साल 1708...

ब्रिटनची राणी अॅनी (ओलिवा कोलमन) फ्रान्ससोबतच्या युद्धच्या विजयात असते, मात्र सारा चर्चिल (रेचल वेझ) जी सुभेदाराची पत्नी आणि स्वत: सुभेदार आहे, ती युद्ध सुरुच राहणार असल्याचं राणीला सांगते. मात्र खालावलेल्या तब्येतीतही अॅनी काही गोष्टी प्रशासनाच्या करत असते. राणीच्या माध्यमातून संसदेत आपला प्रभाव निर्माण करण्याच्या हेतूनं सारा तिच्यासोबत असल्याच सुरुवातीला दिसते.

राणीला मात्र राजकारणापासून दूर राहण्याचीच इच्छ अनेकदा दिसते. राणी अॅनीला रेसिंग बक्स (बदकांची शर्यत)सारख्या खेळासोबतच ससे पाळण्यात जास्त सर असतो. अगदी नॉर्मल सुरु असलेल्या स्टोरीत जेव्हा अॅबीगेलची (एमा स्टोन) एण्ट्री होते, तेव्हा खरी कहाणी सुरु होते.



अॅबीगेल राजवाड्यात कामासाठी येते. सुरुवातीला सारा तिला स्वयंपाक घरातील साफसफाईचं काम देते. मात्र सत्तेची भूक अॅबीगेलमध्ये इतकी असते की ती खूप कमी काळात राणी अॅनीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. मात्र साराला तिच्या प्लॅन्सबद्दल शंका येताच ती तिच्यावर पाळत ठेवते. राणी अॅनी आणि सारामध्ये लैंगिक संबंध असल्याचा अॅबीगेलला समजते. त्यानंतर मात्र अॅबीगेलच्या प्रवासाला नवी दिशा मिळते.



राणीच्या जवळ अॅबीगेल जातेय हे लक्षात आल्यानंतर सारा तीला चाबकाने सुद्धा बडवते. मात्र, मोठं होण्याची भूकेमुळे अॅबीगेल काही माघार घेत नाही. युद्धाच्या कामात गुंतलेली सारा आणि एकटी पडलेली राणी पाहून अॅबीगेल राणीच्या जवळ जाते. तीला आपल्यात गुंतवते, परिणामी राणीसोबत लैंगिक संबंध जोडते. त्यानंतर सारा आणि अॅबीगेलमधला संघर्ष टोकाला जातो. त्यात अॅबीगेल साराच्या चहामध्ये विष कालवते, त्यावरुन आपल्याला तिच्यातली सत्तेची भूक कळेलच! मात्र, विष प्यायलेली सारा जंगलात घोडस्वारीसाठी जाते ती परत येतच नाही.



साराचं गायब होणे आणि राणीचं वाढलेलं आजारपण त्यामुळं देश संकटात आल्याची भावना संसदेतून व्यक्त केली जात असते. त्यावेळी राणी आपल्या कक्षातच सगळ्या नेत्यांना बोलावते त्यावेळचं हे दृश्य वरच्या फोटोत दिसते.

काही काळानंतर सारा एका वेश्यावस्तीतून जिवंतपणे राजवाड्यात येते. तिच्या तोंडावर जखमांचे निशाण तसेच असतात आणि त्यातून अॅबीगेलविरोधात बदला घेण्याची तीव्रता दिग्दर्शकानं ठळकपणे मांडली.

चित्रपटाच्या शेवटी अबीगेलचा विजय दिसतो. मात्र दोघींमधला संघर्ष दोन तास प्रेक्षकांना चांगलाच खिळवून ठेवतो. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाच्या फ्रेम्स. कॅमेऱ्यावर खेळणाऱ्या प्रत्येकाला आवडेल हे नक्की.  तीन महिलांच्या शारीरिक गरजा आणि सत्तेच्या भूकेचं परफेक्ट उदाहरण म्हणजे ‘द फेव्हरिट’ आणि म्हणून चित्रपटाला 10 नामांकनं मिळवणाऱ्या या चित्रपटाला मी प्रमुख दावेदार मानतो.

चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा: