Business News : मालमत्ता धारकांसाठी (Property Holders) मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. घर, जमीन, मालमत्ता विकल्यावर जुन्या किंवा नव्या अशा दोनपैकी एका पद्धतीने LTCG कर भरता येणार आहे. सर्वसामान्य मालमत्ताधारकांना या निर्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये ओल्ड किंवा न्यू रेजीम असे दोन पर्याय असणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) या आज याबाबतच्या सुधारणा सादर करणार आहेत.
20 टक्के लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 12.5 टक्क्यांपर्यंत परंतू, इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही, अशी नवी तरतूद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना केली होती. इंडेक्सेशन वगळल्यामुळे स्थावर मालमत्ता धारकांकडून मोठ्या प्रमाणावर असंतोषाचा सामना सरकारला करावा लागला होता.
लाँग-टर्म कॅपिटल गेन (LTCG) म्हणजे काय?
प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 45 मध्ये दीर्घकालीन भांडवली नफा ची व्याख्या नफा म्हणून किंवा भांडवली निसर्गाच्या मालमत्तेतून उद्भवणारी नफा किंवा लाभ नमूद केल्यास ट्रान्सफर केलेल्या वर्षाचे उत्पन्न असेल आणि ते 'भांडवली लाभ प्रमुखाअंतर्गत प्राप्तिकर आकारले जाईल. एलटीसीजी च्या अर्थात, भांडवली मालमत्ता ही व्यक्तीने धारण केलेली कोणतीही मालमत्ता आहे- मग ती त्याच्या व्यवसायाशी किंवा व्यवसायाशी संपर्क असो किंवा नसो. यामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांद्वारे प्रति सेबी नियमांनुसार आयोजित सिक्युरिटीजचा समावेश होतो.
महत्वाच्या बातम्या:
BMC : मुंबई महापालिकेकडून 4,856 कोटींचा मालमत्ता कर जमा, यंदा 108 टक्के कर जमा