What Is Reason Behind Antim Sanskar Hindu Religion? भारत (Indian Religion) हा विविधतेनं नटलेला देश आहे, हे आपण सर्वच जाणतो. भारताची खाद्यसंस्कृती, वेशभूषा आणि इतरही अनेक गोष्टींची जगभरात चर्चा असते. आपल्या संस्कृतीसोबतच भारत आपल्या प्रथा-परंपराही जपतो. आपल्या देशात एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रथा-परंपरा जोपासल्या जातात. यापैकीच एक म्हणजे, भारतात राहणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर केले जाणारे अंत्यसंस्कार. ही परंपरा प्रत्येक जाती-धर्मानुसार वेगवेगळी असल्याचं पाहायला मिळतं. हिंदू धर्मात (Hindu Religion) व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहाला अग्नी (Hindu Body Cremation Antim Sanskar) दिला जातो. तर, मुस्लिम समाजात मृतदेह दफन केला जातो. या जगात मृत्यू झालेल्या व्यक्तीला दुसऱ्या जगात पाठवण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार (Antim Sanskar) केले जातात, अशी मान्यता आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो की, प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या परंपरा का आहेत? हिंदू धर्मात मृतदेह जाळला का जातो? मृतदेह जाळण्याची परंपरा का जोपासली जाते? या सर्व प्रथा-परंपरा मानण्यामागे अनेक मान्यता आहेत. 


अंत्यसंस्कार म्हणजे, 'अंतिम त्याग'. महाभारताच्या कथेनुसार, एकदा यमराजांनी युधिष्ठिराला विचारलं की, सर्वात मोठा चमत्कार कोणता? युधिष्ठिर म्हणाले की, दररोज अनेक लोक मरतात, परंतु तरीही जगण्याची इच्छा सर्वांच्या मनात कायम असते. मृत्यू प्रत्येकाला येणार हे निश्चित आहे, पण माणूस नेहमी हे सत्य टाळण्याचा प्रयत्न करतो. यासोबत असं मानलं जातं की, लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या जगात किंवा स्वर्गात, नरकात जिवंत राहतात. यासोबतच हिंदू धर्मात मृत्यू आणि पुनर्जन्म या दोन्ही गोष्टींबाबत मान्यता आहे. असंही मानलं जातं की, केवळ शरीर मरतं, पण त्या व्यक्तीचा आत्मा कायम अमर असतो. आत्मा नव्या शरीरासह नवा जन्म घेतो. अशातच हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानलं जातं. ते भौतिकरित्या त्या शरीराला पृथ्वीवरून काढून टाकतं आणि त्यासोबतच आत्मा आपला नवा प्रवास सुरू करतो.


धार्मिक मान्यतेनुसार, पवित्र अग्नी शरीराला शुद्ध करतो. मृत्यूनंतर आत्मा त्याचं नवं जीवन सुरू करतो आणि नंतर नव्या शरीरासह जन्म घेतो. मानवी शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि मृत्यूनंतर मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर शरीराची राख होते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या अस्थी (शरीराची राख) एकत्र करुन, नंतर ती एकत्र करून वाहत्या पाण्यात टाकली जाते. यासोबतच असं मानलं जातं की, देह जाळल्यानंतरच मृत व्यक्तीला या जगातून मुक्ती मिळते आणि आत्मा नव्या शरीरात जाण्यासाठी मुक्त होतो. त्यामुळेच हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो. 


(वरील सर्व कथा, मान्यता केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


महिलांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव का करतात? जाणून घ्या, 5 कारणं