सध्याचा काळ हा भारतीय स्टॉक मार्केटसाठी अनिश्चित आणि अनपेक्षित वाढीचा काळ आहे. मार्केटच्या निर्देशांकामध्ये होत असलेली ही वाढ आपली आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं लक्षण वाटू शकतं, परंतू, हा खरोखर आर्थिक वाढीचाच परिणाम आहे, की थोड्या काळापुरता आलेला फुगवटा आहे याचा अभ्यास गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदारांने करायला हवा.


गेल्या काही काळात घडलेल्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर तर अशा अभ्यासाची अत्यंत गरज आहे. मार्केटमध्ये वाढीव दराने दाखल झालेले आयपीओ, आणि सुलभ पैसे कमवण्यासाठी नवख्या गुंतवणूकदारांनी बाजारात केलेली गुंतवणूक या त्या दोन गोष्टी. या दोन गोष्टींमुळे गुंतवणूकदारांना प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे. जेव्हा स्टॉक मार्केट अनपेक्षितपणे वाढतं तेव्हा गुंतवणूकदारांसाठी तो वेगवेगळ्या भावनांनी भरलेला क्षण असतो. एका बाजूला आपण चांगले रिटर्न्स मिळवत असल्याचा उत्साह, आणि दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये झालेली वाढ हा जर फुगवटा असेल तर त्यातून आर्थिक नुकसान होण्याची भीती, अशा दुहेरी भावना यावेळी असतात. भारतीय स्टॉक मार्केटच्या संदर्भात असे भविष्यात फुटू शकणारे फुगवटे ओळखणे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये फुगवटा असल्याची लक्षणे कोणती, हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत...


१. उच्च मूल्यांकनावर जंक ( Junk ) IPO


महत्त्वाचा रेड फ्लॅग स्टॉक मार्केटमध्ये फुगवटा असल्याचं एक ठळक लक्षण म्हणजे, ज्या कंपन्यांची आर्थिक स्थिती आणि बिझनेस मॉडेल या दोन्ही गोष्टीबद्दल साशंकता आहे, अशा कंपन्यांचे IPO अर्थात इनिशियल पब्लिक ऑफरिंग वाढीव दराने बाजारात दाखल होणे. या ट्रेंडच्या वेळी मार्केट हे मूलभूत तत्त्वांवर नव्हे तर केवळ अंदाजांवर काम करत असतं हे लक्षात घ्यायला हवं.


अतिमूल्यांकनाचे धोके:


ज्या कंपन्यांचं आर्थिक आरोग्य चांगलं नाही आणि ज्यांच्या बिजनेस मॉडेलबद्दल साशंकता आहे अशा कंपन्यांच्या आयपीओला जास्त दर मिळणे गुंतवणूकदारांसाठी जोखमीचं ठरू शकतं. जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन येतं तेव्हा हे स्टॉक सर्वात आधी गडगडतात, आणि त्यातून गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सोसावं लागतं.


IPO च्या लाटेत गुंतवणूकदारांची मानसिकता:


मार्केटमध्ये कोणता तरी मोठा आयपीओ येणार आहे अशी हवा तयार केली जाते, तेव्हा गुंतवणूकदारच्या निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा आयपीओमध्ये गुंतवणूक करताना त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल समजून घेणं, तसेच रेवेन्यू मॉडेल आणि भविष्यातील वाढीच्या शक्यता समजून घेणं आवश्यक ठरतं.


२. सुलभ पैसा कमावण्याचा लाभ: नव्या गुंतवणूकदारांसाठीचा ट्रॅप


भारतीय स्टॉक मार्केटमध्ये गेल्या काही काळात मोठी वाढ दिसून आली. त्यामुळे नवीन गुंतवणूकदार स्टॉक मार्केटकडे आकर्षित झाले. त्यापैकी अनेक जण हे कमी अनुभव असलेले आणि गेल्या काही काळात मार्केटने दाखवलेल्या वाढीकडे पाहून निर्णय घेणारे गुंतवणूकदार आहेत. अशा गुंतवणूकदारांचा पैसा मार्केटमध्ये येतो तेव्हा त्याला इझी मनी असे म्हणतात.


भूतकाळातला परफॉर्मन्स गुंतवणूकदारांची दिशाभूल करतो:


एखाद्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवत असताना नवीन गुंतवणूकदार शक्यतो त्याच्या भूतकाळातील परफॉर्मन्सकडे पाहून निर्णय घेतात. भूतकाळातील परफॉर्मन्स हा त्या स्टॉकच्या भविष्यातील वाढीसाठीचा निर्देशक नसतो. त्यामुळे इतर लोक जे करत आहेत ते करण्याच्या नवीन गुंतवणूकदारांच्या मानसिकतेमुळे स्टॉकची किंमत त्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त वाढते आणि त्यातून मार्केटमध्ये फुगवटा तयार होतो. डिजिटल ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची भूमिका गेल्या काही काळात डिजिटल पद्धतीने ट्रेडिंग करण्याची सोय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. या पद्धतीने ट्रेडिंग करणे नवीन गुंतवणूकदारांना अत्यंत सुलभ झालं आहे. यामुळे गुंतवणूक करण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध होते ही चांगली बाब असली, तरी आता जास्तीत जास्त लोक अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे आणि जोखीम समजून न घेता गुंतवणूक करू लागले आहेत.


३. अविश्वासनीय किमतींना मिळणारे पेनि स्टॉक्स


लो कॅप स्टॉक्सच्या वाढलेल्या किमती जेव्हा मार्केटमध्ये फुगवटा असतो तेव्हा पेनि टॉक्स किंवा स्मॉल आणि मायक्रो कॅप स्टॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टॉकच्या किमतींमध्ये प्रचंड मोठी वाढ होते. मुळात त्या कंपनीची वाढ होत नसताना त्या कंपनीच्या स्टॉक्सची वाढ होणे हे मार्केटच्या मूलभूत तत्त्वांना बाजूला ठेवून केवळ भविष्यातील अंदाजांवर लोक गुंतवणूक करत असल्याचे लक्षण आहे.


प्राईस टू अर्निंग (P/E) रेश्यो जास्त असणे


अशा पेनि स्टॉकचा P/E रेश्यो जास्त असतो, तेव्हा तिथे गुंतवणूक करण्यात धोका आहे हे गुंतवणूकदारांनी ओळखायला हवं. कंपनीची मूळ किंमत आणि स्टॉक मार्केटमधील किंमत यांच्यात तफावत असल्याचं यातून सिद्ध होतं.


४. कंपनीचे प्रमोटर त्यांचा शेअर विकतात तेव्हा


एखाद्या कंपनीचे प्रमोटर अचानक आपले शेअर विकू लागतात तेव्हा त्या कंपनीच्या स्टॉकची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा जास्त वाढली आहे असे समजावे.


कारणे समजून घ्या


अशावेळी कंपनीचे प्रमोटर्स आपले शेअर का विकत आहेत हे समजून घेतलं पाहिजे. काही वेळा वैयक्तिक कारणांमुळे प्रमोटर्स आपले शेअर्स विकत असतात, त्यामुळे कंपनीच्या व्हॅल्युएशनबद्दल त्यावरून निष्कर्ष काढता येत नाही.


५. मार्केटमधील उसळीचं मीडिया सेलिब्रेशन


माध्यमांमधील अतिउत्साह


अनेकदा मार्केटमध्ये अनपेक्षितपणे वाढ होते तेव्हा माध्यमे त्याचं खूप मोठे सेलिब्रेशन करतात शेअर मार्केटमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचं पाहून लोकांचे लोकांच्या अवास्तव अपेक्षा वाढतात.


गुंतवणूकदारांच्या निर्णयावर प्रभाव


माध्यमांवर होत असलेली स्टॉक मार्केटच्या वाढीची चर्चा पाहून अनुभव नसलेले गुंतवणूकदार मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. अशावेळी ते मार्केटच्या मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करत नाहीत.


६. रिटेल गुंतवणूकदारांचा अति आत्मविश्वास


रिटेल गुंतवणूकदार मार्केटमध्ये जास्त सहभाग घेतात तेव्हा मार्केटमध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी सुरु केलेल्या खात्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढते आणि त्यामुळे मार्केट मधल्या एकूण ट्रेडिंगचा आकारही वाढतो. बरेचदा ही गुंतवणूक माध्यमांमध्ये गाजावाजा होत असलेल्या स्टॉक्समध्ये केलेली असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही यात मोठा वाटा आहे.


अति आशावाद आणि लोभ


माध्यमे जेव्हा स्टॉक मार्केटमधील वाढीचा गरजेपेक्षा जास्त गाजावाजा करतात. तेव्हा अति आशावाद आणि लोभ या दोन्ही गोष्टी वाढतात. सर्वच लोक चांगले रिटर्न्स मिळवत असताना आपण मागे राहू नये या भावनेने लोक गुंतवणुकीचा निर्णय घेतात. हा निर्णय भविष्यात चुकीचा ठरण्याची शक्यता असते.


पैसे उधार घेऊन गुंतवणूक करणे


मार्केटमध्ये वाढीची चिन्हे असतात तेव्हा अनेक लोक गुंतवणूक करण्यासाठी बाहेरून पैसे उधार घेतात. यातून काहींना फायदा होत असला तरी अशा पद्धतीच्या गुंतवणुकीत आर्थिक जोखीम असते आणि त्यातून भविष्यात नुकसानही होऊ शकतं.


भारतीय स्टॉक मार्केटमधले इतर निर्देशांक


परदेशी आणि स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे परदेशी आणि स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार जेव्हा अचानक आपली गुंतवणूक मार्केटमधून काढून घेतात तेव्हा ती धोक्याची घंटा समजायला हवी.


आर्थिक वाढीमध्ये दिसणारी तफावत


स्टॉक मार्केटमध्ये वाढ होत असताना देशाचे इतर आर्थिक निर्देशांक पाहणं महत्त्वाचं ठरतं. एका बाजूला मार्केट वाढत असेल आणि त्याच वेळी देशाचा जीडीपी वाढत नसेल किंवा बेरोजगारीचा दर वाढत असेल, तर मार्केटमध्ये आणि खऱ्या आर्थिक परिस्थितीत तफावत आहे असे समजावे.


रिटेल गुंतवणूकदारांची वाढ


इतरांचं अनुकरण करण्याच्या मानसिकतेमुळे मार्केटमध्ये अचानक नव्या रिटेल गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ होते. असे नवीन गुंतवणूकदार भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक करत असतात, त्यामुळे ते मार्केटचा अभ्यास करत नाहीत. याच कारणाने अनेक स्टॉकची किंमतही वाढते.


भारतीय गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी


स्टॉक मार्केटमध्ये होणारी वाढ म्हणजे फुगवटा असल्याची लक्षणे कोणती हे आपण जाणून घेतलं. विशेषतः भारतीय स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारांनी जास्तीची काळजी घेणे आणि सखोल अभ्यास करून गुंतवणुकीचे निर्णय घेणे आवश्यक आहे. इतरांचं अनुकरण न करता आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाय करणे, आणि झटपट फायदा मिळवण्याच्या लोभाच्या आहारी न जाता दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर देणं भविष्यात फायद्याचं ठरतं. असं केल्यास स्टॉक मार्केटमध्ये फुगवटा आलेला असताना त्यातून तयार होणारी आर्थिक जोखीम टाळता येते. मार्केटमधील फुगा कधी फुटेल याचा अचूक अंदाज येणं अशक्य असलं तरी त्या फुगवट्याची लक्षणे ओळखून हुशारीने आपली गुंतवणूक सुरक्षित करणे गरजेचे आहे. अनेकदा स्टॉक मार्केटची स्थिती इतकी सुधारते की त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. त्यामुळे मार्केटमध्ये फुगवटा असल्याची शंका येते, तेव्हा त्यात तथ्य असतं. दीर्घकालीन विचार करून सर्व बाबी समजून घेऊन काळजीपूर्वक गुंतवणूक केल्यास त्यातून येणारी जोखीम टाळता येते.


काही सूचना


ड्यु डिलिजन्स करा एखाद्या स्टॉकमध्ये आणि विशेषतः आयपीओमध्ये गुंतवणूक करत असताना त्याचा पूर्ण अभ्यास करा. केवळ त्याच्या भूतकाळातील परफॉर्मन्सकडे पाहून निर्णय घेऊ नका.


जोखीम समजून घ्या


मार्केटमध्ये चालू असलेले ट्रेंड्स पाहून आणि इतर लोकांचं अनुकरण करण्याच्या मानसिकतेतून गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका. तुम्ही जर नवीन गुंतवणूकदार असाल तर मार्केटमध्ये असलेली जोखीम आधी समजून घ्या.


पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा


तुमची गुंतवणूक डायव्हर्सीफाय केल्यास त्यातून जोखीम टाळली जाऊ