एखादं रेस्टॉरन्ट प्रचंड लोकप्रिय आहे, तिथल्या चवी लोकांना आवडतात हे ठरवण्याचं परिमाण अर्थातच तिथली गर्दी, एखाद्या ठिकाणच्या खास चवींसाठी कितीही वेळ थांबायची खवय्यांची जर तयारी असेल, तर ते रेस्टॉरन्ट किंवा ती खाण्याची जागा जबरदस्त लोकप्रिय आहे हे आपण डोळे मिटून म्हणू शकतो. बरं अशीच लोकप्रियता एखादी जागा वर्षानुवर्ष कायम रहात असेल किंबहुना वाढतच असेल तर मग ती जागा खवय्यांसाठी लिजेंडरी ठरते आणि शहराच्या इतिहासात त्या जागेला स्थान प्राप्त होतं. अशा जागांनी मुंबईचा दक्षिण भाग अगदी फुललेला आहे, वर्षानुवर्ष आणि पिढयानपिढ्या लोक अशा ठिकाणी जाऊन खवय्येगिरी करत असतात.




दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंटच्या समुद्राजवळ विधानसभेच्या रस्त्यावरुन सरळ गेल्यावर अतिशय प्रसिद्ध असा मेकर टॉवर्स नावाचा इमारतींचा समूह आहे. यातील एका इमारतीच्या तळ मजल्यावर गेली अनेक वर्ष दिमाखानं उभं आहे ते पूर्णपणे शाकाहारी असं स्टेटस नावाचं अतिशय लोकप्रिय असं रेस्टॉरन्ट. शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी हे ‘स्टेटस’ रेस्टॉरन्ट दूरदूरुन आलेल्या खवय्यांना पंजाबी, गुजराती आणि दक्षिण भारतीय चवींचा पाहुणचार करत असतं. तर वर्किंग डेला आजूबाजूच्या ऑफिसेसचे लोक दुपारच्या जेवणाची गरज इथल्या चवदार जेवणाने भागवतात.

सुट्टीच्या दिवशी तुम्ही जर हे प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरन्ट शोधत-शोधत विधानभवनाच्या मागच्या रस्त्यावर चालत-चालत गेले तर लांबूनच एका इमारतीच्या अंगणात साधारण ६०– ७० खुर्च्या टाकलेल्या दिसतात आणि मुख्य म्हणजे त्या सगळ्या खुर्च्या भरलेल्या असतात. स्टेटसमध्ये टेबल मिळण्याची वाट हे सगळे लोक बघत असतात.



खऱ्या अर्थानं नरिमन पॉईंटचं स्टेटस हे मल्टीक्युझिन या सदरात मोडणारं. पण विविध प्रकारच्या भारतीय खाद्यसंस्कृतीचीच झलक आपल्याला स्टेटसच्या मेन्यूकार्डात दिसते. गार्लिक ब्रेड, किंवा शेझवान पोटॅटो असे एखाद दोन पदार्थ सोडले तर इतर सगळे भारतीय पदार्थच इथे तुम्हाला मिळणार. अगदी प्रयोग करुन खास ‘स्टेटस स्पेशल’ म्हणून केलेले पदार्थसुद्धा भारतीयच म्हणजे भारतीय पदार्थांचेच नवनवीन व्हर्जन्स इथे दिसतात.



स्टेटस हे खरं तर फक्त आणि फक्त चांगल्या चवी या एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. पण अगदी समुद्राजवळ असणं हे तिथे जेवायला जाण्यासाठी आकर्षणाचं कारण ठरतं. नरिमन पॉईंटला जाऊन समद्राचा आनंद लुटल्यावर खवय्यांची पावलं अगदी सहाजिकपणे या स्टेटस नावाच्या फुड हेवनकडे वळतात. पण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मात्र परिस्थिती अतिशय वेगळी असते. जवळच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांना चवदार खायला तर हवं असतं पण स्टेटसला टेबल मिळण्याची वाट बघण्याइतका वेळ नसतो. अशांसाठी स्टेटसचं फास्ट फूड काऊंटर तिथेच त्यांच्या जागेतच बाहेर उघडलं गेलं आहे. नाव स्टेटस फास्ट फूड काऊंटर असलं तरी इथे बर्गर, पिझ्झासारखे फास्ट फूड आयटम्स बिलकूल मिळत नाहीत. उलट पोट भरतील असे दक्षिण भारतीय पदार्थ, पुलाव, पराठे असे ऑफिसेसच्या वेळात पटकन खाता येणारे पदार्थ या काऊंटरवर मिळतात. अर्थात या काऊंटरवर मिळणारे पदार्थ बाहेरच टाकलेल्या टेबलवर बसून खावे लागतात किंवा पार्सल पर्याय तर असतोच.



पण या उलट एक दीड तास थांबून जर तुम्ही स्टेटसच्या मुख्य रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश मिळवला तर मात्र तुमचे जिभेचे चोचले पूर्ण होणार यात शंकाच नाही. इथले काही स्टार्टर्स तर असे आहेत की जे खायला तुम्हाला नरिमन पॉईंटचं स्टेटसच गाठावं लागणार. मिनी पाव भाजी नावाचा असाच मस्त पदार्थ इथे मिळतो. इटुकले पिटुकल्या पावात भाजी भरलेली असते आणि टूथपिक टोचून त्याला छोट्याशा बर्गरसारखं सर्व्ह केलं जातं.



तोच प्रकार मिनी वडा पाव किंवा मिनी ग्रिल्ड वडापावचा. त्याच छोटया पावामध्ये पिटुकला वडा ठेवलेला असतो. हे दोन्ही मिनी पदार्थ चवींना मात्र एकदम जबरदस्त असतात आणि जेवणाआधी भलामोठा वडापाव खाण्यापेक्षा असा एटुकला एकेक वडा किंवा मिनी पाव भाजी खाणं पुढच्या जेवणासाठी चांगलं ठरतं. इडली चिप्स नावाचा पदार्थही असाच आपल्या पारंपरिक पदार्थापासून तयार केलेला एक हटके पण चवदार पदार्थ. स्टेटसला खवय्येगिरी करायला गेल्यावर या मिनी प्रयोगांची चव जवळपास सगळेच चाखतात.



स्टेटसचं साऊथ इंडियनही चांगलंच लोकप्रिय आहे आणि दिवसाच्या कुठल्याही वेळी इथे लोक इडली डोसा, रस्सम वडा अशा पदार्थांवर ताव मारताना दिसतात. सगळ्यात गंमत म्हणजे इथलं सांबार खूप प्रसिद्ध असल्याने वेटर रिकाम्या वाट्या आणि सांबार वाढण्याचं मोठं भांडंच आणून ठेवतो टेबलवर. लोकही असं टेबलवर ठेवलेलं सांबार मनसोक्त ओरपतात. स्टेटस खऱ्या अर्थानं फॅमिली रेस्टॉरन्ट आहे आणि म्हणूनच सर्व वयाच्या लोकांना आवडतील अशा पदार्थांचं छान कॉम्बिनेशन इथल्या मेन्यूत दिसतं.



म्हणजे पोळ्यांचा मेन्यू घेतला तर नान, रोटी यांच्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी गरमागरम फुलकेही असतात आणि नरम अशी रुमाली रोटीही. पंजाबी भाज्याही नेहमीपेक्षा जरा वेगळ्या खायच्या असतील तरी स्टेटसच गाठायला हवं. पनीर छोले सारखा नेहमीपेक्षा जरासा वेगळा पंजाबी भाजीचा प्रकार किंवा भारतीय कोर्मा इटालियन स्टाईलमध्ये असे पारंपरिक पदार्थांचे किचिंत वेगळे प्रकार इथे लोकांचं आकर्षण ठरतात. एका प्लेटमधली भाजीची क्वांटिटीदेखील इतर ठिकाणपेक्षा जरा जास्तच चार लोकांना पुरेल एवढी, त्यामुळे तर कौटुंबिक जेवणांसाठी स्टेट पहिला चॉईस ठरतो. अर्थात स्टेटसच्या अनेक वेगळ्या डिशेस लोकप्रिय असल्या तरी सर्वात लोकप्रिय आहे ती इथली थाळी. स्टेटसची थाळी म्हणूनच ही प्रसिद्ध आहे. चार भाज्या, एक स्टार्टर, तूप लावलेल्या गरमा गरम पोळ्या किंवा फुलके, भात, पुलाव आणि ताक अशी ही थाळी दुपारच्या वेळात तर लोकांना फारच आवडते.



इथल्या थाळीबरोबर मिळणारं ताक थाळी न घेणारेही आवर्जून मागवतात. अतिशय चविष्ट असलेली ही थाळी इतर प्रसिद्ध थाळी रेस्टॉरन्टपेक्षा तुलनेनी स्वस्तही असल्याने ऑफिसच्या मधल्या वेळात येऊन खाणाऱ्यांनाही चांगलीच परवडते. अर्थात बाकीचे पदार्थ मात्र इतर ठिकाणच्या पदार्थांपेक्षा किमतीने चांगलेच जास्त आहेत. पण स्टेटसची लोकप्रियता आणि नरिमन पॉईंटचं लोकेशन यामुळे थोडेसे चढे दर अपेक्षितच आहेत. पण तासभराचं वेटींग आणि जरासे जास्त दर याचा विचार न करता  केवळ चवींसाठी खवय्यांनी या ट्रेडीशनल रेस्टॉरन्टला भेट द्यायलाच हवी.

संबंधित ब्लॉग :


जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे




जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला


जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी  – ‘द जे’


जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29


जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री


जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना


जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट

जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच

जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट

जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद

जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर


जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे

जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर

जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट

जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’

जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’

जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट