Actor Sting Operation Video: बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक मोठ्या व्यक्तींवर कास्टिंग काऊचचे (Casting Couch) आरोप करण्यात आले आहेत. अनेक चित्रपट निर्माते (Filmmaker) आणि कलाकार (Actors) याला बळी पडले आहेत. एकेकाळी बॉलिवूडचा आवडता विलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अभिनेत्यावरही कास्टिंग काऊचचा (Casting Couch) आरोप करण्यात आला आहे. एका स्टिंग ऑपरेशननंतर, या अभिनेत्यानं एका मुलीला नोकरी देण्याच्या बदल्यात अत्यंत घाणेरडी मागणी केल्याचं उघड झालेलं. 

आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, तो दुसरा-तिसरा कुणीच नसून बॉलिवूडमधला सर्वात दमदार विलन शक्ती कपूर (Shakti Kapoor) आहेत. 2005 मध्ये त्यांचा एक व्हिडीओ (Video Viral) समोर आला होता. ज्या व्हिडीओनं सर्वांना जोरदार धक्का दिलेला. समोर आलेला हा व्हिडीओ एका स्टिंग ऑपरेशनदरम्यान काढलेला होता. ज्यामध्ये शक्ती कपूर यांनी एका मुलीकडे त्यांच्यासोबत रात्र घालवण्याची घाणेरडी मागणी करत होता. या एका व्हिडीओमुळे अभिनेत्याच्या कारकिर्दीवर पडदा पडला.

'मैं तुम्हें प्यार करना चाहता हूं, तुम्हें किस करना चाहता हूं...'

बॉलिवूडचे दमदार विलन शक्ती कपूर यांचं स्टिंग ऑपरेशन झालं होतं. ज्यामध्ये एक महिला रिपोर्टर मॉडेल बनून त्यांच्याकडे गेलेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शक्ती कपूर यांनी अंडरकवर रिपोर्टरला म्हणाले होते की, "मैं तुम्हें प्यार करना चाहता हूं. तुम्हें किस करना चाहता हूं." स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियानं शक्ति कपूर यांना कोणताही चित्रपट किंवा टेलिव्हिजन शोमध्ये काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, एका आठवड्यानंतर हा बॅन हटवण्यात आला. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शक्ती कपूर काय म्हणाले? 

कास्टिंग काऊचचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शक्ती कपूर यांनीही स्पष्टीकरण दिलं. आपल्या बचावात, शक्ती कपूर यांनी दावा केलेला की, अंडरकवर रिपोर्टरनं मला अशा गोष्टी बोलायला प्रवृत्त केलं. शक्ती कपूर म्हणालेले की, ज्या पद्धतीनं चॅनलनं मला यात गोवलं, त्याचं मला खूप वाईट वाटतंय. माझ्या प्रतिष्ठेला कलंक लावण्याचा हा प्रयत्न होता, यात मला कसलीही शंका नाही. तसेच, अंडरकवर रिपोर्टरनं मला तब्बल सहा महिन्यांपर्यंत फोन केला आणि न भेटल्यास आत्महत्येची धमकीही दिली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rashami Desai Casting Couch: 'ऑडिशनच्या निमित्तानं घरी बोलावलं आणि बेशुद्ध केलं...'; कास्टिंग काऊचच्या अतीप्रसंगाबाबत अभिनेत्री स्पष्टच बोलली