Weekly Horoscope 30 January to 5 February 2023 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास असणार आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 30 जानेवारीला शनि अस्त होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा आठवडा सर्व राशींसाठी खास आहे. सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या (Weekly Horoscope)



मेष
आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. मालमत्ता खरेदीच्या दिशेने प्रयत्न होऊ शकतात. लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील. काही कामात सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. लाइफ पार्टनरचे आरोग्य चढ-उतारांनी भरलेले असेल. आठवड्याच्या मध्यात प्रवासाचे योग येतील. मित्र आणि नातेवाईकांशी विशेष संवाद होईल. करिअरमध्ये सहकाऱ्याचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात घरात आनंदाचे वातावरण असेल आणि मनात शांती राहील.



वृषभ
आठवड्याची सुरुवात चांगली होईल. मनात आत्मविश्वास राहील. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. लाभाची शक्यता राहील. नोकरीतील तुमचे स्थानही निश्चित होईल. राग कमी करा, त्याकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक लाभ होईल. कुटुंबाच्या सहकार्याने तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात प्रवासाचे योग येतील. आरोग्य चांगले राहील.



मिथुन
आठवड्याच्या सुरुवातीला खर्चात वाढ होईल. तब्येत बिघडू शकते. गाडी जपून चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल, पण खर्च होईल. आठवड्याच्या मध्यात तब्येत सुधारेल. घरगुती जीवनात काही तणाव राहील. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. व्यवसायात चांगले योग येतील. नोकरीत यश मिळेल. आठवड्याचा शेवटचा दिवस यश देईल आणि धनलाभ होईल. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल.



कर्क
आठवड्याची सुरुवात चांगली होईल, उत्पन्न वाढेल. तुमच्याकडे अचानक पैसा येईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. लव्ह लाईफसाठीही काळ चांगला राहील. प्रियकरासह चांगला वेळ घालवाल. अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या मध्यात काही खर्च वाढतील, परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात करिअरवर लक्ष केंद्रित कराल. आरोग्य मजबूत राहील.



सिंह
आठवड्याच्या सुरुवातीला खूप मेहनत कराल. तुमच्या करिअरवर पूर्ण लक्ष असेल. इकडच्या तिकडच्या गोष्टी बाजूला ठेवून तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमची प्रशंसाही होईल. कुटुंबात जमीन मालमत्तेशी संबंधित कोणताही लाभ होऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यात धनलाभ होईल. लव्ह लाईफमध्येही सुधारणा होईल, जोडादारा सोबत रोमान्स करण्याची संधी मिळेल. मित्रांनाही वेळ द्याल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत आरोग्य थोडे कमजोर राहू शकते.



कन्या
आठवड्याची सुरुवात चांगली होईल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. नशिबाच्या जोरावर थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. कामात जास्त मेहनत करावी लागणार नाही. नोकरीत बदलीची परिस्थिती येऊ शकते. भावंडांशी चांगल्या संबंधाचा लाभ मिळेल. सप्ताहाच्या मध्यात करिअरमधील स्थिती निश्चित होईल. मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. घरात सुख-शांती नांदेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत चांगले काम केल्याने आर्थिक लाभ होईल. प्रेम संबंध चांगले असतील आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतील.



तूळ
आठवड्याची सुरुवात चढ-उतारांनी भरलेली असेल. घरगुती जीवनात तणाव राहील. जीवनसाथीसोबत वाद होऊ शकतो. आरोग्यही कमजोर राहील, पण गुंतवणुकीचा लाभ मिळेल. आधी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. आठवड्याच्या मध्यात प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकात सुधारणा होईल. चांगला धनलाभ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात करिअरकडे अधिक लक्ष द्याल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.



वृश्चिक
आठवड्याची सुरुवात कमजोर राहील. तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुमच्या कामात अडथळे येतील. काम करावेसे वाटणार नाही. कोणाशी वाद होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. मन अस्वस्थ होईल. आठवड्याच्या मध्यात तुमच्या जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला जाल, त्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकता. व्यवसायासाठी चांगला काळ जाईल. खूप सुधारणा होतील, उत्पन्न वाढेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात गुंतवणूक करणे टाळा. धनहानी होऊ शकते.



धनु
आठवड्याची सुरुवात चांगली होईल. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला राहील. चांगल्या उत्पन्नामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. अभ्यासात मन विचलित होईल. स्पर्धेत यश मिळू शकते. कोर्ट केसेसमध्येही चांगला काळ जाईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या घरगुती जीवनातील समस्यांपासून आराम मिळेल. घरामध्ये आनंद मिळेल. जोडीदारा पासूनचे अंतर कमी होईल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आरोग्याची काळजी घ्या.



मकर
आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. कामात यश मिळेल, उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली कामगिरी करता येईल. लव्ह लाईफसाठीही वेळ चांगला आहे. रोमान्सची शक्यता असेल. ते एकत्र अनेक लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात. नोकरी बदलण्याची परिस्थिती येऊ शकते. आठवड्याच्या मध्यात खर्चात वाढ होईल. तब्येत बिघडू शकते. आठवड्याचे शेवटचे दिवस आनंद आणतील. व्यवसायात प्रगती होईल. शासनाकडून लाभ मिळेल.



कुंभ
आठवड्याची सुरुवात चांगली होईल. घर कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देईल. घरासाठी आवश्यक वस्तू आणतील. तुम्ही जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करू शकता आणि नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. सप्ताहाच्या मध्यात चांगले उत्पन्न होईल. लव्ह लाइफसाठी चांगला काळ असेल आणि अभ्यास करणारे विद्यार्थी देखील चांगली कामगिरी केल्यानंतर समाधानी दिसतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आरोग्याची काळजी घ्या.



मीन
आठवड्याची सुरुवात चांगली होईल. मित्रांसोबत प्रवासाचे योग येतील. भावंडांची साथही मिळेल, उत्पन्न चांगले राहील. सरकारकडून फायदा होईल. आठवड्याच्या मध्यात घरी वेळ घालवाल. नोकरीतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले जातील. प्रेम जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. कोणत्याही कामात प्रियकराचे सहकार्य मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. नवीन नोकरीची संधी मिळू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


February Horoscope 2023: फेब्रुवारीत कोणाचे नशीब उजळणार? कोणाला मिळणार प्रमोशन? मासिक राशीभविष्य जाणून घ्या