काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच विरोधीपक्ष नेत्यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ब्रेकफास्ट पार्टीला हजेरी लावली. मात्र, यानंतर दोन छायाचित्रे समोर आले. त्यामुळे दिल्लीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चेचा विषय बनली आहे.
पहिल्या फ्रेममध्ये संजय राऊत आणि राहुल गांधी एकमेकांच्या बाजूला बसले आहेत आणि दुसऱ्या फ्रेममध्ये राहुल गांधी संजय राऊतच्या खांद्यावर हात ठेवून बोलताना दिसत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर, या फोटोवरून काँग्रेस आणि शिवसेना यांची वाढती जवळीक असल्याची चर्चा होती. पण या वाढत्या जवळीकीचे कारण काय? चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यामधील “मैत्री”
भाजप महाराष्ट्रातील उद्धव सरकारवर 'तीन चाकी सरकार' म्हणून टीका करते, जे समतोल राखण्याचे आव्हान आहे. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष कुणापासून लपलेला नाही. सरकारमधील शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबत मतभेद झाल्याच्या बातम्या हेडलाईन्स होत आहेत. शिवसेना या 'डोकेदुखी'वर इलाज शोधत आहे आणि यावेळीही 'उपचार'ची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा नेता असलेल्या शिवसेनेनेही या सूत्रावर काम केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसशी शत्रुत्वाचे आवाज दाबण्यासाठी शिवसेना थेट केंद्रीय नेतृत्वाशी संबंध दृढ करण्याच्या मानसिकतेत आहे.
“संजय राऊत राजकारणातील एक अष्टपैलू नेतृत्व”
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातील राजकारणाचा नवा अध्याय लिहितील याची राजकीय पंडितांना कल्पनाही नव्हती, पण जितके श्रेय शरद पवारांना जाते, तितके या अशक्य युतीमागचे शिल्पकार शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे जाते. शरद पवार यांना भाजपसोबत जाण्यापासून रोखलं त्यातप्रमाणे शरद पवार यांनाही विश्वास नव्हता की काँग्रेस ही शिवसेनेसोबत सरकार स्थापना करेल. संजय राऊतांनी त्यांच्या वक्तव्यासोबतच त्यांच्या सामानातील फटकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांचा देखील त्यांनी सामानाच्या लेखनीतून समाचार घेतल्याच पाहायला मिळाल आहे.
शरद पवारांवर 'दबावाचे राजकारण'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या 15 दिवसात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. खरेतर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस भाजपसोबत येणार असल्याच्या चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू आहेत. वास्तव, त्याबाबतही अटकळ बांधली जात आहे. की शरद पवार हे काँग्रेस आणि शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवणार. यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे दोघे मिळून पवारांवर राजकीय दबाव टाकत असल्याच पाहायला मिळतंय
“पवार आणि गडकरींची गुप्त चर्चा”
संसदेच्या अधिवेशनादरम्यान, मोदी सरकारने कोरोनाच्या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी एक सादरीकरण सर्व पक्षीय नेत्यांसाठी करण्यात आलं होत. त्यासाठी काँग्रेसने हजेरी लावली नाही, ज्याला जोरदार विरोध होता, पण शरद पवार या ठिकाणी वेळेवर पोहचले आणि त्यादरम्यान पवारांनी नितीन गडकरींची भेटही घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात पवारांच्या भूमिकेबाबत विविध राजकिय अर्थ लावले जात आहेत.
“शिवसेना-काँग्रेस दोघांनाही मैत्रीची फायदा”
संजय राऊत यांच्या राहुल गांधी यांच्या जवळीकतेचा फक्त शिवसेनेला फायदा होईल असे नाही. या मैत्रीमुळे दोघांनीही समसमान फायदा होईल म्हणून पाहिले जात आहे. किंबहुना, राहुल गांधी यांच्या भविष्यकाळातील राजकारणाचे स्पष्ट संकेत जाणवत आहेत कि ते आता यूपीए बाहेरील पक्षांसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींना डीएमके, आरजेडी आणि जेएमएम सारख्या पक्षाचा समावेश आहे. मैत्री वाढवण्याच्या दिशेने ब्रेकफास्ट पार्टीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचं दिसतयं. राहुल गांधींनी बोलावलेल्या ब्रेकफास्टला तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शिवसेनेच्या प्रतिनिधींची उपस्थिती हे देखील मैत्री वाढवण्याबाबत भविष्यातील स्पष्ट संकेत दिसत आहेत.