रॉजर रॉबर्ट फेडरर. टेनिस जगताचा अनभिषिक्त सम्राटटेनिस कोर्टच्या या बादशहाने आजपर्यंत एकेरीतील 19 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. नुकतच वयाच्या 35 व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धा जिंकून त्याने विक्रमी 8 वेळा विम्बल्डन चषकावर आपलं नाव कोरलं आणि पिट सांप्रस व विलियम रेनशॉ यांचा सर्वाधिक जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला. टेनिस मधील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या केवळ 7 टेनिसपटूंमध्ये रॉजर फेडररचा समावेश आहेइतकंच नव्हे तर एटीपी च्या जागतिक क्रमवारीत फेडरर तब्बल 302 आठवडे पहिल्या क्रमांकावर होता.



अशा या महान खेळाडूला अख्खं जग अव्वल टेनिसपटू म्हणून ओळखत. पण फेडररची फक्त एवढीच ओळख नाहीय. खेळाबरोबरच त्याने सामाजिक बांधीलकीही जपली आहेस्वित्झर्लंडचा हा महान टेनिस स्टार गेली 13 वर्षे रॉजर फेडरर फाउंडेशन या आपल्या संस्थेमार्फत स्वित्झर्लंड आणि आफ्रिकेतील गरीब मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतोय.



फेडररने 2003 साली  वयाच्या केवळ 22 व्या वर्षी रॉजर फेडरर फाऊंडेशनची स्थापना केली. रॉजरच्या मते शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी मुलांना सक्षम बनवते. चांगल्या शिक्षणानं मुलांचं सशक्तीकरण होतं आणि त्यांचं भविष्य उज्वल होण्यास मदत होते. यासाठीच गेली 13 वर्ष रॉजर फेडरर फाउंडेशन कार्यरत आहे. 7 देशातील लाखो मुलांना शिक्षणाची दारं या संस्थेन उघडून दिलीत आणि 2018 पर्यन्त 10 लाखाहून अधिक मुलांना या प्रवाहात आणण्याचा फेडरर आणि त्याच्या टीमचा मानस आहे.



मुख्यत्वेकरून आफ्रिकेतील अतिमागास देशांमध्ये रॉजर फेडरर फाऊंडेशन काम करते. यात झांबियामलावीदक्षिण अफ्रिकाबोट्सवानानामीबियाझिम्बाब्वे यांचा समावेश आहे. प्रचंड गरीबी आणि मागसलेपण यामुळे इथली मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक मैल दूर आहेत. परंतु फेडररच्या उपक्रमामुळे या देशातील 2 लाख 77 हजार हून अधिक मुलांना याचा फायदा झालाय. यात झांबियातील 53 हजार , मलावीतील 62 हजार, झिम्बाब्वेतील 78 हजार, दक्षिण आफ्रिकेतील 75 हजार तर बोट्सवाना आणि नामीबियातील 4 हजार 500 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे.  स्वित्झर्लंडमधीलही शिक्षणापासून वंचित 700 हून अधिक मुलांना फेडररने आपल्या संस्थेमार्फत आधार दिलाय.  शिक्षणाबरोबरच मुलांच्या अंगभूत कौशल्याना वाव देणारे अनेक उपक्रम देखील या संस्थेमार्फत राबवले जातात. महत्वाच म्हणजे फेडरर या संस्थेच्या सर्व उपक्रमात हिरारीने भाग घेतो. आफ्रिकेच्या तळागाळातील शाळांमध्ये जाऊन तो मुलांना शिक्षणाचे धडे देतो तर कधी त्यांच्यासोबत जेवणही करतो आणि एवढच नाही तर तो त्यांच्यासोबत टेनिस देखील खेळतो.



फेडररने आतापर्यंत फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक परोपकारी संस्थांना मदत केली आहे. त्याने हरिकेनकतरीना2004 चा हिन्दी महासागरातील भूकंप आणि त्सुनामी2010 चा हैती भूकंप इत्यादि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संकटपिडित लोकांच्या मदतीसाठी प्रदर्शनीय सामनेही खेळले आहेत. टेनिसमधील अब्जावधी रूपयांच्या कमाईतील फार मोठा वाटा तो या समाजउपयोगी कामांसाठी खर्च करतो. 



खरतर 8 विंबल्डन, 5 अमेरिकन ओपन, 5 ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक फ्रेंच ओपन अशी एकूण 19 ग्रँडस्लॅम विजेतीपद मिळवून टेनिसमधली भली मोठी कमाई केल्यानंतर कोणत्याही खेळाडूला आकाश ठेंगण झाल असत. मात्र फेडररचे पाय अजून जमिनीवरच आहेत. रॉजर फेडरर फाऊंडेशनला आज 13 वर्ष झाली आहेत पण फेडररच्या मते ही फक्त सुरूवात आहे.  खरच फेडरर खेळाडू म्हणून नक्कीच श्रेष्ठ आहे मात्र सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा जो वसा त्याने घेतलाय त्यावरून तो माणूस म्हणून किती महान आहे हेही सिद्ध होतं.