RBI MPC Meeting मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी आज एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पतधोरण जाहीर केलं. संजय म्हलोत्रा यांनी रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो रेट 6.00 टक्क्यांवर आला असून यामुळं गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. रेपो रेट जाहीर केल्यानंतर संजय म्हलोत्रा यांनी ट्रम्प टॅरिफमुळं जागतिक आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुढं ते म्हणाले की "मी संजय आहे मात्र महाभारतातील संजय नाही"
संजय म्हलोत्रा यांनी सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या तिमाहीसाठी रेपो रेटमध्ये कपात केली होती. रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर आणला होता. आता एप्रिल ते जून या तिमाहीसाठी रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कपात करत 6 टक्के करण्यात आला आहे. समायोजनात्कम दृष्टिकोनाचा उद्देश हा आहे की केंद्रीय बँक सध्याची स्थिती कायम ठेवेल किंवा आगामी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट कमी करण्यासंदर्भात निर्णय घेईल.
मी महाभारतातील संजय नाही
जागतिक परिस्थिती पाहता दिलासा देण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जातील. तुम्हाला माहिती आहे किती सूट दिली गेली आहे. सरकारनं त्यांच्या बाजूनं पूर्ण प्रयत्न केले आहेत. तुम्ही आताच्या बजेटमध्ये पाहिलं असेल, सर्व पावलं उचलण्यात आली आहे. ज्यामध्ये करामध्ये सूट असेल किंवा वैयक्तिक प्राप्तिकरातील सूट असेल. संजय म्हलोत्रा पुढं म्हणाले, आम्ही रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आम्ही आमचा दृष्टिकोन बदलला आहे. याचा अर्थ असा की रेपो रेटच्या धोरणामध्ये कोणताही बदल करण्यात किंवा कपात करण्यात आली नाही. ही स्थिती कुठपर्यंत जाईल माहिती नाही. मी संजय आहे मात्र महाभारतातील संजय नाही जो दूरपर्यंत घेऊन जाऊ शकेल. आपल्याकडे त्यांच्यासारखी दूरदृष्टी नाही, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.
GDP वाढीचा अंदाज घटवला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नं भारताच्या आर्थिक वर्ष 2025-26 मधील जीडीपीच्या वाढीचा अंदाज 6.7 टक्क्यांवरुन घटवून 6.5 टक्के केला आहे. केंद्रीय बँकेनं टॅरिफ वॉर सारख्या समस्यांमुळं निर्माण होणाऱ्या अनिश्चिततांचा दाखला देखील दिला आहे. ते म्हणाले टॅरिफ संदर्भातील पावलांमुळं आर्थिक अनिश्चितता आणि महागाईची भीती निर्माण झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर पुढं म्हणाले की पतधोरण देशांतर्गत विकासाला पाहून ठरवलं जाईल. ज्यामुळं विकासाच्या वेगाला मदत मिळेल. याशिवाय महागाईबाबत सतर्क राहावं लागेल, असं म्हलोत्रा म्हणाले.