Weekly Horoscope Love 1-7 January 2024 : नवीन वर्ष 2024 सोबतच नवीन आठवडा देखील सुरू होत आहे. या आठवड्यात तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांचे प्रेम जीवन कसे असेल? या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात काय नवीन घडणार? जाणून घ्या या 6 राशींचे साप्ताहिक प्रेम राशीभविष्य.
जानेवारीचा पहिला आठवडा कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल?
या आठवड्याची सुरुवात नवीन वर्षाने होत आहे. ज्योतिषींच्या मते, चंद्राच्या स्थितीनुसार या आठवड्यात अनेक राशींचे लव्ह लाईफ चांगले राहू शकते. चंद्राच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात तो सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशींमध्ये प्रवेश करेल. अशा स्थितीत चंद्र कन्या राशीत केतूसोबत आहे. यासोबतच वृश्चिक राशीमध्ये शुक्र आणि बुधाचा संयोग आहे, ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. जाणून घेऊया जानेवारीचा पहिला आठवडा कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल…
तूळ
तूळ राशीच्या लोकांनी वर्षाच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरीने पुढे जावे. प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी प्रेम जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. तुमच्या कठीण काळात तो सावलीसारखा तुमच्यासोबत असेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला आठवडा प्रेमसंबंधांसाठी चांगला राहणार नाही. या आठवड्यात तुमच्या नात्यात काही अडचणी येऊ शकतात. तृतीय व्यक्तीच्या प्रवेशामुळे प्रेम जीवनात समस्या निर्माण होतील.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस प्रेमसंबंधांसाठी चांगला राहील. परंतु या आठवडय़ात विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराच्या तब्येतीची चिंता लागू शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी वर्षाच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या प्रिय जोडीदारासोबत काही गैरसमज होऊ शकतात. यावर मात करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत लागेल. या आठवड्यात तुमच्या जीवनसाथीचा शोध घ्या.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला आठवडा प्रेम संबंधांमध्ये सावधगिरीने पुढे जावे.एकमेकांच्या भावनांचा आदर करा. प्रेमसंबंधात कोणत्याही प्रकारचे ढोंग टाळा.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला आठवडा प्रेमसंबंधांसाठी चांगला राहील. प्रेम जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आनंद राहील
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Weekly Horoscope Love 1-7 January 2024: नवीन आठवड्यात मेष ते कन्या राशीच्या लोकांचे प्रेम जीवन कसे असेल? साप्ताहिक प्रेम राशीभविष्य जाणून घ्या