Footballer Pele Lifestory : फुटबॉल जगतात अनेक फुटबॉलर्सचं विश्वचषक जिंकणं स्वप्न असतं, अशामध्ये एकदा-दोनदा नाही तर तीन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणारे एकमेव खेळाडू म्हणजे पेले....ब्राझीलचे सार्वकालिक महान फुटबॉलवीर पेले यांचं वयाच्या 82व्या वर्षी कर्करोगानं निधन झालं...आतड्याच्या कर्करोगामुळं पेले यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून खालावली होती... मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात होते ज्यानंतर 29 डिसेंबर रोजी ब्राझीलच्या अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या मुलीनं एका भावूक इन्स्टाग्राम पोस्टमधून याबाबत माहिती दिली...


तर आता कोणतही क्षेत्र म्हटलं तर त्याचा एक पहिला सुपरस्टार असतो... असाच फुटबॉल खेळाचा पहिला सुपरस्टार म्हटलं तर ते पेलेच होते. आपल्या फुटबॉल कारकिर्दीत कितीतरी गोल आणि मॅचविनिंग खेळी करणारे पेले यांनी जगाला दाखवलं की मेहनतीच्या जोरावर गरीबीतूनही साम्राज्य उभा करता येतं...पैसे कमवण्यासाठी चहाच्या दुकानावर काम करणारा मुलगा ते फुटबॉल जगताचा सार्वकालिक महान फुटबॉलर असा पेले यांचा प्रवास खरचं प्रेरणादायी आहे...


पेले नावामागची कहाणी...


पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमध्ये झाला. डोनडिन्हो (Dondinho) असं पेले यांच्या वडिलाचं नाव असून ते देखील स्ट्रायकर म्हणून लोकल क्लबकडून खेलायचे. ज्यामुळे पेलेंच्या रक्तातच फुटबॉल होतं... पण पेले याचं मूळ नाव एडसन अरांतेस दो नासिमेन्टो हे होतं. पेलेंच्या जन्माच्या काही दिवस आधीच त्यांच्या घरात वीज आली होती, त्यामुळे विजेचा शोध लावणारे अमेरिकी वैज्ञानिक थॉमस एडिसन यांच्या नावावरून पेले यांचं नाव एडिसन ठेवण्यात आलं होतं. पण पेलेंच्या कुटुंबीयांनी एडिसनच्या इंग्रजी स्पेलिंगमधला आय काढून टाकला आणि पेलेंचं नाव एडसन झालं. त्यात घरची मंडळी त्यांना डिको म्हणायची, पण याच डिकोला एका लोकल क्लबचा गोलकिपर बेले आवडायचा आणि त्याच्या नावावरुन मित्रांनी एडसनला पेले हे टोपणनाव दिलं...आणि पेले हीच त्यांची जगभरात ओळख बनली. 


गरीबीतून उभारलं साम्राज्य


पण जगभरात पेले प्रसिद्ध होण्याआधी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. कारण आधीपासूनच घरची परिस्थिती जेमतेम होती...गरिबीत वाढलेल्या पेलेंना वेळप्रसंगी पैसे कमवण्यासाठी चहाच्या दुकानात देखील काम करावं लागलं..वडिलांकडून त्यांना फुटबॉलचे बेसिक धडे शिकायला मिळाले...पण प्रॉपर  फुटबॉल परवडत नाही आणि तो अगदी पेपरपासून किंवा मिळेल त्या गोष्टीने तयार केलेल्या बॉलच्या आकाराच्या वस्तून पेले फुटबॉलची प्रॅक्टिस करत...त्यांचं फुटबॉलप्रतिचं प्रेम आणि मेहनतीच्या जोरावर  वयाच्या 13 वर्षीच ते लोकल क्लब बौरू (Bauru) कडून खेळू लागले. पुढे जाऊन 1956 म्हणजे 16 वर्षाचे असताना ब्राझीलियन फुटबॉल क्लब सेन्टॉसकडून पेलेंनी खेळायला सुरुवात केली आणि हाच क्लब त्यांची ओळख बनला. 
 
झळाळत्या कारकिर्दीत तीन विश्वचषक सामिल


सेन्टॉस क्लबकडून त्यांनी 618 सामन्यात जवळपास 636 गोल्स केले. जर ओव्हरऑल विचार केला तर पेले यांच्या २१ वर्षांच्या झळाळत्या कारकीर्दीत तब्बल 1366 सामन्यांमध्ये 1281 गोल्स त्यांनी केले. यातील अधिकृत सामन्यांची आकडेवारी सांगायची तर पेलेंनी 812 सामन्यांमध्ये 757 गोल्स मारले होते. पण या साऱ्यात त्यांची खरी कमाई होती ब्राझीलसाठी केलेला खेळ आणि जिंकलेले तीन विश्वचषक पेले यांनी ब्राझिलसाठी 92 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 77 गोल्सची नोंद केली आणि  या दरम्यानच 1958, 1962 आणि 1970 साली विश्वचषक पेले यांनी ब्राझीलला वर्ल्डकप जिंकवून दिला...फिफा विश्वचषकाच्या इतिहासात त्यांच्या नावावर एकूण 12 गोल्स आहेत.
 
कुटुबियांसह फुटबॉल जगतावर शोककळा


आपल्या दमदार खेळाच्या जोरावरच पेले यांनी फुटबॉल किंग होण्याचा मान मिळवला... दरम्यान मोठमोठ्या ब्रँडशी देखील पेले जोडले गेले आणि चहाच्या टपरीवर काम करणारा एक मुलगा आपल्यानंचर कोट्यवधींची संपत्ती कुटुंबियासाठी सोडून गेला आहे... पेले यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलीनेच एका इन्स्टा पोस्टद्वारे दिली..पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो  हिने, ''आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला... आणि त्यानंतर सर्व फुटबॉल जगतावर शोककळा पसरली.. ब्राझीलचं नाही तर जगभरातील देशांत पेले यांची क्रेझ होती.. त्यामुळे पेले यांच्या निधनानंतरही लेंजेंड कधी जात नसतात ते त्याच्या किर्तीने कायम आपल्यात असतात असंच सार जग म्हणत आहे....