सोनं... म्हणजे महिलांच्या अत्यंत जवळचा आणि बाजारात सातत्यानं मागणी असणारा विषय. पण याच सोन्याचे अनिश्चित दर अनेकदा चिंतेचं कारण ठरतात. खरंतर जगामधील सर्वच गुंतवणूकदारांना सर्वात सुरक्षित असे गुंतवणुकीचे साधन कोणते असे विचारल्यास ते तुम्हाला "सोने" हेच सांगतील आणि ते खरे ही आहे. महागाईचा वाढता आलेख आणि त्याला बरोबरी करू शकणारं  एकमेव चलन म्हणजे "सोनं"


कोरोना काळामध्ये याच सोन्याच्या दारात मोठा चढउतार झालेला आपण पहिला. मार्च 2020 ला कोरोनामुळे जग ठप्प झालं आणि सोन्याने आपल्या भावाचा उच्चतम भाव गाठला. 64 हजार रुपये प्रतितोळा भारतीय रुपयांमध्ये झालेला होता. जसेजसे हे लक्षात आले की कोरोनाला आपण हरवू शकतो, तसतसा सोन्याच्या भाव खाली  येत गेला आणि तो अगदी 46 हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत खाली आला. परंतु त्यानंतर विविध देशांनी आणि  त्यांच्या बँकांनी कोरोनानंतर आलेली मरगळ हटवण्यासाठी, चलन छापण्याचा सपाटा लावला आणि जगभरामध्ये रोकड तरलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोरोनामुळे ज्या ठिकाणी सर्वच इंडस्ट्रीज बंद होत्या त्या ठिकाणावरून कितीही प्रयत्न केला तरी प्रॉफिट निघत नव्हता. कारण उद्योगधंदेच बंद होते अशा वेळेस ही रोकड तरलता चलनवाढीचा रोग घ्यायला लागली आणि सोन्याचे भाव 52 हजारापर्यंत आले. 


यानंतर रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये प्रथमतः मदत करणारे देश सहभागी होतात की काय या धास्तीमुळे सोन्याच्या भावाने उचल खाल्ली आणि पुन्हा एकदा सोने  61 हजार पर्यंत गेले. त्यानंतर या युद्धाला दीड वर्षाचा कालावधी लोटला आणि इतर देश या युद्धामध्ये भाग घेणार नाहीत हे जवळपास निश्चित झाल्यानंतर मात्र सोन्याचे भाव हळूहळू कमी व्हायला लागले त्याला अजूनही कारण होते ते म्हणजे अमेरिकन सरकार आपल्या आत्तापर्यंतच्या इतिहासामधील सर्वात जास्त कर्जबाजारी झालेला आहे. केवळ एक वर्षाच्या कालावधीमध्ये (2022 - 23) अमेरिकन सरकारने दोन ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त कर्ज जागतिक बाजारामधून घेतलेले आहे. यामुळे त्या सरकारच्या बाँडचा "यील्ड" अर्थात परतावा हा गेल्या अकरा वर्षातील सर्वात उच्च स्तरावर गेलेला आहे. 


अशातच मध्यपूर्व विषयांमध्ये होऊ घातलेल्या शांततेला दृष्ट लागली आणि हमास या संघटनेने इस्राईलवर 5000 क्षेपणास्त्रांचा मारा केला इस्राईलची मानसिकता समजणाऱ्या लोकांना लगेचच लक्षात आले की आता या ठिकाणी युद्धाची सुरुवात होणार आहे. ती दुसऱ्या दिवशीच खरे ठरले इस्राईल पॅलेस्टाईन आणि गाजा पट्टी या ठिकाणी अक्षरशः आग ओकली आणि युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे सोन्याने एका दिवसामध्ये शंभर डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढ नोंदवली तर भारतीय बाजारामध्ये सोन्याने पुन्हा एकदा साठ हजाराचा टप्पा गाठला. आता अशा वेळेस प्रश्न पडतो की सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की करू नये.




 जर सोन्यातच  गुंतवणूक करायची तर ती कुठल्या प्रकारे आणि कुठे करावे ते समजून घेऊयात:


शेअर बाजार असेल किंवा सोन्याचा बाजार किंवा इतर कुठलाही बाजार सर्वसामान्य व्यक्तीला अत्यंत कमी भावामध्ये कधीही खरेदी करायला जमत नाही याला बॉटम पीसिंग असे म्हणतात परंतु ते सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळेस आमच्यामध्ये सध्याचे  सोन्याचे भाव हे खरेदी करण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत चांगले भाव आहेत. 2013 पासून 2023 पर्यंत सोन्याचे आंतरराष्ट्रीय भाव पाहिलेत तर सोन्याने 1300 ते 1800 डॉलरच्या बाहेर भाव दाखवलेले नाहीत, याला अपवाद कोरोना काळ आहे. ज्यावेळेस 2200 डॉलर पर्यंत भाव दाखवले गेले होते असा अंदाज होता की सोन्याचा हा फेज संपलेला असून आता सोने लवकरच 2005 डॉलर   होताना दिसेल आणि त्यामुळे भारतीय रुपयांमध्ये सोन्याचे भाव 65 हजाराच्या वर जाताना दिसू शकतात.
 
मग असा प्रश्न येतो की सध्या आपण सोने कुठल्या प्रकारे खरेदी केले पाहिजे, बऱ्याच वेळेला आपण गुंतवणुकीकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे आज आपण कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी ही अमेंडमेंट पॉलिसी घेत नाही. आपण ती टर्म पॉलिसीवरच घेतो याचे कारण सरळ आहे की गुंतवणूक आणि इन्शुरन्स हा विषय आपण वेगळा केलेला आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आपण म्युच्युअल फंड कडे जातो, तर इन्शुरन्स साठी आपण प्युअर इन्शुरन्स घेतो याच प्रकारे आता आपल्याला सोन्याच्या गुंतवणुकीकडे पाहू लागेल सोन्यामधील गुंतवणूक हा माझा शब्द नीट लक्षात घ्या मी दागिन्यांवरती या ठिकाणी बोलत नाही कारण दागिने ही गुंतवणूक होऊच शकत नाही. कारण दागिने करणे ही आपली हौस आहे आणि हौस मोल नाही त्यामुळे सोन्याच्या दागिने करताना त्या सोन्याची प्रत कमी होते. त्याचबरोबर ते दागिने बनवण्यासाठी घडनावळ द्यावे लागते आणि या सगळ्या खर्चा नंतर ज्यावेळेस आपण ते दागिने विक्री करायला जातो त्यावेळेस विक्रीची योग्य किंमत सुद्धा आपल्याला मिळत नाही कारण सोन्याची प्रत कमी झालेली असते. अशा वेळेस सोन्यामधील गुंतवणूक या शब्दाला जागायचे असेल तर आपल्याला डोळसपणे गुंतवणूक करावी लागेल शुद्ध सोने बिस्कीट किंवा वेढणीच्या स्वरूपात घेणे हे सुद्धा तसं पाहायला गेलं तर दागिन्यांपेक्षा योग्य आहे.  


डिजिटल गोल्ड आणि गुंतवणूक: (Digital Gold) 


डिजिटल गोल्ड हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. सोन्यामधील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे सोवरेन  गोल्ड बॉंड या बॉण्डचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष सोने खरेदी केले तर ते सांभाळण्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागते. मग ते लॉकरमध्ये ठेवण्यासाठी असेल किंवा घरामध्ये त्यासाठी पर्याय करणे असेल दुसरी गोष्ट ते सोने विक्री करताना भाव फरक हा पडतोच पडतो त्यापेक्षा सोवरेन गोल्ड मध्ये ज्या भावामध्ये तुम्ही युनिट्स खरेदी केलेले आहेत ते भाव प्रत्यक्ष शेअर मार्केट मध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि विक्री करताना समोर आपण काय भावाला विक्री करत आहोत हे आपल्याला समोर दिसत असते आणि त्यानंतरच आपण सोन्याची विक्री करतो विक्री केल्यानंतर अगदी नगण्य कमिशन कट होऊन आपल्याला दुसऱ्या दिवशीच अकाउंटला रक्कम मिळून जाते. शिवाय या बॉण्डवर आपल्याला वार्षिक अडीच टक्के व्याजही मिळू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्यापेक्षा सोरीन गोल्डबाँड खरेदी करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे यानंतर शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री होणार गोल्ड बीज सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता विक्री करू शकता आणि सांभाळू शकता याच्यामध्ये तुम्हाला घडनावळ वगैरे लागत नाही किंवा खरेदी विक्रीमध्ये फार मोठा फरकही नसतो अजून एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड बाजारामध्ये खरेदी विक्री होणारे ईपीएफ याची सुद्धा आपल्याला खरेदी विक्री करता येते आणि आपल्या डिमॅट मध्ये त्याला स्थान देऊ शकतो यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची खर्च मोठ्या प्रमाणावर लागत नाहीत या दिवाळीमध्ये किंवा या उत्सव परवा मध्ये आपल्याला विविध मार्गाने पैसा येणार आहे दिवाळीचा बोनस विक्री वाढ होते त्यामुळे होणारा फायदा या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि आपण गुंतवणुकीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर येत्या दोन पाच वर्षांमध्ये सोन्याची भाव तुम्हाला 70 ते 75 हजाराचा  जाताना दिसणार आहेत त्याचा तुम्ही मोठ्या प्रमाणावरती फायदा करून घेऊ शकता. 


(लेखामध्ये व्यक्त झालेली मते लेखकाची वैयक्तिक असून एबीपी माझा किंवा एबीपी नेटवर्क सहमत असेलच असे नाही)