Toll Hike in Bandra Worli Sea Link : वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.1 एप्रिलपासून या मार्गावर प्रवास करण्यासाठी टोलमध्ये वाढ (Toll Hike) करण्यात आलीय. ही टोल वाढ 18 टक्के एवढी करण्यात आलीय. यामुळे मुंबईकरांच्या खिशावर भार पडणार आहे.
नेमकी किती झाली वाढ?
वांद्रे-वरळी सी लिंकवरुन प्रवास करणं आता महाग होणार आहे. कारण यावरुन प्रवास करण्यासाठी आता टोलमध्ये वाढ करण्यात आलीय. यामुळं मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिणेकडील भागातील जोडण्यासाठी हा सेतू महत्त्वाचा आहे. या टोल वाढीमुळं सध्याच्या कार आणि जीपचे टोल 85 रुपयावरून 100 रुपयावर जाणार आहे. तसेच मिनीबस टॅम्पो आणि इतर वाहनांमधील प्रवाशांना 130 रुपयावरुन 160 रुपये आकारले जाणार आहेत. तर एकेरी प्रवासासाठी 175 रुपये ऐवजी दोन एक्सेल ट्रकसाठी 210 रुपये आकारले जाणार आहेत.
1 एप्रिल 2024 पासून तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना
दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची तात्काळ अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून होणार असल्याची माहिती देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. माहीम दादर प्रभादेवी वरळी भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम उपनगरातील वाहनधारक या सागरी सेतूचा उपयोग करत असतात. तर याच सागरी सेतुला आता धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सागरी किनारा मार्ग सुद्धा जोडण्यात येत आहे. हा सागरी किनारा रस्ता सिलिंगला जोडल्यास यावरुन आणखी वाहनांची संख्या वाढणार आहे.
'या' मार्गावर देखील टोल वाढणार
दरम्यान, वांद्रे-वरळी सी लिंकवरील प्रवासासाठी टोल वाढीच्या निर्णयासह अन्य काही ठिकाणी देखील टोल मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पुणे-सातारा महामार्गाचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दुसरा म्हणजे पुणे-नाशिक महामार्गावरील टोलमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. एक एप्रिलपासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. त्यामुळं या रस्त्यांवरील प्रवास महागणार आहे. साधारण अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला. या टोल वाढीच्या सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या: