Slumdog CA: लहानपण शिरूरमधल्या पत्र्याच्या घरात घालवलेल्या सी ए अभिजित थोरात यांची ही कथा.  लहानपणी चौकात थांबलेल्या मुलांच्या बोलण्यातून 'हा कोणाचा रे?', ' सुभद्रा थोरातचा' अरे, याची आई म्हणजे ठेवलेली आहे. हे असं बोलणं आपल्या आईबद्दल ऐकणं हे खरोखर कानात गरम तेल ओताव इतक जास्त भयंकर वाटणारं आहे.  ही वाक्य त्या परिस्थितीची माहिती देतात.  बालवाडीत शाळेत जाताना असलेली स्थिती आणि शिकण्याची इच्छा त्यांना घडवत होती. बालवाडीनंतर पुढील शिक्षण हे चांगल्या शाळेत करू दे ज्याने अभिजीत खूप जास्त चांगला तयार होईल हे, त्यावेळी आईच्या मैत्रिणीने सांगितलेली गोष्ट सीए होण्याच्या प्रवासात अभिजित थोरात यांना फायद्याची ठरली. त्याच शाळेत असताना अभ्यासासाठी लावलेल्या शिकवणीसाठी द्यायला पैसे नसल्याने शिवणकाम करत जास्तीचे ब्लाऊज शिवून देईल हे म्हणत आपल्या लेकासाठी केलेली धडपड डोळ्यात पाणी आणते. तर सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे असणाऱ्या असंख्य गोष्टींची जाणीव देखील करून देते. बालवाडीपासूनच आपल्याला परिक्षेत मार्क मिळवल्यानंतर दप्तर मिळणार, आपण खूप अभ्यास केला तरच आपली परिस्थिती बदलू शकते हा शाळेपासून डोक्यात असलेला विचार मनाची तयारी करवणारी होती. अर्थात या प्रवासात सुरूवातीला शाळेत असताना सगळ्या परिक्षेत पहिला क्रमांक मिळण्यासाठी घेतलेले कष्ट हे सीए होण्याच्या प्रवासाची सुरूवात करणारी ठरली. हे सुद्धा तितकेच महत्वाचे. 


त्यावेळी गावातील मित्रांसोबत एका लग्नामध्ये वाढपी म्हणून गेल्यानंतर मिळणारे 300 रूपयांपासून ते छोट्या काही कामांसाठी मित्रांसोबत लिंबू सरबताची गाडी लावून मिळालेला अनुभव. आणि त्यानंतर तर पेरू विकण्यासाठी त्या पेरूच्या गाडीसाठी केलेला जुगाड आणि विक्री करताना वर्गातील मुलांनी पाहिल्यावर ती मुलं हसणार आणि चिडवणार हे माहिती असून सुद्धा त्यावेळी डोक्यात आलेला हा विचार जो समोरच्यानी काहीही बोलल्यानंतर त्यावेळी असणारी परिस्थितीच या सगळ्या लाजण्यावर नाही म्हणायला शिकवून गेली. ज्यातून स्वत:चा विचार अधिक करायचा असतो. हे स्पष्टपणे जाणवलं. 


सीए होण्यासाठी पुण्यात असणाऱ्या क्लासच्या ‘फी’साठी विक्रांत दादाने 16 हजारांची मदत केली.  लायब्ररमध्ये केलेली अभ्यासातील मदत ही सीए होण्याच्या वाटचालीसाठी किती महत्वाची मदत करणारी ते  जाणवतं. दत्तवाडीमध्ये राहण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि अगदी चहासाठी लागणाऱ्या पैशाचा सुद्धा येणारा विचार खूप लहानसहान गोष्टीची किम्मत करायची असते याचा विचार करायला भाग पाडते. तर स्वत:च्या आयुष्यात कधीही न पाहिलेला पलंग, स्वच्छ बेडशीट सुद्धा किती समाधान आणि आनंद व्यक्त करून गेली हे वाचताना देखील जाणवतं. पुण्यात सुरूवातीला मेसचं जेवण करताना मऊ पोळी आणि ताटात वाढत असलेला भात हा पहिल्यांदाच पाहून वाटणारी भावना सुद्धा त्यावेळी असणारी परिस्थितीचा विचार करायला भाग पाडते.  या प्रवासासोबतच अखेरीला सोबती असेलेलं ‘प्रांजळ’ प्रेम हे सीए होण्याच्या आनंदा इतकेच मोठं वाटून जाणारे.


स्लमडॉग सीए पुस्तकातील संघर्षमय कथा खूप काही शिकवून जाते. आपल्याला छोट्या गोष्टीत हरून गेल्यासारखा विचार हि कथा वाचल्यावर कथानकातील अभिजीतच्या त्या गोष्टीची चिंता आणि परिस्थितीची जाणीव कशी ते सांगते. मित्रांसोबत घालवलेला वेळ आणि त्यांनी पाठिशी थांबून केलेली मदत आपल्याला आपल्या मित्रांची जाणीव करून देतात.  तर मित्रांची सोबत ही किती हक्काची असू शकते हे देखील समजते. 


अगदी खरतरं कॉमर्सच्या अभ्यासानंतर असणाऱ्या अभ्यासानंतर 'सी ए' चा अभ्यास असतो हे माहिती पण तो प्रवास सुद्धा एखाद्या परिसिथीमुळे कठीण होवून जातो. ही संघर्षमय कथा *स्लमडॉग CA* या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्या कथेत वेगळेपण होतं. गरिबीतून सुरू झालेला प्रवास सी ए होई पर्यन्तची *एक संघर्षमय कथा* परिस्थिती सोबतच अनेक बाजूंचा विचार करायला लावत, ही कथा अनेक बाजू शिकवते. घरात आईने शिवणकाम काम करून मुलाला मोठं केलं. पैशाची अडचण दूर करण्यासाठी मेसच्या काकूने जेवणासोबत दिलेली साथ परिस्थिती डोळ्यासमोर उभी करते. छोटं छोटं काम करून मिळवलेले पैसे आणि मित्रांची सोबत; दिवसाच वेळेचं केलेलं नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी ही वेळ ओळखण्यासाठी मदत करते. कोणतीही वेळ आली तर ती स्वीकारायची असते; काहीवेळेस एखादी वाईट गोष्ट सुद्धा आपल्याला त्यातली चांगली बाजू शिकवते हे समजत; आपलं जरी कोणी नसलं तरी अचानक आलेली माणसं प्रेमानी सोबत राहतात हे कथेतून जाणवत.  


स्लामडॉग CA हे पुस्तक  जिद्द, यश, संघर्ष, कष्टाच्या तयारी हे सर्व काही शिकवून जाते. पुस्तकामधील कथा वाचताना पाणवणारे डोळे जीवनप्रवासाची माहिती देतात. छोट्या छोट्या भागातून केलेले अभिजित थोरातांच्या संघर्षमय कथा प्रत्येकाने जरूर वाचावी.


BLOG: राजस्थान 'कला' और 'किले' की पहचान...