Saptahik Rashi Bhavishya 4 To 10 March 2024 : काही राशींसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. 4 ते 10 मार्च दरम्याना काळ तुमच्यासाठी भरभराटीचा असेल. मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 04 ते 10 मार्च 2024 दरम्यानचं सर्व राशींचं साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक चिंतेने त्रस्त होतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची तब्येत बिघडू शकते. आठवड्याच्या मध्यात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे, हा काळ सुखाचा असेल. नशीब तुम्हाला साथ देईल. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत व्यावसायिक जीवन सुधारेल, तुम्हाला चांगला नफा मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्ही घरातील काही उपयुक्त वस्तू खरेदी कराल, ज्या कुटुंबासाठी देखील खूप महत्त्वाच्या असतील. तुमच्या व्यवसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यही चांगलं राहील.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगलं आरोग्य लाभेल. वैयक्तिक जीवनातील चढ-उतारानंतर आता आनंदी काळ सुरू होईल. तुमचं वैयक्तिक जीवन सुधारेल, प्रियकरासोबत चांगली केमिस्ट्री राहील. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून लाभ मिळेल. आठवड्याच्या मध्यात मानसिक तणाव वाढेल, तब्येत बिघडू शकते. धार्मिक कार्यात अधिक रस दाखवाल. या आठवड्यात गुंतवणूक करणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत लांबच्या प्रवासाचा आनंद घ्याल. तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत सुंदर प्रवासाचा आनंद घ्याल. नोकरीत बदल होऊ शकतो. तुम्ही ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असाल तर ती देखील होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला शारीरिक समस्यांनी त्रस्त होतील. मानसिक तणाव वाढेल. जास्त खर्च देखील तुम्हाला त्रास देऊ शकतो. या आठवड्यात तुम्ही चांगलं काम करत राहाल. व्यवसायिकांचा नवीन आठवडा चांगला असेल, आठवड्याच्या मध्यात तुम्हाला चांगले व्यावसायिक करार मिळतील. काही नवीन लोक तुमच्याशी जोडले जातील, ज्यांच्यामुळे व्यवसायात वाढ होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत काही महत्त्वाचं काम सुरू करू शकता. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात लव्ह लाईफचा बहरलेली असेल. जोडीदारासोबत जवळीक वाढेल. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या लव्ह लाईफचा मस्त आनंद घेतील. तुम्ही तुमच्या बुद्धीने तुमच्या आठवड्याची सुरुवात चांगली कराल. तुमचे उत्पन्न देखील मजबूत होईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आठवड्याच्या मध्यात विरोधक तुम्हाला काही प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यात यश मिळणार नाही. नोकरीत तुम्ही नीट काम कराल. या आठवड्यात तुमचे काही खर्च होतील, पण ते आवश्यक कामावर असतील आणि भविष्यात तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं असेल, जोडीदारासोबत तुमची जवळीक वाढेल. रोमान्स होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं ट्यूनिंग अधिक मजबूत होईल. व्यवसायासाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहील. व्यवसायात चांगली प्रगती होईल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मुलांसोबत आनंदी राहतील. तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ काढाल. लव्ह लाईफसाठीही काळ चांगला राहील. तुमच्या उत्पन्नावर तुम्ही समाधानी असाल. आठवड्याच्या मध्यात नोकरीत तुमची कामगिरी चांगली राहील. तुम्ही तुमच्या विरोधकांना ओळखाल. जास्त खर्च नक्कीच होईल, पण त्यामुळे तुम्हाला आनंदही मिळेल. आठवड्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वाद होऊ शकतात. व्यवसायात नवीन स्ट्रॅटेजी आखण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. या आठवड्यात काही नवीन संपर्क जोडले जाऊ शकतात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक जीवनात व्यस्त राहतील. तुम्ही तुमच्या कामावरही लक्ष केंद्रित कराल, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही थोडे व्यस्त असाल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत आनंदाचे क्षण घालवाल. प्रियकरासोबतची तुमची जवळीक वाढेल. नात्यात चांगली केमिस्ट्री आणि रोमान्स असेल. या आठवड्यात तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. उत्पन्न वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही उंचावेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात कोणाशी तरी भांडण होण्याची शक्यता आहे. जास्त खर्चामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो, तुमची तब्येत बिघडू शकते.


तूळ रास (Libra)


तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. तुमचे भावंडांसोबतचे संबंध चांगले होतील. आठवड्याचा अधिकाधिक वेळ तुम्ही मित्रांसोबत घालवाल. आठवड्याच्या मध्यात घरात आनंदी वातावरण असेल, तुम्ही काही पार्टी वगैरे करू शकतात. तुम्ही घरबसल्या कोणत्याही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये लव्ह लाईफमध्ये अडचणी येऊ शकतात. वादविवाद टाळा. तब्येतीची काळजी घ्या, पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही आकस्मिक लाभ मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. वैवाहिक जीवनात तुमचे संबंध सुधारतील, जोडीदाराशी जवळीक वाढेल. चांगल्या परस्पर ट्युनिंगमुळे, घरातील वातावरण देखील सकारात्मक असेल. व्यवसायात प्रगतीचा काळ असेल. आठवड्याच्या मध्यात आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या बोलण्यातून लोकांवर प्रभाव टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. मित्रांसोबत वीकेंडचा आनंद लुटता येईल. या आठवड्यात तुम्ही व्यवसायात धोका पत्करण्याचा प्रयत्न कराल.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रस्त होतील. तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे सावध राहा. आठवड्याच्या मध्यात तब्येत सुधारेल. रखडलेली कामं पुन्हा सुरू होतील. वैवाहिक जीवन सुधारेल. व्यवसायात अडकलेली कामं आता पूर्ण होऊ लागतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. घरी पार्टी आयोजित केली जाऊ शकते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. सासरच्या मंडळींशीही चांगलं जुळवून घ्याल.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगलं उत्पन्न मिळेल. सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. वैवाहिक जीवन सुखाचं असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल आणि आर्थिक मदत मिळू शकते. लव्ह लाईफही चांगली चालेल. व्यवसायात सुधारणा होईल आणि आर्थिक प्रगती होईल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढेल. तुम्ही कामात व्यस्त राहाल. व्यवसायाच्या कामानिमित्ताने लांबचा प्रवास होऊ शकतो. या आठवड्यात तुमचं आरोग्य कमजोर राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमच्या जीवनात आनंद असेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील, परंतु त्यांचं मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबाला चांगला वेळ द्याल आणि घरातही जास्त वेळ घालवाल. आठवड्याच्या मध्यात पैशाची आवक वाढेल. तुम्हाला हव्या तशा गोष्टी घडू लागतील. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढतील. मानसिक ताण वाढू शकतो. परदेश प्रवासाचा विचार करू शकतो.


मीन रास (Pisces)


मीन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आनंदी राहतील. लांबच्या प्रवासामुळे मन प्रसन्न राहील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात करिअरवर लक्ष केंद्रित कराल, या काळात तुम्ही खूप मेहनत कराल. तुमची कामगिरी सुधारेल. वैयक्तिक जीवनातही सुधारणा होईल. मुलांकडून आनंद मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. लव्ह लाईफमध्येही चांगला काळ असेल. तुमच्यात आणि जोडीदारात जवळीक वाढेल आणि तुम्ही तुमच्या नात्याचा आनंद घ्याल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani 2024 : कुंभ राशीत शनि-मंगळाचा विनाशकारी योग; देशासह जगभरात माजणार खळबळ, 'या' मोठ्या घटनांनी जग हादरणार