Inequality in India : भारतीय लोकांची संपत्ती (India Population Welth) दिवसेंदिवस वाढत असली तरी मोठ्या प्रमाणात असमानता (inequalit) देखील वाढत आहे. श्रीमंत अधिकच श्रीमंत होत आहे, तर गरिब अधिकच गरिब होत असल्याचं चित्र सध्या देशात दिसत आहे. देशातील आर्थिक असमानतेबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय. यामध्ये याबाबतची माहिती देण्यात आलीय. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील फक्त 1 टक्के लोकसंख्येकडे 40 टक्के संपत्ती आहे. म्हणजे उपरलेल्या 99 टक्के लोकसंख्येकडं 60 टक्केच संपत्ती आहे. नेमकं अहवालात काय सांगितलंय, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


2000 पासून देशातील श्रीमंत व्यक्तिंच्या संपत्तीत मोठी वाढ 


भारतात आर्थिक विषमता वाढत असल्याचे दिसत आहे. देशातील 1 टक्के लोकसंख्येकडे 40 टक्के संपत्ती असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार 2000 पासून देशातील श्रीमंत व्यक्तिंच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता वाढलीय. 2022-23 मध्ये देशातील 1 टक्के लोकसंख्येच्या संपत्तीत 22.6 टक्क्यांची वाढ झालीय. दरम्यान, आर्थिक बिषमतेसंदर्भातील अहवाल थॉमस पिकेट्टी (पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स), लुकास चॅन्सेल (हार्वर्ड केनेडी स्कूल) आणि नितीन कुमार भारती (न्यूयॉर्क विद्यापीठ) यांनी तयार केला आहे.


देशातील पैसा विशीष्ट लोकांकडेच


देशातील पैसा विशीष्ट लोकांकडेच जात आहे. त्यामुळं दिवसेंदिवस देशातील आर्थिक विषमता वाढत आहे. 2014-15 ते 2022-23 या काळात देशातील अब्जाधिशांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झालीय. त्याचा परिणाम म्हणून देशात गरिब श्रीमंत यांच्यातील दरी वाढली आहे. देशातील फक्त 1 टक्के लोकसंख्येकडं सर्वात जास्त हिस्सेदारी आहे. दरम्यान, भारतातील आर्थिक असमानतेवरील अहवालात म्हटले आहे की, देशातील अतिश्रीमंत लोकांवर सुमारे 2 टक्के अतिरिक्त कर लादला जावा. तसेच आरोग्य, शिक्षण आणि पोषण यावर गुंतवणूक वाढवली पाहिजे अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.


दरम्यान, आर्थिक विषमता अहवालात दिलेल्या माहितीनुसार 2000 सालापासून श्रीमंताच्या संपत्तीत वेगानं वढ होत गेली. तिथूमच गरिब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढ गेल्याचे म्हटलं आहे. 1922 मध्ये देशातील 1 टक्के श्रीमंत लोकसंख्येकडे 13 टक्के संपत्ती होती. मात्र, त्यानंतरच्या काळात 2022-23 मध्ये देशातील 1 टक्के लोकसंख्येच्या संपत्तीत 22.6 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती या अहवालात सांगण्यात आली आहे. या 1 टक्के श्रीमंत लोकसंख्येकडे देशातील 40 टक्के संपत्ती एकवटली आहे. यावरुन आर्थिक विषमता किती आहे हे दिसून येते.  


महत्वाच्या बातम्या:


जगातील 'या' 5 व्यक्तींकडे प्रचंड पैसा, दररोज 8.3 कोटी खर्च केले तरी पैसे संपायला लागतील 476 वर्षे