीतच जगभरात आपली ओळख निर्माण केली होती. 2002 पर्यंत म्हणजेच जवळपास दोन दशके नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसचे सीईओ म्हणून काम पाहिलेय. 2002 ते 2011 पर्यंत ते चेअरमन होते. 2011 मध्ये त्यांनी पद सोडल्यानंतर 2013 पासून पाच वर्ष कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. तर 2011 मध्ये ते इन्फोसिसचे एमेरिटस (Emeritus) चेअरमन होते. एमेरिटस म्हणजे, सन्मानाने सेवामुक्त होणारा व्यक्ती. 


आपल्या 40 वर्षाच्या करिअरमध्ये नारायण मूर्ती यांनी कॉर्पोरेट इंडियामध्ये होणाऱ्या बदलाचा अनुभव घेतलाय. तो विकसित होत असलेले गतिमान परिदृश्य आम्ही आमच्या स्वतःच्या अनुभवी डोळ्यांनी पाहिला आहे. देशातील आउटसोर्सिंगमध्ये नारायण मूर्ती यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या आयटी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना "भारतीय आयटी क्षेत्राचे जनक" म्हटले जाते. आयटी क्षेत्रातील भरीव कामगिरी त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण तर 2000 मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. 


एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या समिटमध्ये एन.आर. नारायण मूर्ती कॉर्पोरेट जगतातील नवे बदल अन् त्यात उभरते उद्योजक यावर यावर आपलं मत व्यक्त करणार आहेत. कॉर्पोरेट जगातील नव्या दमाच्या व्यक्तींना त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारी रोजी abplive.com आणि marathi.abplive.com यावर मुर्ती यांचा परिसंवाद वाचायला अन् पाहायला विसरु नका... 
 
ABP Network Ideas of India : 'या' दिग्गजांची उपस्थिती


एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया'च्या यंदाच्या दुसऱ्या समिटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्वनी वैष्णव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिज ट्रस यांच्यासह इतर मान्यवर 'नया इंडिया' म्हणजे काय यावर चर्चा करणार आहेत.


गीतकार जावेद अख्तर, गायक लकी अली, शुभा मुद्गल, लेखक अमिताव घोष, देवदत्त पटनायक, अभिनेत्री सारा अली खान, जीनत अमान, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनोज वाजपेयी, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना,  ज्वाला गुट्टा आणि विनेश फोगाट यांच्यासह अनेक दिग्गज वक्ते असतील. 


आणखी वाचा :
ABP Network Ideas of India : एकाच मंचावर विविध क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी; राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह प्रत्येक विषयावर चर्चा