Aadhaar Update Last Date नवी दिल्ली : आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयनं मोठा निर्णय घेतला आहे. यामुळं देशभरातील आधार कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत आज संपणार होती. 14 डिसेंबर 2024 ही आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यूआयडीएआयनं ही मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळं पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी पहिल्यांता 14 जून 2024 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देत ती तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची एक संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
यूआयडीएआयनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार लाखो आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी 14 जून 2025 पर्यंत मोफत ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा कायम ठेवत असल्याचं म्हटलं आहे. ही सुविधा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असेल. यूआयडीएआय लोकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
ज्या लोकांना त्यांच्या आधार कार्डवरील माहिती बदलायची आहे. त्यांच्याकडे आता 14 जून 2025 पर्यंतचा वेळ आहे. त्यामुळं मोफत आधार कार्ड अपडेटसाठी आता सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी काय करणार?
1. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर आधार सेल्फ सर्विस पोर्टलला भेट द्या
2. तुमच्या मोबाइलवर पाठवण्यात आलेल्या आधार क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी नोंदवा
3. कागदपत्र अपडेट हा पर्याय निवडा,सध्याच्या माहितीचं परीक्षण करा
4. ड्रॉ- डाऊन सूचीतून आवश्यक कागदपत्रांच्या प्रकाराची निवड करा, पडताळणासाठी मूळ कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करा.
5. यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळेल, तो पुढील प्रक्रियेत फायदेशीर ठरेल.
आधार कार्ड अपडेट करणं का आवश्यक?
जर तुमच्या आधार कार्डच्या डेटाबेसमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर भविष्यात अडचण येऊ नये म्हणून आधार कार्ड अपडेट करुन घ्यावं. साधारणपणे लहान मुलांचं आधार कार्ड काढल्यास ते 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अपडेट करुन घ्याव, त्यानंतर पुढे वयाची 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील बायोमेट्रिक रेकॉर्ड अपडेट करणं आवश्यक आहे. बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे, आयरिस स्कॅन आणि फोटो याचा समावेश होतो. यासाठी आधार नोंदणी केंद्र आणि आधार सेवा केंद्रावर जावं लागेल.
इतर बातम्या :
ED कडून JSW स्टीलची 4025 कोटींची संपत्ती परत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?