Harshal Morde Majha Katta : आपण तयार केलेला पदार्थ गिऱ्हाईकानं खरेदी करावा असे प्रत्येकाला वाटते. पण सुरुवातीला यामध्ये आम्हाला थोडा त्रास झाला. सुरुवातील आम्ही तयार केलेलं चॉकलेट बेकरीमध्ये घेतलं गेलं पण हॉटेलमध्ये विक्री व्हायला थोडा वेळ लागल्याचे मत मोरडे चॉकलेटचे (Morde Chocolate) संचालक हर्षल मोरडे (Harshal Morde) यांनी व्यक्त केले. पण आम्ही निराश न होता जोमानं व्यवसाय केला. पण हळूहळू मोठ्या प्रमाणात चॉकलेटची विक्री होत गेल्याचे मोरडेंनी सांगितले. जगाच्या चॉकलेटच्या नकाशावर भारताला नेण्याचं स्वप्न असलेले मोरडे चॉकलेटचे संचालक हर्षल मोरडे हे माझा कट्ट्यावर (Majha Katta) आले होते. यावेळी त्यांनी मोरडे चॉकलेटच्या व्यवसायाबाबत माहिती दिली.
तीस ते चाळीस वर्षापासून आमच्या उत्पादनाची चव तीच
सगळ्या प्रकारच्या बिस्कीटमध्ये मोरडे चॉकलेट आहे. पारले बिस्कीटमध्ये सुरुवातीला मोरडे टॉकलेटचा वापर झाल्याचे हर्षल मोरडे म्हणाले. गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आमच्या उत्पादनाची चव तीच असल्याचे मोरडे म्हणाले. आमची चव ही भारताची चव झाली म्हणलं तर वावगं ठरणार नाही असे मोरडे म्हणाले. आमचे चॉकलेट जवळपास सगळ्या पदार्थांमध्ये आहे. केक असेल, बिस्किट असेल, मिठाई, आईस्क्रीम, स्नॅक्स, बेकरीची इतर उत्पादने असतील त्यामध्ये आमचे चॉकलेट असल्याचे हर्षल मोरडे म्हणाले. मोरडे यांच्या व्यवसायाचे सर्व प्लांट हे मंचरमध्ये आहेत.
आम्ही आमच्या उत्पादनावर आधी लक्ष दिलं
आम्ही आमच्या उत्पादनावर आधी लक्ष दिलं. गिऱ्हाईकाला आपल्या उत्पादनातून काहीतरी फायदा झाला पाहिजे हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. व्यवसायात येणाऱ्या उद्योजकाने तग धरला पाहिजे असे मोरडे म्हणाले. सुरुवातीच्या काळात आम्हाला स्पर्धक म्हणून साठे चॉकलेट आणि साठे बिस्कीट होते. कॅटबरी चॉकलेट होते. पहिली दहा बारा वर्ष आम्ही किंमतीमध्ये बरीच तडजोड केल्याचे मत मोरडे यांनी सांगितले. भारतातील गिऱ्हाईकाच्या खिशात पैसा येणे हा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे हर्षल मोरडे म्हणाले. चॉकलेट उत्पादनात मोरडे चॉकलेटचा 50 टक्के वाटा आहे.
व्यवसायातील सर्व कामगार हे मराठी लोक
आजोबांनी वडिलांना मंचर या आमच्या गावातच चॉकलेट व्यवसायाचा प्लांट उभारयला सांगितले. त्याप्रमाणे वडिलांनी मंचरमध्ये हा व्यवसाय उभारल्याचे हर्षल मोरडे यांनी सांगितलं. मंचरमध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटचा विस्तार झाला. त्याठिकाणी लोकांची चांगली साथही मिळाली. प्लांटवर साधारण 800 लोक काम करत असल्याचे मोरडे यांनी सांगितलं. व्यवसायात साधारण एक हजार लोक असल्याचे मोरडे म्हणाले. व्यवसायातील सर्व कामगार हे मराठी आहेत. महाराष्ट्रातील लोक कामगार म्हणून मिळत असतील तर आपण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे असे हर्षल मोरडे यांनी सांगितलं.