Mahesh Landge : राज्यात महानगर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला लगेच या निवडणुकांचे निकाल देखील जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुण्यासह पिंपरी चिंचवडच्या विविध पक्षांच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आहेत. याबाबत बोलताना भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरीत भाजप अजित पवारांना आणखी धक्के देणार असल्याचे लांडगे म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांना आणखी धक्के देण्याच्या तयारीत आहे. असा दावा भाजपचे आमदार महेश लांडगेंनी केला आहे. आज अजित पवार गट आणि उद्धव ठाकरेंना धक्के देत 22 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापुढंही धक्कातंत्र अवलंबलं जाणार असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. यानंतर देखील महायुतीत गोडवा टिकून राहील असा दावा महेश लांडगे यांनी केला आहे. कोणतीही कटुता निर्माण होणार नाही, असा तिरकस दावा लांडगे यांनी केला आहे. तसेच भाजपमध्ये उफाळलेली नाराजी दूर होईल, असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला. पुण्यातील अनेक नेत्यांनी आज मुंबईत (Mumbai) पक्षप्रवेश केला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापुसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे . त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेविका सायली वांजळे आणि माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपचे धक्कातंत्र
पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या, अजित पवारांना भाजप मोठं खिंडार पडलं आहे. आज मुंबईत अजित पवार गटाच्या आठ माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. यात माजी महापौरांच्या मुलासह, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौरांचा ही समावेश आहे.
पिंपरी चिंचवड मधून भाजप प्रवेश केलेल नेते
1) संजोग वाघेरे - शहराध्यक्ष, ठाकरे गट 2) उषा वाघेरे - माजी स्थायी समिती अध्यक्षा, अजित पवार गट3) प्रभाकर वाघेरे - माजी उपमहापौर, अजित पवार गट 4) प्रशांत शितोळे - माजी अध्यक्ष, स्थायी समिती - अजित पवार गट5) नवनाथ जगताप - माजी अध्यक्ष, स्थायी समिती ( शरद पवार गट )6) राजू मिसाळ - माजी उपमहापौर, अजित पवार गट 7) समीर मासुळकर - माजी नगरसेवक, अजित पवार गट 8) रवी लांडगे - भाजपचे माजी नगरसेवक ( सध्या ठाकरे गट ) 9) जालिंदर शिंदे - माजी नगरसेवक, अजित पवार गट 10) अमित गावडे - माजी नगरसेवक, ठाकरे गट 11) संजय काटे - माजी अपक्ष नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते12) मीनल यादव - माजी नगरसेविका, ठाकरे गट 13) कुशाग्र कदम - मुलगा, माजी महापौर मंगला कदम14) प्रसाद शेट्टी - माजी नगरसेवक, अजित पवार गट 15) विनोद नढे - माजी नगरसेवक, अजित पवार गट
महत्वाच्या बातम्या: