पुणे : पुण्यात आतापर्यंत अनेकदा बॉंब ठेवल्याचे फेक फोन कंट्रोल रुमला येतात मात्र आता  पुण्यातील शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग आढळल्याने आता मोठी खळबळ उडालेली आहे. बॉम्बशोधक पथक शनिवार वाड्यावर दाखल झालेला आहे वाडा पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे या बेवारस बॅगची सध्या तपासणी सुरू आहे. 


शनिवार वाड्याच्या परिसरात बेवारस बॅग आढळल्याचा फोन पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला होता. त्यानंतर तात्काळ पोलीस आणि बॉम्बशोधक पथक शनिवार वाड्यात दाखल झालं. हे पथक या बॅगची पाहणी करत आहेत. संपूर्ण शनिवार वाडा मोकळा करण्यात आला आहे. शिपाईपासून ते पर्यटकांपर्यंत सगळ्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं आहे. पोलीस, बॉम्ब पथक आणि श्वानपथक या ठिकाणी उपस्थित आहे. बाकी कोणालाही या ठिकाणी आत येण्याची परवानगी दिली जात नाही आहे. 


शनिवार, रविवारी शनिवार वाड्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक शनिवार वाडा पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे शनिवार वाडा परिसरात मोठा बंदोबस्त असतो. सिक्युरिटी असते. हजारोंच्या संख्येने लोक येत असल्याने शनिवार वाड्याच्या सुरक्षिततेत कोणतीही कसर ठेवली जात नाही. मात्र अनेकदा शनिवार वाड्यात अशा बॅग ठेवल्याने किंवा बॉंम्ब ठेवल्याचे फोन पोलिसांच्या कंट्रोल रुमला जातात आणि सगळीकडे खळबळ उडते. मात्र यापूर्वी हे सगळे फोन फेक असल्याचं समोर आलं आहे. हा फोनदेखील फेक होता का?, किंवा या बॅगमध्ये नक्की काय आहे? ही बॅग कोणी ठेवली आहे?, याचा तपास सध्या सुरु आहे. 


पुण्यात यापूर्वी पुना हॉस्पिटलजवळ बॉम्ब ठेवल्याचा फेक फोन अज्ञाताने कंट्रोल रुमला केला होता. त्यावेळी यंत्रणा रात्रीच कामी लागली होती. शिवाय या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. महत्वाचं म्हणजे यावेळी रुग्णांना देखील हलवण्यात आलं होतं. या प्रकरणानंतर अशा फेक कॉल करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र पुन्हा एकदा संशयित बॅग आढळल्याने पोलीस कामाला लागले आहेत. या बॅगची तापसणी झाल्यावर संपूर्ण माहिती समोर येईल.


इतर महत्वाची बातमी-