एक काळ असा होता 'गेम्स प्लेस्टेशन' शाळकरी मुलांनी गच्च भरलेली असायची. FIFA/Cricket/WWF/GTA/Call of Duty असो counter strike वा God Of War... अशा तमाम गेम्सच्या भुरळवर आजकाल पडदा टाकला होता ते Ludo King आणि Pubg ने. पण या मोबाईल गेमर्सवर चांगलीच पकड पकडली होती.
अखेर धाकधूक आणि PUBG चा 'गेम ओव्हर' केंद्र सरकार करेल का याकडे तमाम नेटिझन्सनी काळजावर हात ठेवत 'ऑल इज वेल' म्हणत टिकटॉक बंद झाल्यानंतर कसंबसं दिवस काढत होते. इतक्यात त्यांच्या या सुळसुळाटाला लागलेली वेसण म्हणजे, याआधी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने बंद केलेले 59 अॅप्स. त्यानंतर 47 Apps वर बंदी घातली. मग 275 मध्ये pubg चा समावेश असलेली यादी गृहमंत्रालयाकडे तयार असल्याचं समजलं होतं, आता चीनला आणखी एक दणका देत याच यादीमधील 118 चिनी Apps वर घातलेली बंदी ही चांगलीच जिव्हारी लागलीय. सोशल मीडियावर खवळलेल्या या गेमर्सने मीम्सद्वारे व्यक्त होताना पाहून समजतं..
तब्बल 50 मिलियन मंडळींनी भारतात PUBG गेम डाऊनलोड केलं आणि जवळपास दररोज Pubg चे Active User's 33 मिलियन आहेत. कमालीची गोष्ट म्हणजे, PokemonGo आणि अल्पावधीतच Pubg ने गेमिंगची आवड असणाऱ्या मंडळींना आपल्या प्रेमाची भुरळ घातली.
केंद्र सरकारकडून PUBG सह 118 चीनी अॅप्सवर बंदी
पण तरुणांचा या सोशल कलावर वेळीच व्यसन घालावं असं तमाम 'आयांचं' देवाकडे साकडं असायचं की मुलांनी मोबाईलच्या बाहेर डोकं काढावं... घरात कामं करावीत... आता हे सगळं करण्यात केंद्र सरकारला खूप आनंद होतोय अशातला बिलकुल भाग नाहीय. याचं मुख्य कारण म्हणजे या सर्व चिनी अॅप्ससंदर्भात गृह मंत्रालय माहिती गोळा करत होतं आणि त्यासंदर्भात चौकशी होती. तसेच यासर्व अॅप्सना फंडिंग कुठून मिळतं, यासंदर्भातही माहिती गोळा करण्यात येत होती. यापैकी काही अॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याचं समोर आलं आहे, तर काही अॅप्स डाटा शेअरिंगच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचंही समोर आलं आहे.
याचाच एक परिणाम आपल्यासमोर अशाप्रकारे आला. मात्र टिक टॉक क्रिएटर्सच्या दुःखात pubg गेमर्स सुद्धा सहभागी झाल्याने आता भविष्यात Pubg ला 'आत्मनिर्भर' पर्याय येईल का? की या लाखो भारतीय तरुणांच्या मनात घर केलेल्या apps च्या कंपन्या सरकारच्या नियम अटींची पूर्तता करुन पुन्हा नव्याने दाखल होतील का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.