Tokyo Olympic 2020 : दिवसाच्या सुरुवातीला अर्थातच महिला हॉकी सामन्यावर सर्वांचं लक्ष होतं .पण खरं सांगायचं तर पुरुष हॉकीच्या तुलनेत या सामन्यात तसं कमी टेन्शन आलं. कारण पुरुष हॉकी संघाला स्वतःच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी काहीतरी ऑलम्पिक ट्रॅक रेकॉर्ड तरी होता. परंतु, आजवर ऑलम्पिकमध्ये क्वालिफाय देखील न होऊ शकणाऱ्या महिला हॉकी संघाच इथवर पोचणं हेच खूप मोठ यश होतं. (आजवर महिला हॉकी टीम फक्त 1980,2016 ला पात्र झाली होती)


म्हणूनच आजचा सामना संपल्यावर ब्रिटनच्या हॉकी असोसिएशनने देखील भारतीय महिला संघाचे कौतुक करत तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे अशी टिप्पणी केली. बाकी मागच्या सामन्यांच्या तुलनेत या सामन्याची सुरुवात गोल 0 क्वार्टर न झाली. परंतु, ब्रिटनचा या क्वार्टरमध्ये सतत  हमला होत होता, तो सविता पुनियाने थोपवून धरला. पण दुसऱ्या कॉर्टरनं सगळी कसर भरून काढली. हा क्वार्टर लै तुफानी ठरला!


ब्रिटननं आपल्यावर काही मिनिटातच 2-0 अशी आघाडी घेतली. पण, आता इतक्या सामन्यानंतर भारतीय संघ कधीही कम बॅक करू शकतो ही मनात कुठेतरी खात्री निर्माण झाली होती आणि ती खरी ठरली क्वार्टर फायनलला ऑस्ट्रेलियासोबत आपल्यातर्फे एकमेव गोल करणारी गुर्जीत कौरनं काही मिनिटातच एकापाठोपाठ एक असे दोन गोल केले आणि नंतर याच ऑलम्पिकमध्ये हॅट्ट्रिक करणाऱ्या वंदना कटारियाने आणखीन एक गोल नोंदवत दोन गोलची पिछाडी भरून काढत आपल्याला 3-2 अशी बढत मिळवून दिली. पण, तिसऱ्या कोर्टरमध्ये येताना ब्रिटन एकदम आक्रमक मूड बनवून उतरला होता आणि त्यांनी या क्वार्टरमध्ये तीन-तीन अशी बरोबरी साधली.


चौथ्या क्वार्टरमध्ये आतापर्यंत पेनल्टी कॉर्नरचा फारसा उपयोग न करू शकणाऱ्या ब्रिटनने यावेळेस मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत 4-3 अशी आघाडी घेतली. तरीही आपण बरेच प्रयत्न केले. परंतु, ब्रिटनची गोलकीपर ही बरोबरी करण्याच्या मध्ये उभी होती आणि अखेर आपलं पोडियम फिनिश हुकलं. असो महिला हाकी संघाच्या प्रवासाचे महत्व अजून काही वेगळे सांगण्याची गरज नाही. 


कुस्तीमध्ये आपली शेवटची महिला कुस्तीपटू सीमा बिसला ही पहिल्याच राऊंडमध्ये फार काही चमक दाखवू शकली नाही आणि तिला हरवणारी पैलवान देखील नंतर पराभूत झाल्याने तीच ब्राँझंच स्वप्नदेखील संपलं.


पुरुष कुस्तीमध्ये मात्र आपला हुकमी एक्का बजरंग पूनिया पहिल्या राउंडमध्ये बचावात्मक खेळूनही सेम सेम पॉईंट असताना जिंकला. क्वार्टर फायनलमध्ये मात्र इराणच्या कुस्तीपटू सोबत तो पिछाडीवर असताना "रविकुमार पॅटर्न"न त्याने समोरच्याला चित्तपट करत सेमी फायनल गाठली. परंतु, गुडघ्याला पट्टी बांधून आलेला बजरंग शंभर टक्के फिट वाटत नव्हता. त्यात सेमीफायनलमध्ये त्याच्यासमोर तीन वेळचा विश्वविजेता समोर असल्याने त्याचा निभाव लागला नाही. असो उद्या त्याला ब्राँझ मिळवण्याची संधी आहे (इथेही कदाचित मी कालच्या पोस्टमध्ये म्हणल्याप्रमाणे ज्या खेळाडूंकडून मेडलच्या जास्त अपेक्षा होत्या त्यांच्याकडूनच अपेक्षेच्या दबावामुळे म्हणावी तशी कामगिरी होताना दिसत नाही.)


वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत आपल्या दोन खेळाडू होत्या. त्यापैकी प्रियंका ही 17 व्या क्रमांकावर राहिली जो समाधानकारक म्हणावा लागेल. (8 किमीपर्यंत तर ती शर्यंत लीड पण करत होती.)


या प्रकारात ती पुढच्या वेळी नक्की सुधारणा करू शकेल (या शर्यतीत इटलीची स्पर्धक जिंकली, 100 मीटर स्प्रिंट पण इटलीच्या स्प्रिंटरनं जिंकली अन् आज रिलेमध्ये पण त्यांनी एक गोल्ड मारलंय. पळायच्या अन् चालायच्या इव्हेंटमध्ये इटली वाल्यांनी लै धक्के दिलेत यावर्षी. काय केलय नेमकं बघायला पायजे)


400 मीटर रिले स्पर्धेत आपला संघ अंतिम फेरीसाठी पात्र जरी ठरला नसला तरी त्यांनी पूर्वी कतारच्या नावावर असलेलं आशियाई रेकॉर्ड मोडलं आणि अंतिम फेरीत आठ संघ पात्र ठरणार होते. अशा वेळी ते थोडक्यात नवव्या स्थानावर राहिले.


पण या व्यतिरिक्त आजचा दिवस खर्‍या अर्थाने गाजवला तो म्हणजे आपली गोल्फपटू आदिती अशोकने!


ती तिसऱ्या राउंडनंतर द्वितीय स्थानी आहे आणि उद्या चौथा आणि अखेरचा राउंड असल्याने तिला पदकाची अतिशय चांगली संधी आहे. (बाकी महागडी स्टिक घेऊन बॉल लांब हवेत उडवत समोरच्या होलमध्ये घालणे याव्यतिरिक्त गोल्फमधल मला पण काय कळत नाही. पण आज ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय जमलं तर त्यावर वेगळी पोस्ट टाकीन आणि उद्या आयुष्यात पहिल्यांदा गोल्फ बघेन सुद्धा)


उद्या आपल्या ऑलिम्पिकचा तसा शेवटचा दिवस असणार आहे. परंतु, शेवटी शेवटी आपल्याला उद्या पदकाच्या तीन संधी असणार आहेत.


गोल्फमध्ये आदिती अशोक, कुस्तीमध्ये बजरंग पूनिया आणि भाला फेकमध्ये नीरज चोप्रा! ऑलिम्पिकच्या तिसऱ्या, चौथ्या दिवशी मी आपल्याला किमान सहा पदकं तरी मिळतील असं म्हणलं होतं त्याचं उद्या काय होते ते बघूया.


गोड शेवटाच्या अपेक्षेसह आज इतकच..