टेरेंस मॅकस्विनी यांच्याबद्दल आज भारतात अनेकांना माहित नाही, पण एके काळी ते जगातील एक महापुरुष होते. भारतामध्ये त्यांच्या नावाचा आदर आणि सन्मान केला जात होता. भारतात, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख सदस्य आणि भगतसिंग यांचे जवळचे सहकारी जतीन दास यांचा सप्टेंबर 1929 मध्ये दीर्घ उपोषणानंतर तुरुंगात मृत्यू झाला तेव्हा त्यांना 'टेरेंस मॅकस्विनी ऑफ इंडिया' असे संबोधण्यात आले. टेरेन्स मॅकस्विनी यांचे 1920 मध्ये 25 ऑक्टोबर रोजी निधन झाले. सामान्य लोक आयर्लंडची कल्पना कवितेचा, राजकीय बंडखोरांचा आणि चौफेर हिरवळीचा देश म्हणून करतात आणि हे खरे सुद्धा आहे. आपल्या भूमीसोबत जोडले गेलेले मॅकस्विनी हे कवी, नाटककार, छोट्या पुस्तकांचे लेखक तसेच राजकीय क्रांतिकारक होते, जे आयरिश स्वतंत्र संग्रामच्या लढाईमध्ये साउथ वेस्ट आयर्लंडमध्ये स्थित असणाऱ्या कॉर्कचे लॉर्डचे महापौर म्हणून निवडले गेले होते.
त्या काळात भारतातील राष्ट्रवाद्यांनी आयर्लंडच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवले होते. ब्रिटीश राजवटीत जरी भारतातील आयरिश वंशाच्या लोकांनी अत्याचार करण्यात कोणतीही कसर सोडली नसली तरी त्याआधी स्वतः आयरिश लोक ब्रिटीश लोकांचे बळी ठरले होते आणि त्यांनी वसाहतवादाच्या विरोधात जोरदार लढा दिला होता. इंग्रजांनी आयरिश लोकांचा उपयोग भारतातील त्यांच्याविरुद्धचे बंड दडपण्यासाठी केला. तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणणारे रेजिनाल्ड डायर आठवतो? त्याचा जन्म मुरे (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला, परंतु त्याचे शिक्षण कॉर्क काउंटीमधील मिडलटन कॉलेजमध्ये आणि पुढे आयर्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनमध्ये झाले.
तसेच जालियनवाला बाग हत्याकांडाला कारणीभूत असणारे पंजाबचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर माइकल ओ’ड्वायर हे लिमेरिक येथे जन्मलेले आयरिश होते. ओ’ड्वायरनेच डायरला या हत्याकांडाला परवानगी देण्याची खुली परवानगी दिली होती आणि नंतर भारतीयांच्या या घृणास्पद हत्येला 'लष्करी गरज' म्हटले होते.
इंग्लंडने भारतात अशा फार कमी गोष्टी केल्या आहेत ज्या त्यांनी यापूर्वी आयर्लंडमध्ये केल्या नाहीत. त्याने आयर्लंडला गरीब देश बनवले आणि तेथील लोकांना माणसापेक्षा खालचा दर्जा दिला. पोपशी निष्ठा ठेवणाऱ्या आयरिश लोकांचा त्याने वारंवार अपमान केला आणि त्यांचे अंधश्रद्धाळू कॅथलिक असे वर्णन केले. 1897 मध्ये जन्मलेल्या,मॅकस्विनी यांनी त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 1913-14 पर्यंत त्यांची छाप लोकांवर पाडली. आयरिश स्वयंसेवकांसह देशातील लोकांसाठी सर्व हक्क आणि स्वातंत्र्यांसाठी एक संघटना स्थापन करण्याबरोबरच, त्यांनी देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या सिन फेन या राजकीय पक्षाची स्थापना केली.
आयर्लंडमध्ये एप्रिल 1916 च्या इस्टर उठावादरम्यान मॅकस्विनी पूर्णपणे सक्रिय होते. ही सशस्त्र क्रांती सहा दिवस चालली, जी ब्रिटिश सैन्याने आपल्या तोफखाना आणि प्रचंड लष्करी बळाने दाबून टाकली. डब्लिनचा बराचसा भाग ढिगाऱ्या खाली आला होता. हे बंड इतिहासाच्या पानांत हरवून जाण्याची शक्यता नाही, परंतु महान कवी विल्यम बटलर येट्सने आपल्या 'इस्टर 1916' या कवितेमध्ये 'सर्व बदलले, पृथ्वीचे बदलले/ए टेरिबल ब्युटी इज बॉर्न' असे लिहून हे बंड अमर केले. पुढची चार वर्षे, मॅकस्विनी यांनी राजकीय कैदी म्हणून ब्रिटीश तुरुंगातच्या आत आणि बाहेर करत होते.
जेव्हा मॅकस्विनी यांनी ऑगस्ट 1920 मध्ये उपोषण सुरू केले तेव्हा त्यांनी भारत आणि उर्वरित जगाच्या लक्ष वेधले. त्यांना 12 ऑगस्ट रोजी 'देशद्रोही लेख आणि कागदपत्रे' ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. ही त्यावेळची आजची भारताची परिस्थिती होती. आणि काही दिवसांतच न्यायालयाने त्याला इंग्लंडमधील ब्रिक्स्टन तुरुंगात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर मॅकस्विनी यांनी ट्रिब्यूनलसमोर घोषित केले, 'मी माझ्या तुरुंगवासाची मुदत निश्चित केली आहे. तुमचे सरकार काहीही करू देत, महिनाभरात मी मोकळा असेन, मृत अथवा जिवंत.'
त्यांना शिक्षा देणाऱ्या लष्करी न्यायालयाचा त्यांच्यावर कोणताही अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी उपोषण सुरू केले तेव्हा इतर अकरा रिपब्लिकन कैदी त्याच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. अमेरिकेतून आयरिश रिपब्लिकनला पाठिंबा देणारी आयरिश लोकसंख्या त्यांच्या बाजू घेत होती, तसेच मॅड्रिडपासून रोमपर्यंत आणि ब्युनोस आयर्स आणि न्यूयॉर्कपासून दक्षिण ऑस्ट्रेलियापर्यंत मॅकस्विनी यांच्या सुटकेसाठी अनेकांनी मेहनत घेतली. मुसोलिनी आणि कृष्णवर्णीय राष्ट्रवादी मार्कस गार्वे यांनीही त्याच्या सुटकेची मागणी केली.
जसजसे दिवस पुढे जात होते तसतसे मॅकस्विनी यांच्या समर्थकांनी त्यांनी उपोषण संपवण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली, तर तुरुंगात असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्याला सक्तीने खायला घालण्यासाठी कठोर प्रयत्न केले. ऑक्टोबर 1920 रोजी, मॅकस्वीनी कोमात गेले आणि 25 ऑक्टोबर रोजी, त्यांच्या उपोषणानंतर 74 दिवसांनी त्यांचे निधन झाले. आयर्लंडप्रमाणे भारतही मॅकस्विनी यांच्या निधनाच्या शोकात बुडाला होता. मॅकस्विनी यांच्यामुळे गांधी प्रभावित झाले होते, असे अनेकांचे मत आहे, पण जिद्द, देशप्रेम आणि सहनशीलता हेच आपले सामर्थ्य बनवणाऱ्या गांधींनी उपवास आणि उपोषण यातील फरक कायम ठेवला यात शंका नाही. मॅकस्विनी सशस्त्र क्रांतिकारकांसाठी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी हिरो होते.
मॅकस्विनीच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्यांची मुलगी इंदिरा यांना लिहिलेल्या पत्रात नेहरू यांनी लिहिले की,'या आयरिश उपोषणाने आयर्लंडसह संपूर्ण जगाला 'व्याकूळ' केले.' नेहरू यांनी लिहिले, 'जेव्हा त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा त्यांनी घोषणा केली. तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की, मी मृत अथवा जिवंत अवस्थेत तुरूंगाच्या बाहेर येईल. अखेर 75 दिवसांनी त्यांचा मृतदेह तुरुंगातून बाहेर काढण्यात आला.१९२९ च्या मध्यात भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि लाहोर कटात तुरुंगात टाकलेल्या इतर सेनानींनी 'राजकीय कैदी'चा दर्जा मिळावा या मागणीसाठी उपोषण केले तेव्हा त्यांना गांधींना नाही तर मॅकस्विनी यांचा आदर्श घेतला होता. बंगालचे राजकीय कार्यकर्ते आणि बॉम्ब निर्माता जतींद्र नाथ दास देखील या उपोषणात सामील झाले. त्यांचा तुरुंगातील खराब परिस्थिती आणि राजकीय कैद्यांच्या हक्कांला विरोध होता.
63 दिवसांच्या उपोषणानंतर 13 सप्टेंबर 1929 रोजी जतीन यांचे निधन झाले. सारा देश दु:खाच्या सागरात बुडाला होता. नेहरू यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, 'जतीन यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली.' दास यांना कलकत्ता येथे अंतिम निरोप देण्यात आला आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
उपोषण करण्यात गांधी आघाडीवर असतील, पण आधुनिक इतिहासातील उपोषणाची सुरुवात टेरेंस मॅकस्विनी यांच्यापासून होते. असे असू शकते की विशेषतः मॅकस्विनीच्या निधनानंतर, गांधींनी हे ओळखले आहे की उपोषणामुळे केवळ राजकारणाच्या रंगभूमीकडेच राष्ट्रीय लक्ष वेधले जात नाही, तर जगभरात वैचारिक गोंधळ निर्माण होतो.
तथापि, भारतातील यांची कमॅकस्विनीथा त्यांच्या लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या लढ्याव्यतिरिक्त इतर अनेक कारणांसाठी ओळखली गेली पाहिजे किंवा लक्षात ठेवली पाहिजे. माझ्या मते, इंग्लंडने भारताचा नाश करण्यापूर्वी, आयर्लंडला अविकसित ठेवले होते. अनेक मार्गांनी, त्याने आयर्लंडला भारतात लागू केलेल्या सर्व धोरणांची प्रयोगशाळा बनवले. ज्यात जमीन सेटलमेंट, कर आकारणी, दुष्काळमुक्ती, बंड, दडपशाहीचा समावेश आहे. भारतात आलेल्या आयरिश लोकांची कहाणी सांगते की जे अत्याचारित आहेत ते इतरांवर अत्याचार करतात. भारताच्या वसाहतीकरणात आयरिश लोकांची भूमिका हा तपशीलवार अभ्यासण्याचा विषय आहे.
दुसरीकडे, टेरेन्स मॅकस्विनीची यांची आख्यायिका एका जटिल इतिहासाकडे देखील निर्देश करते ज्यामध्ये अलिकडच्या वर्षांत काही इतिहासकारांनी इंडो-आयरिश एकतेबद्दल संशोधन केले. उदाहरणार्थ, भारतीय लोक आयरिश स्त्री अॅनी बेझंटशी बर्याच काळापासून परिचित आहेत, परंतु त्यांच्या योगदानबद्दल, सहकार्याबद्दल आणि संयुक्त संघर्षाबद्दल वेगवेगळी माहिती आहे. ज्या वेळी संकोचवाद आणि राष्ट्रवादाच्या हवेत जगात इतर वंशांच्या लोकांचा किंवा परकीयांचा द्वेष करणे सामान्य झाले आहे, तेव्हा मॅकस्विनीची कथा मानवतेच्या उत्तुंगतेचे महत्त्वपूर्ण संकेत देते.
टीप- वर दिलेली मते आणि आकडेवारी ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या मतांशी एबीपी माझा सहमत असेलच असे नाही. तसेच या लेखाशी संबंधित सर्व आक्षेप आणि दाव्यांची जबाबदारी केवळ लेखकांची असेल.