Weekly Horoscope 24 To 30 November 2025: हिंदू कॅलेंडरप्रमाणे, आजपासून नोव्हेंबरचा (November 2025) चौथा आणि शेवटचा म्हणजेच 24 ते 30 नोव्हेंबरचा ाठवडा सुरु झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा आठवडा अनेक राशींचं नशीब पालटणारा ठरणार आहे. कारण, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा शुभदायी असेल. तुमच्या कामात तुम्ही जास्त व्यस्त असाल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं नीट लक्ष असेल. कोणाच्याही अध्यात मध्यात न पडण्याचा तुम्हाला सल्ला देण्यात आला आहे. तसेच, मेहनत आणि चिकाटीने काम करणं सोडू नका. यश तुमच्याच हातात आहे.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात थोडी संथ गतीने होईल. तुमच्या कामात तुमचं मन जास्त रमणार नाही. तसेच, तुमच्या आवडीच्या कामातही तुमचं मन रमणार नाही. त्यामुळे मनातील विचार बाजूला ठेवा. पैशांची जास्त चिंता करु नका.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. या दरम्यान अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. नवीन योजना राबवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखी निर्माण होतील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं जाईल. नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम सुरु करु शकता. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
नवीन आठवडा तुमच्या नशिबाचे फासे पालटणारा असणार आहे. तुमच्या कामामुळे तुमची ओळख अधिक प्रभावीपणे दिसून येईल. तसेच, घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्यावर कोणाचा दबाव राहणार नाही.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी आठवड्याची सुरुवात आव्हानात्मक असणार आहे. मात्र, हळुहळू तुमच्यावर कामाचं प्रेशर नसणार. तुमच्या कामाचं कौतुक होईल. रचनात्मक गोष्टींचा विकास होईल. या आठवड्यात विनाकारण पैशांचा खर्च करु नका.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा स्थिरतेचा असणार आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवन सुरळीत चालेल. तुमच्या कामाप्रती तुमची एकनिष्ठता दिसून येईल. जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. ज्या कामाची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होतात. ते काम तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर पूर्ण होताना दिसेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. नात्यात गोडवा निर्माण होईल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. समाजातील काही अनुभवी व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. हातात नवीन प्रोजेक्ट मिळू शकतं.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी आजपासून सुरु होणारा आठवडा काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करणार असाल तर थोडं थांबा. जबाबदारीने आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. हातातून घडलेल्या चुकीबद्दल माफी मागा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करता येतील. तसेच तुमची लव्ह लाईफदेखील पूर्वीपेक्षा चांगली असेल. पैशांच्या बाबतीत तुमची आर्थिक स्थिरता दिसून येईल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी हा आठवडा काहीसा भावनिक असणार आहे. या आठवड्यात अनेक लोकांप्रती तुमची इमोशनल अटॅचमेंट दिसून येईल. घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. तसेच, तुमच्या आरोग्यात देखील सुधारणा पाहायला मिळेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल.
हे ही वाचा :