यंदाच्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने थेट बडोद्याला जायची संधी मिळाली आणि संमेलनातील भरगच्च कार्यक्रमांमधून साहित्यिक खाद्याचा आस्वाद घेताना फार वेळ जरी मिळाला नाही तरी किंचीतशी खवय्येगिरी करायला कुठून तरी वेळ काढलाच. खरं तर बडोदा ही आपल्या पउण्यासारखी विद्यानगरी आहे, फक्त गुजरातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथल्या महाराजा सयाजीराजे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात..त्यामुळे स्वस्त दरात मिळणारे पदार्थ इथल्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांची गरज आहे..त्यामुळे विद्यापीठ परिसरात तर छोट्या छोट्या खाऊच्या गाड्यांची रांगच दिसते..या गाड्यांवर ऑम्लेट पाव, पावभाजी, चाटचे वेगवेगळे प्रकार आणि तरुणाईचं लाडकं गाड्यावरचं चायनिज असं सगळं मिळतं..पाणीपुरीच्या छोट्या गाड्या तर अगदी जागोजागी दिसतात.. मात्र या बडोदा नगरीतल्या तरुणाईशी गप्पा मारल्यावर लक्षात येतं की तीसेक वर्षापूर्वी बडोदा काही गुजराती पदार्थांसाठी प्रसिद्धही असेल किंवा बडोद्यातील स्ट्रीट फुड म्हणून काही वेगळे पदार्थ प्रसिद्धही असतील पण आता मात्र पुण्यासारखीच विद्यानगरी असलेल्या बडोद्यातल तरुणाईच्या चवींवर ‘शेव उसळ’ नावाच्या एका मराठमोळ्या पदार्थाने जादू केलीय आणि बडोद्यातला सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ कुठला म्हंटलं की विद्यापीठात शिकणारी, इंजिनियरिंग कॉलेजेसच्या कट्ट्यांवर रमणारी अशी सगळी तरुणाई एकमुखाने बडोद्याची सगळ्यात महत्त्वाची ओळख सांगतात ती म्हणजे शेव उसळचं शहर अशी...बरं अगदी जागोजागी शेव उसळचे स्टॉल्स, गाड्या आपल्याला बघायला मिळत असले तरी जय महाकालीची शेव उसळ म्हणजे बडोदेकरांचा विक पॉईंट...या जय महाकाली शेव उसळची बडोदा शहरात तीन तरी ब्रांचेस आहेत..पण त्यांची मुख्य ब्रांच बडोद्याच्या मुख्य भागात म्हणजे सयाजीराजेच्या राजवाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे..




बडोद्यातले मराठी लोक तर मोठ्या अभिमानाने सांगतात की जय महाकाली शेव उसळ हा ब्रॅण्ड आणि हा पदार्थ मराठी माणसांनी एकत्र येऊन इथे सुरु केलाय..जो आता बडोद्यातला सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड ठरतोय...आपल्या महाराष्ट्रातल्या मिसळीची बहीण शोभावी अशी ही शेव उसळ..



जय महाकालीच्या मालकांनीही सांगितलं की तीस वर्षापूर्वी इथे बडोद्यात व्यवसायासाठी आल्यानंतर आपल्या मराठमोळ्या मिसळीला गुजराती चवींप्रमाणे नवीन ट्विस्ट देऊन तयार झालेला पदार्थ म्हणजे शेव उसळ.  पण या पदार्थाचा पसारा मात्र आपल्या मिसळीपेक्षा नक्कीच मोठा असतो..म्हणजे शेव उसळ मागवल्यावर छोट्या मोठ्या अनेक ताटल्या आणि वाट्या आपल्यासमोर एकेक करत क्रमाने येतात. सर्वात अगोदर एका ताटलीत आणून ठेवली जाते ती जाडसर पिवळ्या रंगाची शेव, त्या शेवेवर कांद्याची पात चिरुन टाकलेली असते..त्यानंतर थोड्यावेळाने प्लास्टीकच्या पिशवीत ठेवलेले आपल्या मुंबईतल्या पावापेक्षा अर्ध्या आकाराचे दहा बारा पाव येतात...त्यापैकी आपण जितके पाव खाणार त्यानुसार सगळ्यात शेवटी पैसे द्यायचे असा नियम...त्यानंतर एका जारमध्ये वाटाण्याची पातळ उसळ.. ज्यात वाटाणे अगदी नावापुरते..तो स्टीलचा जारच आपल्यामुळे आणून ठेवला जातो..स्टीलच्या दुसऱ्या भांड्यात केवळ तिखट तर्री आणि तिसऱ्या वाडग्यात चमचमीत हिरवी चटणी ठेवलेली असते..त्याबरोबर एक रिकामी वाटी आणि दोन आणखी वाट्या ज्यात मीठ आणि काळा मसाला ठेवलेला असतो..



हा काळा मसाला म्हणजे आणखी चमचमीत चव आणण्यासाठी..असा थेट मसालाच वाटीत आणून ठेवण्याची पद्धत मी इथेच पहिल्यांदा बघितली.. तर हे इतके सगळे पदार्थ आपल्याला दिलेल्या वाटीत आपल्याचवीनुसार एकत्र करायचे आणि या शेव उसळ नावाच्या आंबट, तिखट, चमचमीत पदार्थाचा आस्वाद घ्यायचा..पावाचा अख्खं पाकीट ठेवलेलंच असतं..त्यातले जितके संपतील तितके पाव खायचे किंवा आणखी हवे असतील तर आणखी एक पावाचं पाकीट तुमच्यासाठी तयारच असतं... असा हा शेव उसळ नावाचा खास बड़ोद्याचा पदार्थ.. कॉलेजेसच्या कॅंटीनमधला, कॉलेजबाहेरच्या कट्ट्यावरचा हा आवश्यक पदार्थ झाला आहे, पण ‘जय महाकाली’ ची मिसळ खायला मात्र वयाचं बंधन नाही.. रविवारी तर नाश्ता, दुपारचं जेवण, दुपारचा नाश्ता, संध्याकाळचं जेवण अशा सगळ्या वेळांना जय महाकालीच्या तीनही दुकानांमध्ये बडोदेकर तूफान गर्दी करतात...



या शेव उसळीबरोबर आणखी एक वेगळा पदार्थ रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर बघायला मिळाला म्हणजे ‘पापडनू लोट’, आपल्या तुटपुंज्या गुजराती भाषेच्या ज्ञानाच्या आधारावर पापडाच्या लाटीसारखा एखादा पदार्थ असणार असा आपल्या समज होतो आणि हा समज बऱ्याच अंशी बरोबरही ठरतो, कारण तांदळाचे पापड तयार कऱण्याकरता जी उकड काढली जाते ती उकड म्हणजे पापडनु लोट नावाचा जागोजागी मिळणारा प्रसिद्ध पदार्थ, अगदी भेळपुरी, पाणीपुरीच्या गाड्यांइतक्या आपल्या जागोजागी या पापडनु लोटच्या गाड्या बघायला मिळतात..त्या उकडीवर तिखट ठेचा वगैरे टाकून मस्त चव वाढवलेली असते.. हा पापडनु लोट नावाचा पदार्थ कदाचित गुजरातच्या इतर शहरांमध्ये मिळतही असेल पण आपल्यासाऱख्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी मात्र अशी ही रस्त्यावर मिळणारी तांदळाची उकड खाणं म्हणजे एक नवीन अनुभव ठरतो. बडोद्यात राजु ऑम्लेट आणि माजी सैनिक ऑम्लेट नावाची ऑम्लेटची दुकानंही चांगलीच प्रसिद्ध आहेत, मात्र सध्या तरी बडोद्यातली गुजराती आणि मराठी तरुणाई या शेव उसळीच्या चटकदार चवीच्या प्रेमात पडलीय..

संबंधित ब्लॉग :

जिभेचे चोचले - स्पँनिश च्युरोज

जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश

जिभेचे चोचले :  चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’

जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो…
जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट

जिभेचे चोचले : आजीच्या पोतडीतील पदार्थांसाठी ‘ग्रॅण्डमामाज् कॅफे’

जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस 

जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे

जिभेचे चोचले – सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला

जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी  – ‘द जे’

जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29

जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री

जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना

जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट

जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच

जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट

जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद

जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर

जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे

जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर

जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट

जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’

जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’

जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट