उत्तरायणाचा आरंभ होण्याचा दिवस, अर्थात मकरसंक्रांत हा भारतातील प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकरसंक्रांतीच्या नंतर दिवसाचा आकार मोठा होत जातो.


उत्तरायण (Uttarayana) आणि मकर संक्रांती (Makar Sankranti 2024) समजून घेताना... भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये लोहरी अशा विविध नावांनी हा दिवस भारतभर साजरा केला जातो. उत्तरायण सुरू होण्याचा दिवस, अर्थात मकरंक्रांती हा प्रामुख्याने गुजरातमध्ये साजरा केला जातो. या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा गुजरातमध्ये आणि भारताच्या इतरही भागांत आहे. नव्या आशादायी सुरुवातीचं, चांगल्याने वाईटावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा, भविष्याकडे वाटचाल करण्याचा संदेश हा सण देतो. आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या, आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीतही या सणांनी दिलेला संदेश महत्त्वाचा आहे. भारतीय लोकांनी तर हा संदेश समजून घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल. 


पतंग उडवण्याचं महत्त्व


सूर्याचा उत्तरायणात प्रवेश होतो त्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा भारतभर आहे. ही केवळ प्रथा नसून या कृतीतून आर्थिक नियोजनाच्या संदर्भात काही धडे घेतले जाऊ शकतात. हवा आणि इतर गोष्टींचे अडथळे पार करत पतंग ज्याप्रमाणे उंच आकाशात उडत असतो, त्या पतंगाप्रमाणे निर्भय होऊन प्रत्येकाने आपलं आर्थिक नियोजन करायला हवं.


कौशल्य आणि संयम : पतंग उडवण्यासाठी जशी संयमाची आणि कौशल्याची गरज असते, तशीच प्रभावी आर्थिक नियोजन करण्यासाठीही हे दोन गुण अत्यंत आवश्यक असतात. गुंतवणूक करताना संयम बाळगणे आणि मार्केटमधील संधी, तसेच ट्रेंड्स समजून घेण्याचं कौशल्य आत्मसात करणे या दोन्ही गोष्टी गुंतवणूक करताना महत्त्वाच्या ठरतात.


योग्य वेळ साधण्याचं कसब: पतंगाचा धागा योग्य वेळी खेचण्याचं आणि योग्य वेळी पतंगाला ढील देण्याचं कसब पतंग उडवण्यासाठी आवश्यक असतं. त्याचप्रमाणे वैयक्तिक आर्थिक निर्णय घेताना कोणतीही कृती करण्याची योग्य वेळ कोणती हे समजणंही गरजेचं आहे. स्टॉक, म्युच्युअल फंड (इक्विटी किंवा डेब्ट), गोल्ड बॉण्ड्स, रिट्स यापैकी कोणत्याही पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असताना योग्य वेळ कोणती, हे ओळखण्याचं कौशल्य गुंतवणूक करत असताना महत्त्वाचं ठरतं.


मार्केटची हवा समजून घेताना: ट्रेंड्स आणि गुंतवणुकीचे नियोजन


पतंग उडवताना हवेची दिशा काय आहे याचा अचूक अंदाज यावा लागतो. त्याचप्रमाणे वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना मार्केटची हवा कोणत्या दिशेने वाहते आहे याचाही अंदाज घेणं महत्त्वाचं आहे. कोणतंही नियोजन न करता गुंतवणूक केल्यास ती यशस्वी होत नाही. पतंग हवेत सोडताना ज्याप्रमाणे पतंग उडवणारी व्यक्ती हवेचा अंदाज घेते, त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करत असताना मार्केट ट्रेंड्स काय आहेत याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर त्या त्या वेळचे इतर आर्थिक निर्देशक, आणि आपण ज्या ठिकाणी पैसे गुंतवत आहोत त्या असेटची संपूर्ण माहिती गुंतवणूकदारांनी घ्यायला हवी. अशा वेळी मार्केटमध्ये सुरू असलेल्या घडामोडी, आर्थिक धोरण, विशिष्ट क्षेत्रात घडत असलेल्या घटना इत्यादी सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. 


योग्य गुंतवणूक कशी करावी?


मकर संक्रांती हा पेरणीचा सण आहे. योग्य जमिनीत बी पेरल्यानंतर, त्याची योग्य काळजी घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्यातून भरघोस उत्पन्न मिळतं. मकर संक्रांतीला हे यश साजरं केलं जातं. गुंतवणुकीच्या बाबतीत, आपण जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारे उत्पन्न, अर्थात रिटर्न्सही भरघोस असतात. 


डायव्हर्सिफिकेशन ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात त्याप्रमाणे गुंतवणूकदारांनी ही आपली गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्सिफाय करणं गरजेचं असत. त्यातून जोखीमही कमी होते आणि चांगले रिटर्न्स मिळण्याच्या शक्यताही वाढतात.


दीर्घकालीन नियोजन शेती करत असताना दीर्घकालीन नियोजनाचे आणि दूरदृष्टीची गरज असते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करत असताना दीर्घकालीन विचार करायला हवा. दूरच्या भविष्याचा विचार करून आपली आर्थिक ध्येय निश्चित करायला हवीत.


पतंगाची ताणलेली दोरी आर्थिक नियोजन करत असताना जोखीम आणि नियंत्रण यांच्यातलं संतुलन


पतंगाच्या दोरीला मांजा असे म्हणतात. पतंग उडवत असताना या मांजाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे ते सहाय्याने पतंग उडवणारी व्यक्ती पतंगाला नियंत्रित करत असते. हा मांजा गरजेपेक्षा जास्त ताणलेला असेल किंवा कमी ताणलेला असेल तर पतंग हवेतून खाली पडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे गुंतवणूक करत असताना अत्यंत कमी रिस्क किंवा खूप जास्त रिस्क घेणे हे गुंतवणूकदारांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करत असताना त्याच वेळी कमी जोखीम असलेली आणि स्थिर गुंतवणूक करून आपल्याला आपले असेट्स डायव्हर्सिफाय करता येतात. मांजाला योग्य ताण असलेला पतंग ज्याप्रमाणे आकाशात मुक्त संचार करतो त्याचप्रमाणे आपली गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी योग्य प्रमाणात रिस्क घेणे महत्त्वाचे आहे.


मार्केटमधील अनिश्चिततेचा सामना कसा करावा?


पतंग हवेत असताना त्याला अस्थिर हवेचा सामना करावा लागतो. अस्थिरता हा जसा हवेचा गुणधर्म आहे तसाच तो भारतातल्या मार्केटचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा चढ उतारांच्या वेळी गोंधळून न जाता त्यांना हुशारीने सामोरं जाण्याची क्षमता गुंतवणूकदारांकडे असायला हवी. एखादा सराईत पतंग उडवणारा माणूस ज्याप्रमाणे अस्थिर हवेतही आपला पतंग स्थिर ठेवू शकतो, तसं गुंतवणूकदारांनाही अस्थिर असलेल्या मार्केटमध्ये स्थिर राहण्याचं कौशल्य आत्मसात करायला हवं.


मांजा: किमान नुकसान हेच तत्व


पतंग उडवण्याच्या खेळात आपला मांजा वापरून दुसऱ्या पतंगाचा मांजा कापायचा असतो. हे करण्यासाठी खूप कौशल्य आणि योग्य वेळ साधण्याचं कसब असायला लागतं. वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या बाबतीत याचा संदर्भ किमान नुकसानाच्या तत्वाशी जोडला जाऊ शकतो. एखाद्या असेटमध्ये पैसे गुंतवण्याची आणि पैसे काढून घेण्याची योग्य वेळ कोणती, हे समजणं गुंतवणूक यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एखादं नॉन पर्फॉर्मिंग असेट असो, घसरत चाललेला स्टॉक असो किंवा म्युच्युअल फंड असो, गुंतवणुकीचा किंवा गुंतवणूक काढून घेण्याचा योग्य केली घेतलेला निर्णय होणारं नुकसान टाळू शकतो.


चुकांमधून शिकावं कसं? 


पतंग उडवणे ही संयमाची परीक्षा असते. एखाद्या वेळी आपला पतंग काटला गेला तर पुन्हा दुसऱ्या वेळी समोरच्या व्यक्तीचा पतंग कापण्यासाठी सज्ज व्हावं लागतं. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये केलेली प्रत्येक गुंतवणूक रिटर्न्स मिळवून देईलच असं नाही. त्यामुळे अपयशातून शिकत जाणं आणि पुढे निर्णय घेताना सजग राहणं हा आर्थिक वाढीचा सर्वोत्तम मार्ग आहे.


टीमवर्क आणि मार्गदर्शन: आवश्यक तिथे अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या


पतंग उडवण्याच्या प्रक्रियेत टीमवर्कची गरज असते त्यात एक जण पतंग नियंत्रित करत असतो तर दुसरा मांजा सांभाळत असतो. आर्थिक नियोजन करत असताना अनुभवी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतल्यास आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिल्यास चांगला फायदा होऊ शकतो. पतंग उडवण्यात तरबेज असलेली एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे हवेत असलेल्या पतंगाला अस्थिर वाऱ्याशी स्पर्धा करायला शिकवतो, त्याप्रमाणे आर्थिक विषयातील अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ संतुलित राखण्यासाठी मदत करतात. 


दान करण्याचं समाधान: वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना दानाचं महत्त्व


आपल्याकडे जे आहे ते इतरांनाही देण्याचं निमित्त म्हणून मकर संक्रांती आणि उत्तरायणाकडे पाहता येईल. त्यामुळे या निमित्ताने सामाजिक कामांसाठी काही दान करण्याचा, देणगी देण्याचा प्रयत्न गुंतवणूकदारांनी करायला हवा. यामागे केवळ सामाजिक कामात योगदान देण्याचा उद्देश नसून, दान केल्यास अनेक प्रकारच्या टॅक्समध्येही सूट मिळू शकते. त्यातून आपल्या आर्थिक प्रगतीला एक प्रकारचे नैतिक अधिष्ठान प्राप्त होते. 


समूहभावना आणि वाटून घेण्याची वृत्ती


आपल्याकडे असलेल्या गोष्टी सर्वांमध्ये वाटून घेण्याचं, समूहभावनेला चालना देण्याचं काम मकर संक्रांती हा सण करतो. आपल्या सोबतच्या लोकांचं यश साजरं करण्याचा संदेश हा सण देतो. त्याचप्रमाणे आर्थिक यश हे केवळ वैयक्तिक न ठेवता ते यश मिळवताना आपल्याला मिळालेलं ज्ञान, अनुभव इतरांशी वाटून घेता आला पाहिजे. त्याचप्रमाणे आर्थिक यश हे केवळ वैयक्तिक न ठेवता ते यश मिळवताना आपल्याला मिळालेलं ज्ञान, अनुभव इतरांशी वाटून घेता आला पाहिजे.


यश आणि लाभ साजरा करणे


मकर संक्रांतीला आपण पतंग उडवण्याचा आणि तिळगुळ खाण्याचा आनंद घेतो, त्यासोबतच आपण मिळवलेलं प्रत्येक आर्थिक यश साजरं केलं पाहिजे. एखाद्या गुंतवणुकीतून मिळालेला चांगला परतावा असो किंवा छोटी गुंतवणूक असो, प्रत्येक यश साजरं केलं तर त्यातून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळते. 


मकर संक्रांती आणि उत्तरायण प्रारंभ हे केवळ सण नाहीत, तर त्यातून आपल्या वैयक्तिक आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त ठरतील असे अनेक संदेश या सणांमध्ये लपलेले आहेत. नव्याने गुंतवणुकीची सुरुवात, जोखीम व्यवस्थापन, संयम डायव्हर्सिफिकेशन, मार्केटमधून कधी बाहेर पडायचं हे ठरवण्याची क्षमता, अनुभवी व्यक्तींचं मार्गदर्शन घेण्याची तयारी आणि आर्थिक यश साजरं करण्याची वृत्ती, हे संदेश आपल्याला मकर संक्रांतीच्या निमित्ताने घेता येतील. मकर सक्रांतीचा सण आनंदाने साजरा करत असताना त्या निमित्ताने हे सर्व संदेश आपल्या आर्थिक नियोजनात प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न प्रत्येक गुंतवणूकदाराने करायला हवा.