नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक आर्थिक कामात पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक असतं. सरकारच्या निर्णयानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय केलं जाईल. सरकरानं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 निश्चित केली आहे. या नियमामुळं जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर आर्थिक कामं अडकू शकतात.

Continues below advertisement

यूआडीएआय आणि इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. ज्या लोकांचं आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक नसेल ते  आयटीआर फाईल करु शकणार नाहीत किंवा इतर आर्थिक सेवांचा फायदा घेऊ शकणार नाहीत. टॅक्स रिफंड क्लेम करणं, नवं बँक खातं उघडणं किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड मिळणं अवघड होईल. 

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक कसं करायचं? 

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कार्यालयात किंवा सीएससी सेंटरवर जाण्याची गरज नाही. मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन हे काम करु शकता. तुम्हाला यासाठी सर्व प्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या ई- फायलिंग पोर्टला भेट द्यावी लागेल. तिथं क्विक लिंक्स या पर्ययात लिंक आधार कार्ड हा पर्याय उपलब्ध असेल. लॉगिन करुन तुमच्या प्रोफाईल सेक्शनमधील लिंक आधार हा पर्याय नोंदवा. यानंतर तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड क्रमांक आणि आधार कार्डवरील नाव नोंदवा. जर आधार कार्डवर जन्मतारीख असेल तर संबंधित बॉक्सवर क्लिक करा.  यानंतर आधार माहिती प्रमाणित करण्यास सहमत असल्याचं नोंदवा. यानंतर लिंक आधारव क्लिक करा. यापुढे तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो नोंदवून पडताळणी करा. यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीनवर पाहायला मिळेल. 

Continues below advertisement

लॉगीन न करता देखील आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येतं. ई - फायलिंग पोर्टलवर लिंक आधारवर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक नोंदवा. यानंतर पडताळणी पूर्ण करा. 

एसएमएसद्वारे आधार पॅन लिंक करायचं असल्यास  आधार क्रमांक पॅन क्रमांक तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवावा लागेल. 

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास सक्रिय करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. त्यामुळं सरकारनं दिलेल्या मुदतीत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घेणं आवश्यक आहे.