हल्लीच्या बातम्या बघून लक्षात तर येतंच की मरण खूप सोपं झालंय... माणूस कसाही आणि कुठेही मरु शकतो... पण तो इतका वेडाही नसावा की स्वतः आयुष्य संपवून घ्यावं...
गेल्या 2 दिवसातल्या दोन फेसबुक पोस्ट...
काहीतरी पर्सनल कारणांनी आयुष्याला वैतागुन टाकलेले स्टेटस...
आणि त्यावर त्यांना असं काहीही करु नका... आयुष्य एकमेव असतं... घरच्यांचा विचार करा... काही इन्स्पिरेशनल मेसेज... काही लोक तर स्वतःचा नंबर पण देतायत... कसलीही मदत हवी असेल तर आम्ही करु... पण चुकीचं काही पाऊल उचलू नका अशी विनवणीही करतायत...
सगळ्यांनाच काहीनाकाही टेंशन असतातच... कोणाला घरचं असेल, कोणाला ऑफिसचं, कोणाला प्रेमाचं किंवा कोणाला काही इतर....
पण ठीक आहे ना... ते सोडवण्याचे मार्गही खूप असतात.
आणि त्यासाठीच तर आपली जवळची लोकं असतात, आपला मित्र परिवार असतो.
हल्लीची पिढी (अगदी मी सुद्धा) तर इतकी उतावळी (impatience) आहे की सगळ्या गोष्टी, सगळे परिणाम इन्स्टंट हवेत...
मान्य आहे मानसिक ताण खूप येतो, डिप्रेशनमध्ये जायची वेळ येते... पण आयुष्यात एखादी व्यक्ती तरी अशी असतेच की तिच्याशी आपण त्या गोष्टीवर मोकळेपणाने बोलू शकू. मग ती कोणीही असो... आई, बाबा, मित्र, मैत्रीण, आजी, ऑफिसचे सहकारी.
त्यांच्याशी बोला ना...
एकदम तडकाफडकी जीवन संपवण्याचा निर्णय घेणं हा त्यावरचा पर्याय नाही.
आता ही गोष्ट किती जणांना पटेल न पटेल मला नाही माहिती... पण 'मी आयुष्य संपवतोय, उद्या असेन नसेन माहिती नाही, मित्रांनो मला माफ करा, मी सगळ्यांपासून दूर चाललो आहे' हे फेसबुक वर टाकायची काय गरज???? सिंLet's Liveपथी , अटेन्शन मिळवण्यासाठी का फक्त???
तुमच्यामुळे या सोशल मिडियावरच्या लोकांना का टेंशन??? इथे इतके भावनिक लोक आहेत की त्यांना ही त्याचा त्रास होतो... ओळख असेल नसेल ते सगळे त्या पोस्ट वर तुटून पडतात... त्यांची काळजी साहजिक आहे...
इकडून तिकडून नंबर, पत्ता मिळवून काही स्वतः त्यांच्या शोधात बाहेर पडतात... ही खरंतर माणुसकी आहे. पण तुम्ही या माणुसकीचा गैरफायदा घेताय.
डिप्रेशन, टेंशन या गोष्टी क्षणिक असतात...
कोणाशी भांडणं असतील ती मिटतील...
घरी प्रॉब्लेम असतील तर वेळ जाऊद्या सॉल्व्ह होती...
नापास झालो तर परत परीक्षा देता येते...
ब्रेकअप झालं तरी इट्स ओके... ती व्यक्ती आपल्यासाठी नव्हती... योग्य व्यक्ती मिळेलच... जी तुम्हाला समजेल, सांभाळेल....
ऑफिसचे टेंशन असतील, खूपच झालं तर जॉब बदलता येईल... तुम्ही तेवढे सक्षम आहात...
कर्ज पण फिटेल... काम करा... कामात झोकून द्या...
पण या क्षणिक गोष्टींसाठी एवढं मोठं आणि मस्त आयुष्य का बरं संपवायचं???
धीर धरायला हवा...
Good things take time ️