Weekly Horoscope 3 to 9 June 2024 : वर्षातला सहावा महिना म्हणजेच जून महिना (June) आजपासून सुरु झाला आहे. हा महिना अनेक अर्थांनी खास आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक शुभ राजयोग देखील निर्माण होणार आहेत. तसेच, मंगळ, राहु, केतु आणि गुरुचं संक्रमण देखील या महिन्यात होणार आहे त्यामुळे काही राशींवर याचा शुभ परिणाम होणार आहे. त्यानुसार, मेष ते कन्या या सहा राशींसाठी जून महिन्याचा पहिला आठवडा (Weekly Horoscope) नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात जरा सावध राहणं गरजेचं आहे. या आठवड्यात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. कारण या महिन्यात तुमच्या खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. जितके खर्च होतील तितकेच पैसे कमावण्याच्या तुम्हाला संधीही मिळतील. फक्त या संधींचा तुम्ही फायदा घ्या.तसेच, जे तरूण अविवाहित आहेत त्यांना लग्नासंबंधित नक्कीच चांगली बातमी मिळू शकते. तसेच, या आठवड्यात तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत असणार आहे. कोणतीच समस्या तुम्हाला भेडसावणार नाही. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा हा आव्हानात्मक असणार आहे. जे नोकरदार वर्गातील लोक आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्यावर जास्त काम सोपवले जाऊ शकते.  तसेच, उत्पन्न वाढविण्याच्या नादात चुकीच्या मार्गाकडे वळू नका. तसेच, कोणाबरोबरही अनौपचारिक संबंध ठेवू नका. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी जून महिन्यातला पहिला आठवडा हा काहीसा फायद्याचा तर काहीसा तोट्याचा असणार आहे. या आठवड्यात व्यावसायिकांनी कोणताही मोठा निर्णय घेताना सावध राहा. याचा तुमच्या कामकाजावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच,या आठवड्यात  कर्मचाऱ्यांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील.


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी जून महिन्याचा पहिला आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांना आपला अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ लागेल. या आठड्यात तुम्ही तुमच्या तत्त्वांशी एकनिष्ठ असणं गरजेचं आहे. या काळात तुम्हाला एखादा आजार पूर्ण आठवडाभर जाणवेल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीसाठी पहिला आठवडा आव्हानात्मक जाणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की पैसे कमावण्यासाठी शॉर्टकट हा पर्याय कधीच निवडू नका. मेहनत केलेले पैसे नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जातील. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नात थोड्याफार प्रमाणत वाढ होईल. त्यामुळे तुमच्या संपत्तीची योग्य काळजी घ्या. तसेच, मेहनत घेत राहा. तसेच, या आठवड्यात नवीन लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mangal Gochar 2024 : मेष राशीत मंगळाच्या संक्रमणाने जून महिन्याची सुरुवात; 'या' 3 राशींना मिळणार बंपर लाभ, संपत्तीत होणार चिक्कार वाढ