Weekly Horoscope 6-12 May 2024 : मे महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मकर आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. मेचा पहिला आठवडा (6 May To 12 May Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra)
नवीन आठवड्यात तुम्हाला नेहमीपेक्षा थोडं अधिक शांत आणि एकटं राहावं लागेल. ध्येय साध्य केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची बुद्धी आणि ज्ञानाचा पूरेपूर वापर कराल. या आठवड्यात घरात तुमच्या लग्नाबद्दल चर्चा होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घरात काही नवीन गोष्टी घडतील, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही जोडीदारासोबत व्यस्त असाल. तुम्ही जोडीदाराला जास्त वेळ द्याल. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांच्या नात्यात बाहेरच्या लोकांमुळे तणाव वाढू शकतो, त्यामुळे सावध राहा.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीचे लोक या आठवड्यात तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व कामांत कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात भाऊ आणि मित्रांसोबत काही विषयांवर चर्चा होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत लाभेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या वडिलांची तब्येत खालावली असल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणं टाळा.
धनु रास (Sagittarius)
तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल आणि तुमची ट्यूनिंग चांगली राहील. व्यवसायात सुधारणा होईल आणि चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक समस्यांवर चर्चा होईल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात पैशाची आवक कायम राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांशी जास्त बोलणं टाळा. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील, पण कुणाशीही जास्त बोलू नका.
मकर रास (Capricorn)
आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रास होईल. तुमची तब्येत या काळात बिघडू शकते. काही कामाबाबत मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात सर्व परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली राहील, मन प्रसन्न होईल. तुम्ही या आठवड्यात खूप रोमँटिक असाल. वैवाहिक जीवनात रोमान्स राहील, जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. व्यवसायात प्रगतीसाठी वेळ उत्तम राहील. व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक लाभ होईल, बँक बॅलन्स वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
कुंभ रास (Aquarius)
सुरुवातीला बॉसच्या पुढे-मागे करण्यात, त्याला खुश ठेवण्यात व्यस्त राहाल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, त्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय चांगला चालेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल आणि विवाहितांना त्यांच्या मुलांकडून प्रेम मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. आरोग्य बिघडेल. तुम्ही अधिक भावूक व्हाल. आरोग्य नाजूक राहील, पण आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या देखील भेडसावतील. व्यवसायात निराशा येऊ शकते. लव्ह लाईफमध्ये अडचणी येतील.
मीन रास (Pisces)
नवीन आठवड्यात नोकरी-व्यवसायात तुम्ही प्रगती कराल. तुम्ही कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्याल, कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्याल. आठवड्याच्या मध्यात पैशाची आवक वाढेल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही रोमँटिक राहाल. तुम्हाला तुमच्या प्रियकराचं सहकार्य मिळेल. तुमच्यामधीस काही खास गोष्टी तुमच्या बॉसला प्रभावित करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढेल. तुमचं आरोग्य बिघडू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: