Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : एप्रिल महिन्याचा शेवटचा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. तूळ आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. एप्रिलचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात थोडी समस्यांनी भरलेली असेल. कौटुंबिक वादामुळे तुमचं मन अस्वस्थ राहू शकतं. मोठे निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या घरातल्यांचं सहकार्य न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकता. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे योग आहेत. नवीन आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबतचे वाद संवादातून सोडवा.
वृश्चिक रास (Scorpio)
नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आळस सोडावा लागेल. आजचं काम उद्यावर ढकलू नका. जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. मस्करी करताना इतरांचा अपमान करू नका. कोर्टात गोष्टी तुमच्या बाजूने असल्याचं स्पष्ट दिसून येईल. आठवड्याचा शेवट चांगला होईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र परिणाम घेऊन येईल. या आठवड्यात तुम्हाला सुखसुविधांचा तितका लाभ घेता येणार नाही. व्यवसायात अपेक्षित नफा मिळूनही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल, यामुळे तुमची चिंता वाढू शकते. एखाद्याच्या सहकार्याने तुमचं एखादं सरकारी काम पुढे सरकेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध प्रस्थापित करणं टाळा. वैवाहिक जीवन सुखाचं जाण्यासाठी एकमेकांना वेळ द्या.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमची नाती नीट जपावी लागतील. निरुपयोगी कामात वेळ घालवण्याऐवजी महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. महत्त्वाच्या गोष्टी हाताळण्यात वेळ घालवा. जर तुम्ही कोणतीही मोठी गोष्ट साधण्याचा विचार करत असाल तर कुटुंबाची मदत नक्कीच घ्या. आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमची सर्व कामं पूर्ण होतील. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. तुमच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आल्यासारखं वाटेल. कोर्टात एखादा खटला सुरू असेल तर त्याच्या निकाल तुमच्या बाजूने लागेल. या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जावं लागेल. घरात नवीन पाहुण्याचं आगमन झाल्यामुळे या आठवड्यात आनंदाचं वातावरण राहील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बराच काळ अडकलेला सरकारी पैसा परत मिळू शकेल. कोणाशीही बोलत असाल तेव्हा आवाज सौम्य ठेवा, नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. या आठवड्यात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. या आठवड्यात तुमचे छंद जोपासण्यावर तुमचा अधिक पैसा खर्च होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: