India Pakistan Match Astrological Prediction : भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे. कारण केवळ हे दोन देशच नाही, तर जगभरातील देशांचे लक्ष या सामन्यावर असते. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता भारताचा सामना 14 ऑक्टोबर 2023 म्हणजेच आज शेजारी देश पाकिस्तान संघाशी होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ग्रहांची स्थिती काय असेल? या सामन्यासाठी ज्योतिषीय गणना काय सांगते? जाणून घ्या


 


भारत-पाकिस्तान सामना, साऱ्यांनाच प्रतीक्षा
खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची नेहमीच प्रतीक्षा असते. पण जेव्हा विश्वचषक येतो तेव्हा सामना अधिक रोमांचक होतो. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यासाठी 14 ऑक्टोबर 2023 आजची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारतीय या खेळाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि भारताच्या विजयासाठी प्रार्थनाही करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघ याआधी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानकडून पराभूत झाला आहे. भारताने आयोजित केलेला ICC विश्वचषक 2023 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाला आहे. विश्वचषकासाठी 45 दिवसांत एकूण 49 सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.


 



भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ग्रहांची स्थिती काय असेल?
भारतासह जगभरातील लोक ज्योतिषाच्या अंदाजांवर विश्वास ठेवतात. 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार्‍या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ज्योतिषीय गणना काय सांगते, ग्रहांच्या हालचाली काय दर्शवितात, ग्रहांच्या स्थितीवरून समजून घेण्याचा प्रयत्न करूया


 



भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी सूर्यग्रहणाची छाया
आज भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ग्रहांची हालचाल विशेष असणार आहे आणि या दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे. मात्र, या ग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव पडणार नाही असे म्हणणे ज्योतिषशास्त्राच्या आधारे शक्य नाही. त्यामुळे या विशेष खगोलशास्त्रीय घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पंचागानुसार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 08:34 वाजता सूर्यग्रहण होईल, जेव्हा सूर्य, पृथ्वी, चंद्र एकाच रेषेतून जातील आणि चंद्राची सावली सूर्यावर पडेल.


 



गुरु, शनि आणि राहू हे त्रिकूट भारताला विजय मिळवून देईल का?
वर्ल्ड कपमध्ये भारताने याआधी 7 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वेळी भारताच्या विजयात गुरुची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. यावेळी 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असताना ग्रहांची स्थितीही अशीच आहे. गुरु त्याच्या मित्राच्या राशीत आहे, मेष ज्याचा स्वामी मंगळ आहे. 1983 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला तेव्हाही गुरू मंगळाच्या राशीत स्थित होता. अशीच परिस्थिती यंदाही पाहायला मिळत आहे. यावेळीही राहूची स्थिती विशेष आहे. जी यावेळी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसते.


 



भारत-पाकिस्तान सामन्यात मंगळ आणि शनीची भूमिका
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा खेळाच्या मैदानाचा मजबूत प्रतिनिधी आहे. 03 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाने कन्या राशीतून शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश केला आहे आणि तो चित्रा नक्षत्रात आहे. तर शनि सध्या मंगळाच्या धनिष्ठ नक्षत्रात आहे. अशा स्थितीत ग्रहांच्या स्थितीमुळे भारताच्या बाजूने निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास मंगळ, शनि आणि गुरु यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.


 



भारताला जिंकण्यासाठी संघर्षाला सामोरे जावे लागेल?
ज्योतिषशास्त्रात शनि हा देखील मेहनतीचा कारक मानला जातो, त्यामुळे भारताला जिंकण्यासाठी कोणत्या ना कोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागेल हा देखील योगायोग असू शकतो. मंगळ सुद्धा कुठेतरी रणनीतीचा कारक आहे. मंगळ हा युद्ध आणि युद्धाचे कारणही मानला जातो. त्यामुळे या संपूर्ण सामन्यात मंगळाची भूमिका दुर्लक्षित करता येणार नाही. गुरू जो सल्ला आणि मार्गदर्शनाचा कारक आहे. काही प्रमाणात तो संघाच्या कर्णधाराची भूमिकाही प्रभावी बनवतो. म्हणजे संघप्रमुखाला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. एक चुकीचा निर्णय अनेक गोष्टींना कारणीभूत ठरू शकतो.


 


क्रिकेटप्रेमींना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागणार 
या दिवशी ग्रहण देखील होत आहे. हे ग्रहण केतूवर आधारित आहे. केतू हा देखील संशोधनाचा कारक आहे. हुशारी आणि मुत्सद्दीपणा हे केतूचे मुख्य गुण आहेत. त्यामुळे टीम इंडियाला प्रत्येक परिस्थितीसाठी मैदानावर तयार राहावे लागणार आहे. कारण ग्रहांची स्थिती रणनीती बनवण्याचे आणि चेंडूनुसार खेळण्याचे जोरदार संकेत देत आहे. त्याचबरोबर क्रिकेटप्रेमींनाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. राहू हा कोणत्याही गोष्टीची तीव्रता अनेक पटींनी वाढवणारा ग्रह आहे, तो ग्रहणही आहे. अशा परिस्थितीत काहीही परिणाम होऊ शकतो. ते केवळ खेळाच्या भावनेने पाहिले आणि समजून घेतले पाहिजे. कारण शनि हा कर्माचा दाता आहे, जो शुभ-अशुभाची गणना करतो आणि शुभ-अशुभ फल देतो. ही गोष्ट विसरता कामा नये.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Surya Grahan 2023 : आज वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार, कोणत्या राशीवर होणार परिणाम? भारतात दिसणार का? जाणून घ्या