युएस कॅपिटलमध्ये 6 जानेवारी रोजी जे घडलं ते, नव्याने निवड झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शब्दात सांगायचं तर तो 'देशद्रोह' होता, ते 'आंदोलन' नव्हते तर ती 'बंडखोरी' होती. त्यांच्या या मताशी काही सिनेटर्स आणि भाष्यकारही सहमत आहेत. या घटनेबद्दल काही जणांनी नरमाईची भाषा वापरली आणि आणि कायद्याच्या उल्लंघनाकडे आणि अराजकतेकडे दुर्लक्ष केलं. काही जणांनी हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान असल्याचं सांगितलं तर अनेकांना अमेरिका यापुढे 'जगाच्या टेकडीवरील चमकता तारा' राहील का अशी शंका व्यक्त केली.
जे काही घडले ते केवळ अभूतपूर्व आहे यावर प्रत्येकाचं एकमत आहे. या आधी अशा प्रकारचे कोणतेही उल्लंघन झाले झाले नव्हते. सन 1812 च्या युध्दानंतर अशा प्रकारे युएस कॅपिटलचा भंग कधीच झाला नव्हता हे खरं आहे. त्यावेळी युएस कॅपिटलचा भंग झाला होता तो या संकल्पनेपेक्षा काहीसा अधिक होता हे नक्की. युएस कॅपिटॉलची इमारत आणि राजधानीला ब्रिटिश लष्कराने 1814 साली जाळून टाकलं होतं. ट्रम्प यांच्या समर्थकांनी युएस कॅपिटॉलमध्ये जो काही गोंधळ घातला त्याची तुलना चक शुमर यांनी 7 डिसेंबरच्या पर्ल हार्बरवरील जपानने केलेल्या बॉम्ब हल्ल्याशी केली. तसेच हा दिवस पर्ल हार्बरच्या घटनेप्रमाणे बदनामीचा दिवस म्हणून ओळखला जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
अमेरिका हा जगातील एक असामान्य देश आहे असा समज असणाऱ्यांसांठी आणि अमेरिका नेहमीच न्यायाच्या बाजूने उभी राहते असा समज असणाऱ्यांचा या युएस कॅपिटलवरील हल्ल्यानंतर श्वेत वर्चस्ववादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. हा श्वेत वर्चस्ववाद अमेरिकेन लोकशाहीच्या स्थापनेपासून तिच्या काळजात कुठेतरी रुतून बसला आहे. दोन तासांनी कारवाई थांबल्यानंतर युएस कॅपिटलमध्ये आत घुसताना दंगलखोरांचे चित्र पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर झळकलं त्यावेळी त्या ठिकाणी पोलीस कुठेही नसल्याचं चित्रही पहायला मिळालं होतं.
कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणातील अपयश या निमित्ताने दिसून आल्याचं पहायला मिळालं. आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया की कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन राष्ट्रपतींच्या देखरेखीखाली झालं. हे तेच राष्ट्रपती आहेत ज्यांनी ब्लॅक लाइव्ह्स मॅटर प्रकरणात स्वत:ला कायद्याबद्दल कोणताही आदर बाळगत नसलेल्या कमांडर-इन-चिफच्या स्वरुपात स्वत:ला प्रोजेक्ट केलं होतं. रिपब्लिकन्स हे नेहमी स्वत:ला कायदा व सुव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त करणाऱ्यांपैकी एक समजतात. या घटनेतून कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही ही कल्पना आता प्रत्येकाच्या विचाराशी सुसंगत ठरणारी आहे, कारण अशा घटनांचा सामना करण्यासाठी पोलीस पूर्णपणे तयार नव्हते. श्वेत दहशतवाद्यांना आता पूर्णपणे समजलं आहे की ते कोणत्याही प्रकरणात कायद्याचं उल्लंघन करु शकतात आणि त्यांच्या या कृत्याला कोणतीही शिक्षा मिळणार नाही असाही त्यांचा समज झाला असण्याची शक्यता आहे.
फ्रॅकसमध्ये एका पोलिसाचा जीव गेला. जरी अनेक सिनेटर्स आणि कॉंग्रेसमन यांनी पोलिसांनी त्यांचे जमावापासून संरक्षण केल्याबद्दल आणि सुरक्षित ठेवल्याबद्दल तोंड भरुन कौतुक करत असले तरी जगाने जे काही पाहिले ते यापेक्षा निराळंच होतं. राजधानीच्या आवारात दंगली करणाऱ्यांना ज्या सुलभतेने प्रवेश मिळाला, सुरक्षेचे अनेक स्तर भेदून त्यांनी लोकशाहीच्या गर्भगृहात प्रवेश केला, त्यामुळे पुढच्या काही तासात घडलेल्या घटनांना वेग आला. अनेक दंगेखोर त्या परिसरात पर्यटक असल्यासारखं फिरत होते, अमेरिकन राष्ट्रपित्याच्या चित्राकडे टक लावू पाहत होते, काहींनी पोलिसांसोबत सेल्फी घेतला. काहींनी स्पीकर नॅन्सी पेलोसींच्या टेबलावर जोरदारपणे पाय आदळले आणि त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
पोलिसांना तो परिसर मोकळा करण्यास काही तासांचा अवधी लागला. संध्याकाळपर्यंत कोणत्याही दंगलखोराला अटक करण्यात आली नव्हती. ज्यांना रात्री अटक करण्यात आली होती त्यांच्यावर नाइट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. संपत्तीचे नुकसान करणे, निवडून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण करणे अशा प्रकारचे कृत्य करणारे जर कृष्णवर्णीय असते तर या दंगलीचा निष्कर्ष वेगळा असता. अशावेळी कायद्याच्या सर्व शक्तीचा वापर झाला असता आणि दंगलखोरांना अगदी क्रौयाचा वापर करुन दाबण्यात आले असते. या ठिकाणी त्यांच्यासारखा केवळ निषेध करणारे कोणीही नव्हते. शेकडोंना अटक झाली असती आणि त्याला प्रतिकार झाला असता तर त्यांना गोळ्याही घातल्या असत्या. राष्ट्रपतींनी स्वत: अशा 'कुत्र्यांना' गोळ्या घालण्याचे आदेश दिले असते.
एफबीआयने या आधी कित्येक वेळा कबूल केलं आहे की अशा प्रकारचे श्वेत दहशतवादी देशांतर्गत सुरक्षेला धोका आहेत. तरीही या सूचनेची गंभीर दखल घेण्यात आली नाही आणि अमेरिकेच्या कॅपिटलवर विनाकारण हल्ला घडवून आणला आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातच नव्हे तर त्यांच्या आधीपासून, काही दशकांपासून श्वेत दहशतवाद्यांना संरक्षण मिळाल्याचं पहायला मिळालं आहे. युएस कॅपिटलवर हल्ला करणाऱ्या या श्वेत दहशतवाद्यांना समजलं आहे की त्यांच्या या कृत्याला सध्याच्या राष्ट्रपतींची मदत आणि प्रोत्साहन आहे.
त्यांनी या लोकांना रस्त्यावर उतरायला प्रोत्साहित केलं आणि देशाच्या सर्वोच्च स्थानावर पुन्हा एकदा आपला मालकी हक्क सांगितला. जर अमेरिकन लोकांना याची या आधी जाणीव झाली नसेल तर आता त्यांना आता ही वस्तुस्थिती समजली असेल की देशांतर्गत श्वेत दहशतवाद्यांना जो आपला मानतो, अशा व्यक्तीला व्हाईट हाऊसमध्ये पोहचवण्यास केवळ आपण जबाबदार आहोत.