Year Ender 2022 : ज्योतिषशास्त्रात देव गुरु बृहस्पति हा ज्ञान, संतती, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, संपत्ती, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारक मानला जातो. असे म्हटले जाते की, तो शक्ततो सर्व लोकांना शुभ फळ देत असते. याला सर्वात शुभ फळ देणारा ग्रह म्हटले गेले आहे. देव गुरु बृहस्पति हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. त्याचे उच्च राशीचे चिन्ह कर्क मानले जाते आणि त्याची निम्न राशी मकर मानली जाते.
ज्योतिषास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पतीने 13 एप्रिल 2022 रोजी त्याची स्वत:च्या मीन राशीत प्रवेश केला होता आणि 29 जुलै 2022 रोजी पहाटे 02:06 वाजता तो परत मुळ राशीत आला. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 04:31 वाजता मीन राशीतच संक्रमन झाले. म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.31 वाजता मीन राशीत सरळ चालू लागली. गुरूच्या प्रतिगामी गतीमुळे ठराविक0 राशीच्या लोकांची रखडलेली कामे सुरळीतपणे होऊ लागली.
वृषभ : बृहस्पति स्वतःच्या राशीतून 11 व्या स्थानावर आहे. ज्योतिषशास्त्रात हे स्थान लाभ आणि उत्पन्नाचे मानले जाते. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. व्यवसायात भरपूर नफा होतो. बराच वेळ रखडलेली कामे सुरू होतात. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहिल.
मिथुन : या राशीच्या लोकांना गुरू ग्रहाच्या प्रतिगामी कालखंडात बरेच फायदे होतील. नोकरीशी संबंधित लोकांना चांगले यश मिळेल. यादरम्यान त्यांचे नशीब उजळले. त्यांची रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल.
कर्क : गुरूच्या प्रतिगामी काळात कर्क राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतात. त्यांचा प्रवास यशस्वी होतो. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांना खूप फायदा होतो. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या