अर्थसंकल्प 2019 : छोटे शेतकरी, कामगार, महिलांसाठी मोठे निर्णय, आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी 2019 चा अर्थसंकल्प संसदेत मांडला. यात छोटे शेतकरी, कामगार, महिलांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तर आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांपर्यंत केली असून ३ कोटी करदात्यांना लाभ होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2019 12:50 PM
निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून घोषणांचा पाऊस, अर्थमंत्री पियुष गोयलांनी बजेट सभागृहाच्या पटलावर ठेवलं


3 कोटी करदात्यांना लाभ होणार, 40 हजारापर्यंत व्याजही करमुक्त : अर्थमंत्री पियुष गोयल
आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर : अर्थमंत्री पियुष गोयल
5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री : अर्थमंत्री पियुष गोयल
देशात क्लीन एनर्जीचा वापर वाढविण्यावर भर देणार, इलेक्ट्रिकल वाहनांचा काळ आहे. देशाला प्रदूषणमुक्त करायचे आहे : अर्थमंत्री पियुष गोयल
रस्ते, रेल्वे, हवाईसेवा सुधारण्यावर भर : अर्थमंत्री पियुष गोयल


1 करोडपेक्षा अधिक लोकांनी नोटबंदीनंतर इन्कम टॅक्स भरला : अर्थमंत्री पियुष गोयल
करदात्यांच्या संख्येत वाढ, यंदा 12 लाख कोटी करस्वरूपात मिळाले : अर्थमंत्री पियुष गोयल
आयकरात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे : अर्थमंत्री पियुष गोयल
चित्रपटसृष्टीसाठी काही योजना जाहीर करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या कडून 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चा उल्लेख. त्यानंतर मागच्या बाकावरून सत्ताधारी खासदारांनी 'how's the Josh' चा आवाज दिला.
इन्कम टॅक्सच्या स्लॅबवर आतापर्यंत कुठलाही बदल नाही
मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वच परवानग्या एकाच खिडकीवर : अर्थमंत्री पियुष गोयल
संरक्षण खात्यासाठी आजवरचा सर्वात मोठा निधी दिल्याचा दावा. 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद करणार : अर्थमंत्री पियुष गोयल
ऑनलाईन व्यवहाराने सर्व चित्र बदललं, जन-धन योजनेचा मोठा वाटा : अर्थमंत्री पियुष गोयल
ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात आणलं, मिझोरम त्रिपुरा रेल्वेच्या कक्षेत : अर्थमंत्री पियुष गोयल
येत्या 5 वर्षात 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती : अर्थमंत्री पियुष गोयल
भारतात जगातील सर्वाधिक मोबाईल वापरकर्ते, सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा : अर्थमंत्री पियुष गोयल
5 वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली, 100 हुन अधिक विमानतळ कार्यरत : अर्थमंत्री पियुष गोयल
रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद, वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात : अर्थमंत्री पियुष गोयल
दररोज देशात 27 किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती : अर्थमंत्री पियुष गोयल
जोखीम असलेल्या पदांसाठी भत्त्यात वाढ, वन रँक, वन पेन्शन योजना लागू : अर्थमंत्री पियुष गोयल
संरक्षणासाठी 3 लाख कोटींहून अधिक कर्ज : अर्थमंत्री पियुष गोयल
गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांच्या पगारी रजेची तरतूद : अर्थमंत्री पियुष गोयल
मुद्रा योजनेत 15 कोटींचे कर्जवाटप, मुद्रा योजनेचा 70 टक्के महिलांना लाभ : अर्थमंत्री पियुष गोयल
गेल्या 5 वर्षात देशाचा आत्मविश्वास वाढवला, वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था : अर्थमंत्री पियुष गोयल
असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना, 60 वर्षे पार कामगारांना 3 हजार रुपये पेन्शन : अर्थमंत्री पियुष गोयल
ग्रॅच्युईटीची मर्यादा 10 लाखांहून 20 लाखांवर, 10 कोटी असंघटित कामगारांसाठी केंद्राची श्रमयोगी पेन्शन योजना : अर्थमंत्री पियुष गोयल
कामगारांचे कल्याण हाच आमचा हेतू, ५ वर्षात औद्योगिक क्षेत्रात शांतता निर्माण केली : अर्थमंत्री पियुष गोयल
कामगारांना 7 रुपये बोनस, 10 कोटी असंघटित कामगारांना लाभ, 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजारापर्यंत बोनस : अर्थमंत्री पियुष गोयल
पशुसंवर्धन, मत्सपालनासाठी शेतकरी क्रेडिट कार्ड, कर्जामध्ये 2 टक्के सूट : अर्थमंत्री पियुष गोयल
मोठी घोषणा : दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी थेट सहा हजार जमा होणार. 1 डिसेंबर 2018 पासूनच योजना लागू होणार. 3 हप्त्यात ही रक्कम जमा होणार.
गोमातेच्या संवर्धनासाठी कामधेनू संवर्धन योजना : अर्थमंत्री पियुष गोयल
आयुषमान भारत योजना लागू झाल्यानंतर जवळपास दहा लाख गरिबांनी याचा फायदा घेतला. तीन हजार कोटी रुपयांचे उपचार करण्यात आले. इतक्या कमी काळात. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना मोदींच्या कल्पनेतून साकारली : पियुष गोयल
पाच वर्षात 1 कोटी 53 लाख घरं बनवली. मागच्या सरकारच्या तुलनेत हा आकडा पाच पट अधिक आहे : पियुष गोयल
जीएसटीने देशाचे आर्थिक आरोग्य सदृढ बनलं : अर्थमंत्री पियुष गोयल
रियल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणली, रेरासारखे कायदे आणले, रेरामुळे बेनामी संपत्ती असणाऱ्यांचे पितळ उघडे पडले : अर्थमंत्री पियुष गोयल
गरिबांना स्वस्त दरात धान्य दिलं, गरिबांना वीज दिली : अर्थमंत्री पियुष गोयल
सकारात्मक योजनांमुळे परकीय गुंतवणूक वाढली : अर्थमंत्री पियुष गोयल
2020 पर्यंत प्रत्येकाला घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार : अर्थमंत्री पियुष गोयल
बँकिंग व्यवस्था पारदर्शी व्हावी यासाठी अनेक निर्णय : अर्थमंत्री पियुष गोयल
राज्यांना आधीच्या तुलनेत 10 टक्के निधी जास्त मिळतोय : अर्थमंत्री पियुष गोयल
बँकिंग व्यवस्था पारदर्शी व्हावी यासाठी अनेक निर्णय घेतले : अर्थमंत्री पियुष गोयल
'हमारे सरकारने कमरतोड महंगाई की कमर ही तोड दी' : पियुष गोयल
अरुण जेटलींना या क्षणाला मिस करतोय. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना : अर्थमंत्री पियुष गोयल
महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश, भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर, नव्या भारताच्या दिशेने वाटचाल : अर्थमंत्री पियुष गोयल
अंतरिम बजेटच्या आधी शेअर बाजारात तेजी, सेंसेक्स 106 अंकांनी वधारला
2020 पर्यंत प्रत्येकाला घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार : अर्थमंत्री पियुष गोयल
राष्ट्रपतींची बजेटला मंजुरी, अर्थमंत्री पियुष गोयल यांचे संसदेकडे प्रयाण, थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बजेटची कागदपत्रं संसदेत दाखल, अर्थमंत्री पियुष गोयल 11 वाजता अर्थसंकल्प मांडणार
अर्थमंत्री पियुष गोयल राष्ट्रपती भवनात दाखल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद अर्थसंकल्पाला मंजुरी देणार, थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अर्थात बजेटच्या कॉपी संसद आवारात पोहचल्या. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये बजेटची प्रक्रिया
अरुण जेटली कॅन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेल्याने मागील आठवड्यातच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्याआधी अरुण जेटली यांनी पाच वेळा अर्थसंकल्प मांडला होता.

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचं हे शेवटचं अधिवेशन आहे.  केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आज सकाळी 10 वाजता अर्थसंकल्प मांडतील. निवडणुका तोंडावर असल्यानं संपूर्ण देशाच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसारखे भाजपचे गड काबीज केल्यानं 2014 पेक्षा यंदा काँग्रेसची ताकद वाढली आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष हे या निवडणुकांमधील भाजपच्या पराभवाचं मुख्य कारण मानलं जातं. त्यामुळे कृषी योजना या अर्थसंकल्पातील लक्षवेधी ठरू शकतील.

देशात बेरोजगारीही कमालीची वाढली आहे. नोटाबंदी-जीएसटीनंतर व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. याचा फटका लोकसभेत बसू नये, यासाठी मोदी अर्थसंकल्पातून कोणतं ब्रम्हास्त्र काढतात, हे पाहणे गरजेचे आहे. काँग्रेसनं किमान वेतनाचं आश्वासन दिल्यानं मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्यामुळे त्यांची मतंही खेचण्यासाठी करसवलतीसह अन्य लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणुकीआधी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमवर सरकार या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मे महिन्यात सत्तेत येणारं सरकार जुलैमध्ये संपूर्ण बजेट सादर करणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडलं जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरु होऊन 13 फेब्रुवारीला संपणार आहे. एप्रिल, मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर मे अखेरपर्यंत नव्या सरकारची स्थापना होईल. मात्र अंतरिम अर्थसंकल्पातही पुढील चार महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा मांडला जाईल.

जेटलींच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार

सध्या अर्थ मंत्रालयाचं कामकाज पाहणारे पियुष गोयल उद्या अर्थसंकल्प मांडणार आहेत. अरुण जेटली कॅन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेल्याने मागील आठवड्यातच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्याआधी अरुण जेटली यांनी पाच वेळा अर्थसंकल्प मांडला होता.

काल अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांना  संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारच्या विकासयोजनांचा पाढाच वाचून दाखवला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.