Silk Cloth In Temple : आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी आसन घेतो. कधी जेवणासाठी, तर पूजेसाठी कधी जप करताना तर कधी देवाची पूजा करताना. आसनाशिवाय पूजा अपूर्णच मानली जाते. ज्या प्रकारे आपण स्वत:साठी आसन घेतो तसेच पूजेमध्ये (Puja) देखील देवासाठी आसन ठेवतो. देवाला रेशमी वस्त्र घालतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मंदिरात (Temple) पूजेसाठी नेहमी रेशमी वस्त्रच का वापरण्यात येते? हीच माहिती आज जाणून घेऊयात. 


रेशमी वस्त्र वापरण्यामागे 'हे' आहे शास्त्रीय कारण...


आपल्याकडे पौराणिक काळापासून रेशमी वस्त्र हे वापरण्यात येते. यामागे शास्त्रीय कारण असं आहे की, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि उत्पन्न झालेल्या चेतनामयी ऊर्जेचं संरक्षण करण्यासाठी रेशमी वस्त्र वापरण्यात येते. 


रेशमी वस्त्र हे विद्युतवाहक आहे. काळोखात रेशमी वस्त्रावर हात घासला तर प्रत्यक्ष वीज निर्माण झालेली दिसते. ज्यावेळी पूजेसाठी मंत्रोच्चार केले जातात अशावेळी त्यातून निर्माण होणारी विद्युत रेशमी आसनाने आणि रेशमी वस्त्राने आणखी वाढते. 


दुसरं कारण म्हणजे, लोकरही रेशमाप्रमाणेच विद्युत उत्पादक आहे म्हणूनच ती जंतुघ्न आहे. 


तसेच, रेशमी वस्त्र दररोज धुवावे लागत नाही. लोकरीचे वस्त्र उबदार असते. म्हणजेच ते विद्युत उत्पादक असते. यासाठीच धर्मकर्ते, ज्योतिषी यावर बसून कर्म करतात. 


आपल्या भारतीय परंपरेत, रूढी, प्रथांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामागचं शास्त्र आपल्याला माहीत नसतं. यामागे आध्यात्मिक कारण तर आहेच पण शास्त्रीय कारण सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचे उपवास करणारे सर्व हिंदू खातात पाकिस्तानचे मीठ, नेमका प्रकार काय?