Weekly Horoscope 2 To 8 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिन्याचा महिना संपून लवकरच जून महिन्याला सुरुवात होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार आनंददायी असणार आहे. या आठवड्यात तुमचं आरोग्य निरोगी राहील. तसेच, तुमच्या व्यवसायाला देखील चांगली गती मिळेल. सहकाऱ्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. प्रवासाचे योग संभावतात.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना शुभवार्ता मिळू शकते. तसेच, लहान मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. थोडक्यात या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या व्यवसायाची देवाण-घेवाण वाढेल. तसेच, आठवड्याच्या शेवटी दिर्घकालीन आजार तुम्हाला जाणवू शकतो. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण होऊ शकतात. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. काहीशा बाबतीत तुम्हाला अपयशाचा देखील सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. तसेच, तुमचा पैसा देखील खर्च होऊ शकतो. मात्र, हिंमत हारु नका. मेहनतीवर भर द्या.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिन्याचा पहिला आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुमची देवाण-घेवाण वाढेल. तसेच, तुमच्या मार्गातील अडथळे हळुहळू दूर होतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमचं आरोग्य निरोगी राहील. फक्त तुमच्या शत्रूंपासून चार हात लांबच राहा.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या कालावधीत तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तर, नवीन कार्याची सुरुवात करु शकता. या दरम्यान कोणाशीही उद्धटपणे वागू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नोकरदार वर्गातील लोकांची कामाची स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :