LIC Shares : गेल्या आठवड्यात एका बाजूला शेअर बाजार (Share Market)निर्देशांक सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. तर दुसऱ्या बाजूला एलआयसीच्या शेअर्समध्ये (LIC Shares) 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.  गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत 86,146.47 कोटी रुपये कमावले. आहेत. 


शेअर मार्केटमध्ये सातत्यानं चढ-उतार होत आहेत. पण एखादा शेअर त्याच्या गुंतवणूकदारांचे नशीब कधी बदवेल हे सांगता येत नाही. असाच चमत्कार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्सने केला आहे. ज्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्या शेअरधारकांनी अवघ्या 5 दिवसांत 86,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.


गेल्या आठवड्यात 30 शेअर्सचा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 490.14 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत, सेन्सेक्समधील टॉप-10 मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आहे. या कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात एकत्रितपणे 2.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे, अशा सहा कंपन्या होत्या ज्यात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांच्या सामूहिक संपत्तीत 1,06,631.39 कोटी रुपयांची घट झाली आहे.


एलआयसी शेअर्समध्ये मोठी वाढ 


एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करताना मल्टीबॅगर परतावा देण्यात आघाडीवर राहिली. केवळ 5 दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये, LIC मार्केट कॅपने 7 लाख रुपयांच्या पातळीला स्पर्श केला. परंतू, नंतर तो थोडा कमी झाला आणि शेवटी संपूर्ण आठवड्यात तो 6,83,637.38 कोटी रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत कंपनीचे शेअर्स (एलआयसी स्टॉक) 14 टक्क्यांनी वाढले आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 86,146.47 कोटी रुपयांची वाढ झाली.


या कंपन्या पैसे मिळवण्यातही पुढे 


एकीकडे एलआयसीने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयही कमाईच्या बाबतीत पुढे राहिली. SBI MCap पाच दिवसात 65,908 कोटी रुपयांच्या वाढीसह 6,46,365 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात तिसरी सर्वात मोठी कमाई करणारी कंपनी होती टाटा समूहाची आयटी कंपनी TCS. यामध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना 61435 कोटी रुपये मिळाले. कंपनीचे बाजार भांडवल 15,12,743 कोटी रुपये झाले. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही चौथी कमाई करणारी कंपनी होती. त्याचे बाजार मूल्य (रिलायन्स MCap) 5,108 कोटी रुपयांनी वाढून 19,77,136 कोटी रुपयांवर पोहोचले.


सहा कंपन्यांनी गमावले गुंतवणूकदारांचे पैसे


सहा कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे गमावले आहेत. या प्रकरणात एचडीएफसी बँकेची सर्वात वाईट अवस्था होती. बँकेचे बाजार भांडवल (HDFC बँक MCap) 2,963.94 कोटींनी घटून 10,65,808.71 कोटी झाले. याशिवाय, ITC MCap 30,698.62 कोटी रुपयांनी कमी होऊन ते 5,18,632.02 कोटी रुपये राहिले. भारती एअरटेलचे मार्केट कॅप देखील 16,132.15 रुपयांनी घसरले आणि ते 6,31,044.50 कोटी रुपयांवर आले.


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! LIC ने कमावला 9444 कोटी रुपयांचा नफा, 4 रुपयांचा लाभांश जाहीर; गुंतवणूकदारांना चांगले दिवस