Goodbye 2022, Year Ender 2022 Diwali : 2022 हे वर्ष संपायला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी झाली. दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होते. म्हणजेच सूर्यग्रहणाच्या सावलीत दिवाळीचा सण साजरा झाला. सूर्यग्रहणामुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी करण्यात येणाऱ्या गोवर्धन पूजेची तारीखदेखील एक दिवस पुढे पाहायला मिळाली. गोवर्धन पूजा 25 ऑक्टोबर ऐवजी 26 ऑक्टोबरला साजरी करण्यात आली. असे तब्बल 27 वर्षांनंतर घडले आहे.
2022 च्या दिवाळीला सूर्यग्रहणाची छाया
कॅलेंडरनुसार दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. यावेळी 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरला मंगळवारी सूर्यग्रहण होते. हे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:29 वाजता सुरू झाले आणि भारतीय वेळेनुसार 6:32 वाजता संपले. हे सूर्यग्रहण 4 तास 3 मिनिटांचे होते. हे सूर्यग्रहण भारतात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दिसले.
या राशींवर सूर्यग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव पडला
2022 च्या दिवाळी नंतरचे सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण होते आणि ते फक्त भारतात काही ठिकाणीच दृश्यमान होते. पंचांगानुसार हे सूर्यग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात दिसले.
हे सूर्यग्रहण ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे होते कारण ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र, शुक्र आणि केतू हे तीन ग्रह देखील तूळ राशीत होते. राहू आणि शनी देखील तूळ राशीत होते. अशा स्थितीत तूळ राशीसोबतच कन्या, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम होतो. स्वाती नक्षत्रात जन्मलेले आणि तूळ राशीचे लोक. हे सूर्यग्रहण पाहणे त्यांच्यासाठी निषिद्ध मानले जात होते.
2022 या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण :
2022 या वर्षातील दुसरे आणि शेवटचे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी झालं. हे सूर्यग्रहण जरी दिसले तरी ग्रहणाचा सुतक कालावधी आदल्या दिवशी रात्रीपासून सुरू झाला. म्हणजेच सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू झाला. सूर्यग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध आहे. यामुळे ग्रहणाशी संबंधित सर्व धार्मिक मान्यता पाळल्या गेल्या. मंगळवारी सकाळी 11 वाजून 28 मिनिटांपासून सूर्यग्रहण सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांपर्यंत हे सूर्यग्रहण होते. पण भारतात हे ग्रहण 4 वाजून 49 मिनिटांपासून दिसायला सुरुवात झाली आणि 5 वाजून 32 मिनिटांपर्यंत राहिले.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Horoscope Today 4 December 2022 : या राशींना आजचा दिवस असेल खूप फायदेशीर! जाणून घ्या आजचे राशीभविष्य