New Aadhaar APP: यूआयडीएआयकडून जारी करण्यात आलेलं आधार कार्ड आता महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.आधार कार्डचा वापर करणं सोपं व्हावं आणि आधार कार्डचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आधार कार्ड संदर्भात नवं फीचर लाँच करणयात आलं आहे. हे आधारच्या डिजिटलायझेशनं संदर्भातील महत्त्वाचं पाऊल आहे. केंद्रीय मंत्री माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील माहिती दिली. फेस आयडी ऑथेटिकेशन फीचरसह यूआयडीएआयनं अॅप लाँच केलं आहे.
नव्यानं लाँच करण्यात येणाऱ्या आधारच्या अॅपसह एअरपोर्ट आणि हॉटेलमध्ये चेक न करताना आधार कार्डच्या सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी द्यावी लागणार नाही. यूआयडीएआयनं नवं अॅप विकसित केलं आहे. सध्या लाँच करणयात आलेलं अॅप बेटा स्वरुपाचं असून तपासणीच्या टप्प्यात आहे. याची चाचणी यशस्वी झाल्यास ते सर्वांसाठी लाँच कलं जाईल.
आधार कार्डची गरज पडल्यास क्यूआर कोड आणि फेस आयडीच्या द्वारे पडताळणी केली जाईल. या अॅपमुळं फेस आयडी ऑथेंटिकेशनला डिजिटल पडताळणीला प्रोत्साहन मिळेल. याच्या सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी आर्टिफिशअल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे.
नव्या आधार कार्ड अॅपमध्ये गोपनीयतेला प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळं वैयक्तिक माहितीचं नियंत्रण यूजरच्या हातात असेल. डेटा शेअरिंगसाठी यूजर्सची मान्यता अपेक्षित असेल, त्यामुळं गोपनीयता कायम राहील.
फेस आयडी ऑथेंटिकेशन मुळं आता फक्त चेहऱ्याच्या आधारे आधार पडताळणी केली जाईल. यामुळं यूपीआय पेमेंट प्रक्रिया सोपी होईल.
यूआयडीएआयच्या दाव्यानुसार अॅप 100 टक्के डिजीटल आणि सुरक्षित असल्यानं यामध्ये डेटा सोबत छेडछा करता येणार नाही. यामुळं डेटा लीक होणार नाही, याचा दुरुपयोग होणार नाही.
डिजिटल इंडिया कार्यक्रमानुसार हे अॅप पेपरलेस गव्हर्नंसला प्रोत्साह मिळेल. ज्यामुळं आधार कार्डशी संबंधित कामं डिजिटली पूर्ण होतील.
इतर बातम्या :